भूगोल नदी नद्या

गोदावरीच्या उपनद्या कोणत्या?

2 उत्तरे
2 answers

गोदावरीच्या उपनद्या कोणत्या?

7
गोदावरी नदीची माहिती -:

*गोदावरी नदी भारतातील प्रमुख नदीपैकी एक...

१) _भारतातील आणि महाराष्ट्रातील
ही सर्वाधिक लांबीची
नदी आहे. _
.
२) *गोदावरी नदी खोरे*
राज्यातील प्रथम क्रमांकाचे खोरे असून
गोदावरी नदीने * महाराष्ट्राचे (४९ %)*
क्षेत्र व्यापलेले आहे.
.
३) गोदावरी नदीला
*‘दक्षिणेतील गंगा’, ‘संतांची
भूमी’, ‘वृद्धगंगा’* या नावाने ओळखतात.
.
४) नदीचा उगम सह्याद्री पर्वतात
_महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील_
*त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी* येथे
झाला.
.
५) नदीची एकूण लांबी =
*१४५० कि.मी.*
.
६) महाराष्ट्रातील प्रवाहाची
लांबी = *६६८ कि.मी.*
.
७) नदीचा प्रवास = *महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र
प्रदेश*
.
८) प्रवाहाची दिशा = *पश्चिमेकडून पूर्वेकडे*
.
९) *नदीच्या उपनद्या* = मांजरा, दारणा, मुळा, वर्धा,
वैनगंगा, पैनगंगा, सिंधफणा, प्रवरा, इंद्रावती, इरई,
प्राणहिता, कादवा, दुधना, दक्षिणपूर्णा, कुंडलिका
.
१०) गोदावरी नदी नाशिक, अहमदनगर,
संपूर्ण मराठवाडा व *दक्षिण विदर्भातून तेलंगणा* राज्यात प्रवेश
करते.
.
११) गोदावरी नदीवर नाशिक
जिल्ह्यातील *गंगापूर धरण (पहिले मातीचे
धरण)*, औरंगाबाद जिल्ह्यातील
_जायकवाडी धरण (राज्यातील सर्वात मोठे
बहुउद्देशीय धरण)_, नांदेड जिल्ह्यातील
*विष्णुपुरी धरण*, धर्माबाद (जिल्हा नांदेड)
येथील *बाभळी धरण* आहेत.
.
१२) जायकवाडी धरणात साठलेल्या जलाशयाला
*“नाथसागर”* असे म्हणतात.
.
१३) नाथसागरातील जलाशयापासून पैठण येथे
*“म्हैसूरच्या वृंदावन गार्डन”* च्या धर्तीवर
*ज्ञानेश्वर उद्यानाची* निर्मिती करण्यात
आली.
.
१४) *प्राणहिता* ही
गोदावरीची प्रमुख उपनदी
असून *गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा* येथे ह्या नद्यांचा
संगम होतो.
.
१६) गोदावरी नदी *आंध्रप्रदेश
राज्यातील राजमहेंद्री ह्या शहराजवळ*
_बंगालच्या उपसागरात_ विलीन होते .

धन्यवाद।।
उत्तर लिहिले · 20/11/2019
कर्म · 19610
0
गोदावरी नदीच्या काही उपनद्या खालीलप्रमाणे:

  • उजव्या बाजूकडील उपनद्या: प्रवरा, मुळा, सिंदफना, मांजरा, मन्याड
  • डाव्या बाजूकडील उपनद्या: पूर्णा, दूधना, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, कन्हान, इंद्रावती, शिवना

टीप: काही ठिकाणी उपनद्यांच्या नावांमध्ये आणि वर्गीकरणामध्ये फरक आढळू शकतो.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1080

Related Questions

भारताची सर्वात लांब नदी कोणती?
अनेक जलप्रवाह एकत्र येऊन काय तयार होते?
संबळ नदीची उपनदी कोणती?
उताऱ्यात आलेल्या नदीचे नाव?
ॲमेझॉन नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते?
हिमालयातून वाहणाऱ्या नद्या?
अरवली पर्वता कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे?