मॉलमध्ये ग्राहकांसाठी कोणत्या युक्त्या वापरतात?
. *_मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाने त्या मॉलमधून काहीना काही खरेदी करावी यासाठी तेथील व्यापारी नवनवीन शक्कल लढवत असतात. आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत की, कश्या प्रकारच्या स्मार्ट ट्रिक्सने आपण या मॉल वाल्या मंडळींचे “गिऱ्हाईक” होऊन बसतो._*
🔴खाद्यपदार्थ
प्रवेशद्वारावरच तुम्हाला बेकरी प्रोडक्ट्स किंवा अशा काही पदार्थांचा वास येईल की तुमची भुक चवताळेल. या पदार्थांची रचना अतिशय आकर्षक व सगळे पदार्थ सहज दिसतील अशी असते. ते बघुन तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आणि तुम्ही ते विकत घ्याल याची काळजी घेतली जाते.
शिवाय तेथे गेल्यावर आपल्या लक्षात येते की, एकतर या पदार्थांची किंमत जास्त असते. दुसरे म्हणजे कमी किमतीचे पदार्थ हे सहसा एक नग उपलब्ध न ठेवता ते कमीतकमी दोन किंवा त्यापेक्षा जास्त घेणे बंधनकारक असते. अशावेळी आपण पोटासाठी काय एवढा विचार करायचा म्हणत किंमत आणि विक्रेत्याच्या चलाखीकडे दुर्लक्ष करत काहीतरी घेतोच.
🔴 रचना
मॉलमध्ये आल्यावर आपल्या नजरेत भरतील असे फेमस कंपनींचे भलेमोठ्ठे प्रोडक्ट आकर्षक पद्धतीने ठेवलेले असतात. तसेच तुम्हाला ते सहज दिसतील याची विशेष काळजी घेतली जाते. त्याच प्रोडक्टची लहान साइज ही नजरेत बसणार नाही अशी ठेवली असते. ज्या कंपनीचे प्रॉडक्ट कमी किमतीचे किंवा कमी नफ्याचे असते ते शेल्फच्या अगदी खालच्या बाजूला जिथे सहज नजर जाणार नाही अशा ठिकाणी ठेवलेली असते.
यामागे मानसशास्त्रीय कारण आहे. ते असे की, ग्राहक त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आणि डोळ्यांच्या रेषेत असणाऱ्या गोष्टी पटकन खरेदी करतात. त्या रेषेच्या अगदी वरती वा खाली असणाऱ्या वस्तूंकडे ते सहसा लक्ष देत नाहीत.
♦रंगसंगती
एखाद्या प्रोडक्टचा खप वाढवण्यासाठी आकर्षक, सुंदर व सुडौल मॉडेल दाखवले जातातच. पण त्या प्रोडक्टची विक्री करण्याच्या ठिकाणी आकर्षक मांडणी आणि रंगसंगती केली जाते. तुम्ही ज्यावेळी एखादे प्रोडक्ट बघता त्यावेळी तिथे त्या मॉडेलचे पोस्टर तर असतेच पण, तिथे तुम्हाला मुक्तपणे फिरण्यासाठी जागाही सुटसुटीत असते.
आकर्षक रंगसंगती असली की ग्राहक नकळतपणे उत्पादन काय आहे हे बघायला जातात. बरेचदा गरज नसताना ते खरेदीही करतात.
♦डिस्काउंट आॅफर
एखाद्या प्रोडक्टचा खप वाढवण्यासाठी आकर्षक, सुंदर व सुडौल मॉडेल दाखवले जातातच. पण त्या प्रोडक्टची विक्री करण्याच्या ठिकाणी आकर्षक मांडणी आणि रंगसंगती केली जाते. तुम्ही ज्यावेळी एखादे प्रोडक्ट बघता त्यावेळी तिथे त्या मॉडेलचे पोस्टर तर असतेच पण, तिथे तुम्हाला मुक्तपणे फिरण्यासाठी जागाही सुटसुटीत असते.
आकर्षक रंगसंगती असली की ग्राहक नकळतपणे उत्पादन काय आहे हे बघायला जातात. बरेचदा गरज नसताना ते खरेदीही करतात.
♦आवश्यक वस्तू आणि आकार♦
तुम्ही आवश्यक वस्तुच घेण्यासाठी मॉलमध्ये आलेले आहात याची पूर्ण कल्पना मॉलच्या मॅनेजर्सना असते. म्हणून ते तुम्हाला आवश्यक असलेल्या वस्तू तुमच्या गरजेपेक्षा जास्त मोठ्या पॅकमध्ये ठेवतात. वस्तु नेहमीच लागणार आहे हा विचार करुन तुम्ही मोठा पॅक घेता.
