मुस्लिम धर्म जात व कुळे इस्लाम धर्म

मुस्लिम धर्म आहे का इस्लाम धर्म आहे? मुस्लिम जात आहे का?

3 उत्तरे
3 answers

मुस्लिम धर्म आहे का इस्लाम धर्म आहे? मुस्लिम जात आहे का?

3
इस्लामचा अर्थ अरबी शब्दशः शरण जाणे, स्वीकारणे किंवा सरेंडर करणे होय. यातून इस्लामचा असा अर्थ निघतो की देवाला पूर्णपणे शरण जाणे, स्वीकारणे अशी पारंपरिक परिभाषा येते. मुसलमान एक व्यक्ती आहे जो स्वतः देवाला स्वीकारतो, देवाला सर्वस्व समर्पित करण्याच्या कार्यात गुंतलेला असतो. म्हणून मुसलमान एक व्यक्ती आहे जो देवाच्या इच्छेला किंवा इस्लामचा अनुयायी म्हणून स्वतःला सादर करतो.
उत्तर लिहिले · 13/7/2019
कर्म · 18160
3
इस्लाम हा धर्म आहे आणि जे इस्लाम धर्माचे पालन करतात किंवा अनुयायी आहेत त्यांना मुस्लीम किंवा मोमीन ( श्रध्दावान ) म्हणतात.

इस्लाम या अरबी शब्दाचा अर्थ "शरणागती" असलम म्हणजे " शरण जाणे" अल्लाह म्हणजेच ईश्वराच्या इच्छेला शरण जाणे हे मुस्लीमांचे प्राथमिक कर्तव्य समजले जाते. सलेम या म्हणजे शांती. इस्लाम "सलेम" या शब्दापासून निर्माण झाला आहे...म्हणून इस्लामचा दुसरा अर्थ शांतता किंवा शांती असा लावण्यात येतो.

इस्लाम आणि इस्लामचे प्रेषित मुहंमद यांच्यावर श्रधा ठेवणे हे मुस्लीमांसाठी अनिवार्य असल्याचे म्हटल्या जाते. या व्यतिरिक्त नमाज, रोजा, जकात आणि हज यात्रा हे इस्लामच्या अनुयायांकडून म्हणजेच मुस्लीमांकडून अपेक्षित असते...जकात ( दानधर्म ) हज हे आर्थिक स्थितीवर आवलंबून असते. ती शिफारस आहे..
इस्लाम हा धर्म आणि या धर्माचे अनुयायी म्हणजे मुस्लीम.
उत्तर लिहिले · 2/5/2020
कर्म · 150
0

तुमच्या प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे:

मुस्लिम धर्म आहे की इस्लाम धर्म आहे?

इस्लाम हा एक धर्म आहे. 'मुस्लिम' हा शब्द इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांसाठी वापरला जातो. त्यामुळे, 'इस्लाम धर्म' आणि 'मुस्लिम' हे दोन्ही शब्द योग्य आहेत, पण त्यांचा अर्थ वेगळा आहे.

मुस्लिम जात आहे का?

जात हा शब्द हिंदू धर्मातील सामाजिक वर्गीकरणासाठी वापरला जातो. इस्लाममध्ये जात नाही. मुस्लिम समाजात सामाजिक आणि सांस्कृतिक भेद असू शकतात, पण ते जातीवर आधारित नाहीत.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1440

Related Questions

अल्लाहचा जन्म कधी झाला?
इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते?
मुहम्मद पैगंबर कोण?
आदमी को रसुल बणा दुंगा याचा अर्थ काय आहे?
मुस्लिम धर्माचा उगम कुठं झाला?
इस्लामची शिकवण काय आहे?
मुस्लिम धर्माची सुरुवात कोठून झाली?