इंधन बचत करण्याचे उपाय काय आहेत?
तेलाचा वापर :-
जगभरात तेलाचा वापर फार पूर्वीपासून होतो आहे. पूर्वी तो अन्न शिजवण्यासाठी, समई, टेंभेस पणत्यातून जाळून उजेडासाठी, गाडीचे वंगण म्हणून होत असे. आता त्याचे क्षेत्र वाढले. गेल्या काही वर्षांत साबण, सौंदर्य प्रसाधने, औषधेनिर्मिती आणि वाहनांचे इंधन म्हणूनही तेलाचा वापर होतो आहे.
सौरऊर्जा :-
मानवाच्या सुखी जीवनासाठी ऊर्जेची गरज प्रचंड प्रमाणावर आहे, तसेच शेतीसाठीही ऊर्जेची प्रचंड गरज असते. काही ऊर्जा कळत तर काही नकळत वापरली जाते. सौरऊर्जा शेतावर खूप मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. शेतावर पिके उभी असोत-नसतो, सूर्यनारायण नभात असो-नसो; वर्षाच्या बारा महिने प्रत्येक क्षणी तिचा वापर होतो. बी उगवल्या पासून ते सुगी होऊन धान्य वाळवून कणगीतून भरून ठेवेपर्यंत आणि कडबा वाळून गंजी लावेपर्यंत सौर ऊर्जेचा वापर होतो. पिके काढल्यावरही शेतातील कीटकांच्या नियंत्रणाचे कामही सौर ऊर्जेतून होत असते.
उदंड वाहणारी ही ऊर्जा प्रचंड प्रमाणावर आहे; फुकटात मिळते म्हणून तिची कदर आपण कधीच करत नाही. ऊर्जा म्हणून तिची गणणाही होत नाही! डोळ्याच्या जास्त जवळ असली, की वस्तू दिसत नाही; असेच काहीसे सूर्य-प्रकाशाचे झालेले आहे. आपल्या भौगोलिक स्थानामुळे शेतावर कृत्रिम उजेडाची किंवा कृत्रिम उष्णता निर्माण करण्याची गरज आपल्याला नाही. पावसाळ्याचे काही दिवस सोडता सूर्याचा वरदहस्त आपल्या माथ्यावर सतत असतो. भास्कर न चुकता आपले कर्तव्य बजावत असतो. त्याच्या आशीर्वादाचा पुरेपूर लाभ आपण उठावायला हवा. आधुनिक संशोधनानुसार शेड-नेट वापरून ऊनाची प्रखरता कमी करून सौर ऊर्जेचा वापर हिताचे होते.
प्राणी ऊर्जा :-
शेतावर उपयोगाची दुसरी महत्त्वाची ऊर्जा आहे प्राणी ऊर्जा. यात लेंड्या, शेण, मूत्र यांचा समावेश आहेच; बैल शक्ती ही मोठ्या प्रमाणावर अजूनही वापरात आहे. नांगरणी, कोळपणी, पेरणी, कुळवणी, मळणी, शेतमाल वाहतूक सारी कामे बैल शक्तीनेच होत असत. अजूनही होतात. बैल जोडी बाळगणे आताशा लहान शेतकऱ्यांना परवडेनासे झालेले आहे. शेतीची सारी कामे आपण आजकाल अवजड यंत्राने करतो. बैलांची जागा ट्रॅक्टर, पॉवर-टिलरने घेतलेली आहे. केवळ ही दोन यंत्रेच नव्हे तर पाण्याचा पंप, मळणी-यंत्र, टेंपो वगैरे अनेक छोटी-मोठी यंत्रे आपण आज शेतावर वापरतो. बैल कडब्यावर चालायचे; आता ही यंत्रे भूगर्भातील साठलेल्या तेल ऊर्जेवर चालतात. यंत्रांना ऊर्जा पुरवणारे रसायन आहे डिझेल आणि दिवसेंदिवस डिझेलचे भाव वाढतच आहेत. वारंवार होणाऱ्या या भाववाढीमुळे शेती करणे परवडेनासे होते. शेतीचे होणारे तुकडे; त्यामुळे घटणारी सलग शेती, अशा लहान तुकड्यांवर अवजड यंत्रे वापरणे म्हणजे खर्चाचे काम. अशा वेळी शेतीतून ऊर्जा निर्मितीची वेळ आली आहे. शास्त्रज्ञांनी खाद्य आणि अखाद्य तेलाचे इंधनात रूपांतर करण्याची शक्कल शोधून काढलेली आहे. कमीत-कमी स्वतःच्या गरजेपुरते इंधन आपल्याच शेतावर पिकवू शकतो. शेतीसाठी लागणाऱ्या ऊर्जेचे फासे पालटण्याची चिन्हे क्षितिजावर स्पष्ट दिसत आहेत. हा धडा ज्याला समजेल आणि उमजेल तो शेतकरी जवळच्या भविष्यात बाजी मारून नेईल. वाचा, विचार करा आणि अमलात आणा.
इंधन (petrol and diesel)बचत करण्याचे अनेक उपाय आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
-
वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा:
वाहनाचा वेग नियंत्रित ठेवल्यास इंधनाची बचत होते. वेगाने गाडी चालवल्यास जास्त इंधन वापरले जाते.
-
नियमित देखभाल:
गाडीची नियमित देखभाल करणे महत्त्वाचे आहे. इंजिन व्यवस्थित ठेवल्यास ते कमी इंधनात चांगले काम करते. ऑटोकार इंडियानुसार, नियमित तेल बदलणे आणि फिल्टर तपासणे महत्त्वाचे आहे.
-
टायर प्रेशर तपासा:
टायरमध्ये योग्य प्रेशर असल्यास इंधन कार्यक्षमतेत वाढ होते. कमी प्रेशरमुळे इंधन जास्त लागते.
-
एकाच वेळी अनेक कामे करा:
एकाच वेळी अनेक कामे करण्यासाठी घराबाहेर पडा, ज्यामुळे वारंवार गाडी Start आणि बंद करावी लागणार नाही.
-
सार्वजनिक वाहतूक वापरा:
शक्य असल्यास सार्वजनिक वाहतूक जसे की बस किंवा ट्रेनचा वापर करा.
-
गाडी चालवताना गिअर बदला:
गाडी चालवताना योग्य वेळी गिअर बदलणे आवश्यक आहे, ज्यामुळे इंधनाचा वापर कमी होतो.
-
एसीचा वापर टाळा:
शक्य असल्यास गाडीमध्ये एसीचा वापर टाळा, कारण एसी सुरू ठेवल्याने इंधन जास्त खर्च होते.
-
हलके सामान ठेवा:
गाडीमध्ये अनावश्यक सामान ठेवू नका, कारण जास्त वजनामुळे इंधन जास्त लागते.
हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही इंधनाची बचत करू शकता.