2 उत्तरे
2
answers
परीक्षा नसत्या तर निबंध?
0
Answer link
इयत्ता बारावी म्हणजे आयुष्यातील टर्निंग पॉईंट', 'वर्षाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास करायला हवा', 'तुमच्या करियरचा हा महत्त्वाचा टप्पा', अशा नाना तहेच्या उपदेशांनी कान रोज धन्य होत होते. जेवणाची वेळ झाली, तशी आईने जेवणासाठी हाक मारली. विरंगुळ्यासाठी थोडा वेळ जेवता जेवता टि.व्ही. बघावा, म्हणून बाहेर आले आणि टि.व्ही. लावला. चॅनल बदलता बदलता न्यूज चॅनलवर माझी नजर स्थिरावली.
आज न्यूज चॅनल्सचा नूर काही वेगळाच होता. कारण आज ब्रेकिंग न्यूज होती, ती बारावीच्या निकालाची. सगळ्या चॅनल्सवर तिच बातमी होती. एकंदरित निकाल पहाता, विदयार्थ्यांवर विक्रमतोड अशा गुणांची बरसात करण्यात आली आहे, हे लक्षात आले. प्रत्येक चॅनलवर सर्वांत अधिक गुण मिळवलेल्या विदयार्थ्यांच्या, त्यांच्या पालकांच्या, शिक्षकांच्या मुलाखती चालू होत्या. त्यांच्या यशाचे कोडकौतक चालले होते. त्या कौतकास ते पात्रही होते म्हणा; पण तरी एक विचार मनात चमकून गेला. कमी गुण मिळालेले विदयार्थी किंवा ७५% हून अधिक गुण मिळालेले विदयार्थी, या ९०-९५% हून अधिक गुण मिळवणाऱ्यांच्या गर्दीत कुठे हरवूनच गेले होते. विदयार्थ्यांच्या गुणांमुळे त्यांच्यात फरक करायला लावणाऱ्या या परीक्षाच नसत्या तर?
खरंच ! परीक्षा नसत्या तर एका परीक्षेपासून नाही तर परीक्षेच्या विविध रूपांपासून विदयार्थ्यांची सुटका झाली असती. तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा, घटक चाचणी, सहामाही, वार्षिक अशा शालेय, महाविदयालयीन परीक्षांसोबतच डॉ. होमीभाभा, टिळक विदयापीठ, शिष्यवृत्ती, चित्रकलेच्या एलिमेंट्री, इंटरमिजेट अशा एक ना अनेक परीक्षारूपी तोफेच्या तोंडी विदयार्थ्यांना जावं लागतं. शालेय व महाविदयालयीन परीक्षाच नाहीत तर पुढे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, अॅप्टीट्यूड टेस्ट, गटचर्चा, मुलाखत अशा परीक्षांमध्येच विदयार्थी गुरफटले जातात. या इतक्या सगळ्या परीक्षांचा विचार करून विदयार्थी हवालदिल होतो. परीक्षेत जास्त गुण मिळवणारे निश्चिंत होतात, आपल्या गुणांचा अहंकार बाळगतात, तर कमी गुण मिळालेले विद्यार्थी नैराश्यात बुडतात, न्यूनगंडाने ग्रासतात. या परीक्षाच रद्द झाल्या, तर या गुणांची तफावतही नाहिशी होईल.
विदयार्थ्यांमध्ये परीक्षा नसल्याने पास, नापास, हुशार, ढ असा फरक रहाणार नाही. प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी याचा विचारच बंद होईल. इयत्ता दहावी, बारावी या आयुष्याच्या महत्त्वाच्या वर्षांत विदयार्थ्यांवर अभ्यास करावा, यासाठी केल्या जाणाऱ्या नानाविध उपदेशांवर बंधने येतील. अर्थात त्यामुळे विदयार्थ्यांवर, त्यांच्या मनावर येणारा ताण आपोआपच कमी होईल. परीक्षेत पास होण्यासाठी काही विद्यार्थी पेपर फोडण्याचे, कॉपी करण्याचे चुकीचे मार्ग अवलंबतात. परीक्षा नसत्या तर त्यांचे चुकीच्या मार्गावर पाऊल पडणारच नाही. परीक्षेत अपयश आल्याने नैराश्याच्या गर्तेत बुडालेले काही विदयार्थी आत्महत्येचा मार्ग जवळ करतात; पण परीक्षा नसल्याने त्यात येणाऱ्या अपयशाचा प्रश्नच उरणार नाही आणि ओघाने विदयार्थ्यांच्या मनात आत्महत्येचा विचारही येणार नाही. खरंच या परीक्षा रद्द झाल्या तर 'नकोत त्या परीक्षा' म्हणणाऱ्या विदयार्थ्यांचे स्वप्न साकार होईल.
