शिक्षण लेखनकौशल्ये लिखाण

खराब अक्षर असणाऱ्या व्यक्तींची काही शास्त्रीय कारणे सांगता येतील का?

2 उत्तरे
2 answers

खराब अक्षर असणाऱ्या व्यक्तींची काही शास्त्रीय कारणे सांगता येतील का?

12
‘सुंदर अक्षर हा दागिना आहे’ किंवा ‘एखाद्याचे हस्ताक्षर म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो’ असे सुविचार आपण ऐकलेले आहेत..
            खरे तर माझेही खूप सुंदर हस्ताक्षर आहे..! याचे कारण म्हणजे मला चित्र काढायला फार आवडते.. आणि यातूनच माझ्या अक्षरात रेखीवपणा आढळून येतो.. पण मी कधी कंटाळून किंवा भल्या मोठ्या नोट्स लिहायच्या असतील तर मी घाई घाईने लिहिते.. तेव्हा माझे कुठे अक्षरे वेगळीच दिसू लागतात.. यात तुम्हाला मी एक गम्मत सांगते, जेव्हा मी माझे सुंदर अक्षर लिहिते तेव्हा पाहायला फार बरे वाटते.. लिहिताना ही निरागस आंनद मिळतो.. पण माझेच अक्षर जर वाईट दिसत असेल तर ते पाहताना वाईटच वाटते.. आणि लिहिण्याची मज्जाच निघून जाते...!
          यातून सांगण्याचा असा उद्देश आहे की, आपण एखादे चांगले केले तर आपल्याला सकारात्मकता मिळते..! चांगले - वाईट अक्षर हे आपल्या व्यक्तिमत्त्वाला लागलेले वळण आहे..! आपले व्यक्तिमत्त्व नाही..! हेच मूळ शास्त्रीय कारण आहे..!
तुमचे वाईट अक्षर तुमचे व्यक्तिमत्त्व ठरवत नाही..! पण अक्षर मात्र तुमच्या व्यक्तिमत्त्वास वळण लावू शकते, हे तितकेच खरे आहे..!

आणि, आपण डॉक्टरांचे खराब अक्षर असते असे विनोदाने म्हणत असाल तर ते अक्षर खराब नसते तर त्यांनी त्यांचे शिक्षण घेताना मोठाल्या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांचे लिखाणच जणू असे झाले असावे.. म्हणून डॉक्टर आणि फार्मसी(मेडिकलवाले) यांनाच प्रिस्क्रिप्शनवर डॉक्टरांनि लिहिलेले हस्ताक्षर कळते..
उत्तर लिहिले · 14/10/2019
कर्म · 458560
0
खराब अक्षर असण्याची काही शास्त्रीय कारणे खालीलप्रमाणे आहेत:
  • लेखन कौशल्ये (Motor Skills) चा अभाव: लहान मुलांना योग्य प्रकारे पेन किंवा पेन्सिल पकडता न येणे, अक्षरे वळवण्यात अडचण येणे, तसेच हात आणि बोटांच्या स्नायूंचा योग्य समन्वय नसणे, ही खराब अक्षरांची काही कारणे असू शकतात.
  • डिस्ग्राफिया (Dysgraphia): डिस्ग्राफिया ही एक प्रकारची लर्निंग डिसेबिलिटी (Learning Disability) आहे. यामध्ये व्यक्तीला लिहायला आणि अक्षरे ओळखायला त्रास होतो. त्यामुळे अक्षरे व्यवस्थित काढता न येणे, स्पेलिंगमध्ये (Spelling) चुका होणे आणि वाक्य रचना योग्य न होणे अशा समस्या येतात.
  • अटेन्शन डेफिसिट हायपरऍक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD): ADHD असणाऱ्या व्यक्तींना लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. त्यामुळे त्यांचे अक्षरांवर नियंत्रण राहत नाही आणि अक्षरं खराब येतात.1
  • दृष्टी समस्या: दृष्टी कमजोर असल्यास किंवा इतर काही दृष्टी समस्या असल्यास अक्षरे स्पष्ट दिसत नाहीत, त्यामुळे ती व्यवस्थित काढता येत नाहीत.
  • न्यूरोलॉजिकल कंडिशन्स (Neurological Conditions): पार्किन्सन्स (Parkinson's) किंवा इतर न्यूरोलॉजिकल कंडिशन्समुळे (Neurological Conditions) स्नायूंवर नियंत्रण कमी होते आणि अक्षरे व्यवस्थित काढता येत नाहीत.
  • स्मरणशक्ती कमजोर असणे: काहीवेळा स्मरणशक्ती कमजोर असल्यामुळे अक्षरांचा आकार आणि त्यांची रचना लक्षात ठेवणे कठीण होते, ज्यामुळे अक्षरं खराब येतात.

हे काही संभाव्य कारणं आहेत. अचूक निदान आणि उपचारांसाठी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1680

Related Questions

विशेष क्षमता असलेल्या मुलांना लेखन कौशल्याच्या सरावासाठी कोणती गोष्ट आवश्यक असते?
लेखकाचा दृष्टीकोन व आशय कसा स्पष्ट कराल?
लेखिकेला वाचनामुळे भाषा आणि लेखनाबाबत कोणत्या गोष्टी कळाल्या?
लेखकांमध्ये जबरदस्त निरीक्षणशक्ती होती का?
काही प्रकारचे लेखन व्यवहाराचे निर्भयता कशावर अवलंबून असते आणि आपल्या कोणत्याही प्रकारच्या लेखन व्यवहाराची निर्दोषता कशावर अवलंबून असते?