2 उत्तरे
2 answers

सीटी स्कॅन काय आहे?

5
CT स्कॅन म्हणजे काय..?

म्हणजेच कॉम्प्युटराईज्ड टोमोग्रॉफी. सी. टी. स्कॅन ही रेडिओलॉजीमधील अगदी महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे. सी टी स्कॅनला कॅट स्कॅन (CAT) कम्प्युटराईज्ड ऍक्सिअल टोमोग्रॉफी देखील म्हणतात.
सी टी स्कॅन हे एक्सरे (क्ष किरण) प्रकारातील ऍडव्हान्स तंत्र आहे. त्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या अवयवांबद्दल देखील स्टँडर्ड एक्सरेपेक्षा अधिक खोलवर (डिटेल) माहिती देते. एक्सरे मशिन्स एका जागी स्थिर असतं तर हे सी टी. युनिट आपल्या शरीराभोवती रोटेट होतं म्हणजे फिरतं त्यामुळे शरीराचा जो भाग तपासायचा आहे त्याचे वेगवेगळ्या कोनातून पिक्सर्च किंवा स्लाईस घेतल्या जातात.




CT scan कोणत्या आजाराच्या निदानासाठी वापरतात..?
सीटी हे अनेक आजाराचं निदान करण्याकरिता महत्त्वाच टूल आहे. त्यामुळे आपण मेंदू, मान, मनका, छाती, पोट, मस्कुलोस्केलेटल सिस्टीम यातील पोटेंशीयल प्रॉब्लेम्सच्या रेंजचे परीक्षण करू शकतो. सीटीमुळे ज्या इमेजेस प्रोव्हाईड केल्या जातात. त्या मेंदूच्या ज्या ऍनॉटामिकल स्लाईसेसशी (3 ते 6 मि. मी. जाड) तुलना करू शकतात. ज्यात रेडिओडेमीटीतील साधासा फरक देखील टीश्युंमधून ओळखता येतो. जसे सेरेब्रोस्पायनल फ्लुईड, रक्त, व्हाईट व ग्रेमॅटर सीटीस्कॅनमुळे आपल्याला मेंदूतील ट्युमर, रक्तस्राव इनफारक्शन किंवा मालफॉर्मेशन याबद्दलच एक्झॅक्ट लोकेशनचं निदान होण्यात मदत होते. तसेच हायड्रोसिफॅलस (मेंदूत पाणी होणे) सेरेब्रल ऍट्रोफी मेंदूचा आकार कमी होणे किंवा आकुंचन पावणे याचे पण निदान करता येते.


CT Scan करण्यासाठी किती वेळ
सीटी स्कॅनद्वारे परीक्षण व्हायला 15 ते 45 मिनिटे लागतात आणि परीक्षणाच्या आधी जर काही गोष्टींची गरज असेल तर ते आधीच सांगण्यात येतं.


CT Scan करण्यासाठी खर्च
CT Scan करण्यासाठी साधारण 3000 ते 12000 रुपये खर्च येऊ शकतो.
उत्तर लिहिले · 21/9/2019
कर्म · 10670
0

सीटी स्कॅन (CT Scan) म्हणजे काय?

सीटी स्कॅन (computed tomography scan) हे एक विशेष प्रकारचे एक्स-रे तंत्रज्ञान आहे. यात अनेक अँगलमधून एक्स-रे घेऊन शरीराच्या आतील भागाची विस्तृत चित्रं तयार केली जातात.

सीटी स्कॅन कसे काम करते?

  • सीटी स्कॅन मशीनमध्ये एक मोठे गोल रिंग असते.
  • रुग्णाला एका टेबलवर झोपवले जाते, जे रिंगच्या मध्यभागी सरकते.
  • एक्स-रे ट्यूब रुग्णाच्या शरीराभोवती फिरते आणि अनेक कोनांमधून एक्स-रे घेते.
  • हे एक्स-रे डिटेक्टरद्वारे पकडले जातात आणि संगणकावर पाठवले जातात.
  • संगणक या माहितीवर प्रक्रिया करून शरीराच्या आतील भागाची प्रतिमा तयार करतो.

सीटी स्कॅन कशासाठी करतात?

  • शरीरातील ट्यूमर, रक्तस्त्राव किंवा इतर समस्या शोधण्यासाठी.
  • हाडे आणि रक्तवाहिन्यांचे परीक्षण करण्यासाठी.
  • कर्करोगाचे निदान आणि त्यावर उपचार करण्यासाठी.
  • अंतर्गत अवयवांची तपासणी करण्यासाठी.

सीटी स्कॅनचे फायदे:

  • कमी वेळात अचूक निदान.
  • वेदना रहित प्रक्रिया.
  • शरीराच्या आतील भागाची स्पष्ट प्रतिमा.

सीटी स्कॅनचे धोके:

  • एक्स-रेमुळे रेडिएशनचा exposure होऊ शकतो.
  • क्वचित प्रसंगी ऍलर्जीची प्रतिक्रिया (contrast dye वापरल्यास).

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1440