यामुळे त्या माॅॅलचे ठरवुन दिलेले टार्गेट पुर्ण होते व कंपनीकडून त्याचा मोबदलाही मिळतो. शिवाय वस्तु भरपुर असल्याने तुम्ही मनमोकळे पणाने वापरता, ती लवकर संपवता व परत खरेदी करायला जाता.
♦वेळेचे भान न रहावे अशी व्यवस्था♦
तुम्ही मॉलमध्ये, शॉपिंग करण्याच्या ठिकाणी तुम्हाला घड्याळ शोधूनही सापडणार नाही. कारण जर तुम्हाला वेळेचं भान आलं तर तुम्ही आवश्यक वस्तु घेऊन लवकर बाहेर पडाल. शिवाय तेथे खिडक्याही नसतात जेणेकरून आपण खरेदी करता करता बाहेर अंधार पडलाय हे ही आपल्या लक्षात येत नाही.
वेळेचे भान नसले की, ग्राहक कामाशिवाय जास्त वेळ घालवतो. या नादात आवश्यक नसलेले पदार्थ, वस्तू विकत घेतले जातात. म्हणून इतक्या मोठ्या मॉलमध्ये घड्याळाची व्यवस्था काही केली जात नाही.
त्याचप्रमाणे मॉलमधील कार्ट वापरू नका त्यामुळे होते असे की आपण फक्त गरजेपुरती शॉपींग केली तर ती त्यामध्ये अगदी थोडी वाटते उचलण्याचा त्रास नसल्याने आपण सहज ती उचलून पटापट आपल्या कार्टमध्ये टाकतो. घरी गेल्यावर आपल्या लक्षात येते की यातल्या काही गोष्टी आपण वापरणारच नाही आहोत .
तुमच्या खिशातील कमीत कमी पैसे मॉलमध्ये खर्च व्हावेत असं तुम्हाला वाटतं का ? तर मग तुम्ही तुमच्या लहान मुलांना मॉलमध्ये घेऊन जाणे टाळा.
आकर्षक प्रदर्शन: दुकानांमध्ये वस्तू आकर्षक पद्धतीने मांडल्या जातात. रंगसंगती, प्रकाश योजना आणि आकर्षक मांडणीच्या साहाय्याने ग्राहकांचे लक्ष वेधले जाते.
सवलती आणिOffers: मॉलमध्ये सतत वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती आणि ऑफर्स चालू असतात. जसे की ‘एकावर एक फ्री’, ‘ठराविक खरेदीवर सूट’ किंवा ‘लकी ड्रॉ’ यामुळे ग्राहक आकर्षित होतात.
संगीत आणि सुगंध: मॉलमध्ये सुखद संगीत लावले जाते, ज्यामुळे ग्राहकांना आरामदायी वाटते. काही मॉल्समध्ये विशिष्ट सुगंधाचा वापर केला जातो, जो खरेदीचा अनुभव वाढवतो.
Wegळ्या कार्यक्रमांचे आयोजन: मॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. जसे की फॅशन शो, संगीत कार्यक्रम, किंवा Kids Zone. यामुळे कुटुंबांना मॉलमध्ये वेळ घालवण्याची संधी मिळते आणि ग्राहक आकर्षित होतात.
सोयीसुविधा: मॉलमध्ये पार्किंग, स्वच्छतागृहे, Baby Care Room, आणि Wheelchair ची सोय असते. ज्यामुळे ग्राहकांना आराम मिळतो.
Loyalty Program: अनेक मॉल्स Loyalty Program चालवतात, ज्यात ग्राहकांना खरेदीवर Points मिळतात आणि ते Points वापरून Discount मिळवू शकतात.
Social Media Marketing: मॉल सोशल मीडियावर Active असतात आणि वेगवेगळ्या Offers आणि Event ची माहिती Social Media च्या माध्यमातून देत असतात, ज्यामुळे जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचते.
Food Court: मॉलमध्ये Food Court असल्यामुळे लोकांना जेवणाची सोय होते आणि ते जास्त वेळ मॉलमध्ये राहू शकतात.
Game Zone: लहान मुलांना आणि तरुणांना आकर्षित करण्यासाठी मॉलमध्ये Game Zone तयार केले जातात.
Personal Shopping Assistant: काही मॉल्स Personal Shopping Assistant ची सुविधा देतात, जे ग्राहकांना योग्य वस्तू निवडायला मदत करतात.