नाण्याला दोन बाजू असतात या उक्तीप्रमाणे परीक्षा नसण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेतच. परीक्षा नसण्याने विदयार्थ्यांची प्रगती ठरवण्याचा मार्गच बंद होईल. विदयार्थ्याला दिलेले ज्ञान कितपत त्याच्यापर्यंत पोहचले आहे, हे ठरवणे अशक्य होईल. परीक्षामुळे विदयार्थ्यांमधील कलागुणांचा ठाव घेता येतो, त्यांच्या भविष्यासाठी योग्य दिशा मिळते, परंतु या परीक्षाच नसतील तर विदयार्थी दिशाहीन होतील. चुकीचे क्षेत्र निवडल्याने विद्यार्थी प्रगती साधू शकणार नाहीत. प्रत्येक कामाला न्याय देणारी लायक माणसे नसतील. अशाने सर्व कामे बिघडतील.
प्रत्येक व्यक्ती ही आयुष्यभर विदयार्थीच । असते. नवनवीन गोष्टी शिकत असते, त्याचा दैनंदिन व्यवहारात उपयोग करीत असते. जीवनाच्या प्रत्येक वाटेवर चांगले वाईट अनुभव घेत परीक्षा देत असते. अशा परीक्षांमधूनच माणसाने प्रगती साधली आहे. परीक्षारूपी घट्ट मुळांच्या आधारे प्रगतीचा वृक्ष डेरेदार होऊ शकतो. परीक्षा हव्यात; पण त्यांचा अतिरेक नको. परीक्षांची योग्य पद्धत अवलंबली, तर प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा हवीहवीशी वाटेल. 'नकोत त्या परीक्षा' ऐवजी 'हव्यात त्या परीक्षा' असे विदयार्थी म्हणू लागतील.

Here's an essay on the topic "What if there were no exams?" in Marathi, formatted in HTML:
परीक्षा नसत्या तर...
आजच्या शिक्षण पद्धतीत परीक्षांना फार महत्त्व आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी आणि त्यांना पुढील वर्गात पाठवण्यासाठी परीक्षा हा एक महत्त्वाचा आधार आहे. पण, परीक्षा नसत्या तर काय झाले असते, याचा विचार करणे मनोरंजक आहे.
सकारात्मक बाजू:
- तणावमुक्त शिक्षण: परीक्षा नसल्यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण कमी झाला असता. भीती आणि दबावाशिवाय ते अधिक आनंदाने शिकू शकले असते.
- खऱ्या ज्ञानावर लक्ष: परीक्षांमधील गुण मिळवण्याऐवजी, विद्यार्थ्यांनी ज्ञानावर आणि कौशल्ये आत्मसात करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले असते.
- सर्जनशीलतेला वाव: परीक्षांच्या दबावामुळे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता कमी होते. परीक्षा नसल्यास, त्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःच्या कल्पनांना व्यक्त करण्याची संधी मिळाली असती.
- आत्मविश्वासात वाढ: सतत परीक्षांमध्ये अपयश येणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होतो. परीक्षा नसल्यास, प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या गतीने शिकण्याची संधी मिळाली असती.
नकारात्मक बाजू:
- मूल्यमापनाचा अभाव: परीक्षांशिवाय विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन करणे कठीण झाले असते. त्यामुळे, कुणाला किती ज्ञान आहे, हे समजणे अवघड झाले असते.
- स्पर्धेचा अभाव: परीक्षांमधील स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगले प्रदर्शन करण्याची प्रेरणा मिळते. परीक्षा नसल्यास, ही स्पर्धात्मक भावना कमी झाली असती.
- शिस्तीचा अभाव: परीक्षांच्या भीतीने विद्यार्थी नियमित अभ्यास करतात. परीक्षा नसल्यास, अभ्यासात शिस्त राहिली नसती.
- प्रगतीचा अभाव: परीक्षांमधील गुण हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख दर्शवतात. परीक्षा नसल्यास, विद्यार्थी आपल्या ज्ञानात किती प्रगती करत आहेत, हे समजणे कठीण झाले असते.
निष्कर्ष:
परीक्षा नसत्या तर शिक्षण अधिक आनंददायी आणि तणावमुक्त झाले असते, यात शंका नाही. पण, त्याच वेळी विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन करणे आणि त्यांच्यात स्पर्धात्मक भावना टिकवून ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे, परीक्षांची पद्धत पूर्णपणे बंद न करता, त्यात सुधारणा करणे अधिक योग्य राहील.