भूगोल नदी नद्या

कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत?

2 उत्तरे
2 answers

कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत?

7

  उपनद्या  :-  वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, तुंगभद्रा, घटप्रभा,

कृष्णेच्या वारणा, येरळा, माण, अग्रणी व बोर या सांगली जिल्ह्यातून वाहणार्‍या प्रमुख उपनद्या आहेत. त्यांपैकी कृष्णा, वारणा व येरळा नद्या निश्चितपणे पाऊस पडणार्‍या प्रदेशातून वाहतात. कृष्णा ही सातारा जिल्ह्यातून वाहत येणारी नदी असून सांगली जिल्ह्यातील तिचा प्रवाह १३० किमी.चा आहे. ती वाळवा, पलूस व मिरज तालुक्यांतून प्रथम पश्चिमेकडून पूर्वेकडे व त्यानंतर आग्नेय दिशेस वाहते. कृष्णा नदीचे खोरे हा सांगली जिल्ह्यातील सुपीक भाग आहे. या जिल्ह्यातून वाहणार्‍या वारणा, येरळा,अग्रणी व या प्रमुख उपनद्यांबरोबरच कासेगाव व पेठ या नद्या आणि कटोरा ओढा, वाळू ओढा व खरा ओढा हे प्रमुख प्रवाह कृष्णेला मिळतात.

१)अग्रणी नदी कृणा नदीस अथणी येथे मिळते
2)उरमोडी नदी कृष्णा नदीस काशीळ येथे मिळते.
३)कोयना नदी कृष्णा नदीस कर्‍हाड येथे मिळते.
४)डिंडी नदी कृष्णा नदीस ..... येथे मिळते.
५)तुंगभद्रा नदी कृष्णा नदीस संगमेश्वर येथे मिळते.
६)दूधगंगा नदी, ही कृष्णा नदीस ..... येथे मिळते.
७)पंचगंगा नदी कृष्णा नदीस नरसोबाची वाडी (कोल्हापूर जिल्हा) येथे मिळते.
८)कुडाळी(कूंडली)नदी कृष्णा नदीस खडकी येथे मिळते.
९)भीमा नदी कृष्णा नदीस कर्नाटकात मिळते.
१०)मलप्रभा नदी कृष्णा नदीस कुडाळसंगम येथे मिळते.
११)मुशी नदी कृष्णा नदीस वडपल्ली येथे मिळते.
१२)येरळा नदी कृष्णा नदीस ब्रम्हनाळ. येथे मिळते.
१३)वारणा नदी कृष्णा नदीस हरिपूर (सांगली जिल्हा) येथे पश्चिमेकडून वारणा नदी मिळते.
१४)वेण्णा नदी कृष्णा नदीस संगम माहुली येथे मिळते.

उत्तर लिहिले · 19/11/2019
कर्म · 15490
0
कृष्णा नदीच्या उपनद्या खालीलप्रमाणे आहेत:

उजव्या बाजूकडील उपनद्या:

  • वेण्णा
  • कोयना
  • पंचगंगा (कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती नद्यांचा संगम)
  • दूधगंगा
  • कृष्णा
  • मालप्रभा
  • घटप्रभा
  • तुंगभद्रा (वरदा आणि हगरी नद्यांचा संगम)

डाव्या बाजूकडील उपनद्या:

  • भीमा (सीना आणि नीरा नद्यांचा संगम)
  • मुशी
  • येरला
  • माणगंगा

या नद्यांच्या व्यतिरिक्त, कृष्णा नदीला आणखी काही लहान उपनद्या मिळतात.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2840

Related Questions

ठोसेघर हा धबधबा कोणत्या नदीवर आहे?
कोणती नदी संपूर्ण देशातून वाहते?
भारताची सर्वात लांब नदी कोणती?
अनेक जलप्रवाह एकत्र येऊन काय तयार होते?
संबळ नदीची उपनदी कोणती?
उताऱ्यात आलेल्या नदीचे नाव?
ॲमेझॉन नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते?