सण करवा चौथ

करवा चौथ म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

करवा चौथ म्हणजे काय?

4
🤔 जाणून घेऊयात ‘करवा चौथ’ सणाबद्दल


‘करवा चौथ’ हा उत्तर भारतीय हिंदू सण आहे. आश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुरोग्यासाठी पूर्ण दिवस उपवास करतात. यंदा करवा चौथ 17 ऑक्टोबर म्हणजेच आज साजरा केला जाणार आहे. भारतात प्रामुख्याने हा सण राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये पारंपारिक पद्धतीने करवा चौथचा व्रत करत विवाहित महिला साजरा करतात. तसेच विवाहित महिला मोठ्या उत्साहाने साज-श्रुंगार करून पीठ गळण्याच्या गाळणीत आधी चंद्र व नंतर आपल्या पतीचे मुखदर्शन घेवून त्यांच्या हातून पाणी पिवून हे संस्कारी व्रत समाप्त करतात.

🗣 करवा चौथ म्हणजे काय?

पुरातन कहाण्यांपैकी एकामते पूर्वी लोक लढाई वर जात असत त्यावेळी हिंदू महिला आपल्या पतीच्या सुरक्षेसाठी चंद्रदेवतेकडे साकडे घालत व व्रत करीत. पती सुखरूप घरी आल्यास त्याचे मुख चंद्र देवतेसोबत चाळणीतून बघितले जाई.
या व्रताला एक उत्सवाचे हि रूप दिले जाते. या दिवशी कृषिप्रधान राज्यांमध्ये शेतात.गव्हाची हिवाळी हंगामाचे पिकाची कापणी केली जात असे. यावरून हे व्रत साजरे केल जाऊ लागले. असे काही अख्यायीकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच भारतातील प्रमुख गहू उत्पादक राज्यात हे व्रत उत्साहात केले जाते.

💁🏻‍♂ यास करवा चौथ व्रत का म्हणतात?

‘करवा’ म्हणजे मातीचा तो भाग ज्याचा वापर गहू ठेवण्यास केला जातो. ‘चौथ’ म्हणजेच चतुर्थी हा उत्सव हिंदू कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी वर साजरा केला जातो. विशेषतः महिलांचा सन म्हणूनही याची ओळख आहे.
उत्तर लिहिले · 17/10/2019
कर्म · 569265
0

करवा चौथ हा भारतामधील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण प्रामुख्याने उत्तर भारतातील विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी करतात.

कधी असतो:

  • हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला येतो.
  • इंग्रजी कॅलेंडरनुसार, करवा चौथ सहसा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो.

कसा साजरा करतात:

  1. या दिवशी स्त्रिया उपवास करतात, ज्यामध्ये त्या दिवसभर अन्न आणि पाणी ग्रहण करत नाहीत.
  2. संध्याकाळी, चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो.
  3. स्त्रिया एकत्र जमून करवा चौथची कथा वाचतात आणि ऐकतात.
  4. पूजेमध्ये करवा (मातीचा किंवा धातूचा कलश) वापरला जातो, ज्यामुळे या सणाला 'करवा चौथ' हे नाव मिळाले आहे.

महत्व:

  • हा सण पती-पत्नीमधील प्रेम आणि समर्पण दर्शवतो.
  • स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.

इतर माहिती:

  • आजकाल हा सण केवळ उत्तर भारतातच नव्हे, तर इतर राज्यांमध्येही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
  • करवा चौथच्या दिवशी स्त्रिया पारंपरिक वेशभूषा करतात आणि विशेषIntresting dishes बनवतात.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 3500

Related Questions

करवा चौथ म्हणजे नेमकं काय आणि तो का, केव्हा व कशासाठी साजरा केला जातो?