मराठी भाषा व्याकरण विरामचिन्हे

विरामचिन्हे म्हणजे काय, ते सांगू शकाल का? 4 विरामचिन्हे सांगा.

2 उत्तरे
2 answers

विरामचिन्हे म्हणजे काय, ते सांगू शकाल का? 4 विरामचिन्हे सांगा.

8
विराम चिन्हांचा वापर भावनांच्या,विचारांच्या आविष्कारासाठी आवश्यक व महत्त्वाचा ठरतो. भाषा व्यवहारात लेखन, भाषण , वाचन या क्रिया सतत व सातत्याने घडत असतात. जेव्हा आपण लेखन करतो तेव्हा कथन केलेले वाचकांच्या लक्षात यावे म्हणून विरामचिन्हांचा वापर केला जातो. कोणताही मजकूर वाचत असताना लिहलेला अर्थ लक्षात घेऊन आपण थांबतो. या थांबण्याला विराम घेणे असे म्हणतात. हा विराम कधी अल्प असतो तर कधी त्यापेक्षा अधिक असतो. कधी एखादे वाक्य बोलनाऱ्या व्यक्तीच्या मुखातील असतो.

बोलताना किंवा लिहिताना अर्थ नीट लक्षात यावा म्हणून शब्द व वाक्ये यांमध्ये काही काळ थांबावे लागते. कोठे किती थांबावे, हे ध्यानात येण्यासाठी जी विशिष्ट चिन्हे वापरतात, तीच विराम चिन्हे होत.

विराम म्हणजे थांबणे. बोलताना आपण आवश्यकतेनुसार कमी अधिक वेळ थांबू शकतो, परंतु लिहिताना तसे करता येत नाही, म्हणून ही थांबण्याची क्रिया विरामचिन्हाव्दारे दर्शवली जाते.

विरामचिन्हे व त्याचे प्रकार

पूर्णविराम ( . ) : वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाल्याचे दर्शवण्यासाठी वापरतात. एखाद्या शब्दाचे संक्षिप्त स्वरूप दाखवण्यासाठी हे वापरतात. उदा. अ) मी मराठी बोलतो. ब) वि. वा. शिरवाडकर

स्वल्पविराम ( , ) : एकाच विभागातील शब्द दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. एखाद्याला संबोधून हाक मारण्यासाठी हे चिन्ह वापरतात. उदा. अ) शीतकपाटात गाजरे, पालक, बीट, काकडी आहेत. ब) श्रोतेहो, आज आपण या विषयावर बोलू.

अर्धविराम ( ; ) : दोन छोटी छोटी वाक्ये जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययाचा वापर करून हे चिन्ह वापरले जाते. उदा. त्याने खूप मेहनत केली ; पण त्याला योग्य ते फळ मिळाले नाही.

उद्गारचिन्ह ( ! ) : आपल्या मनातील भावना दर्शवताना हे चिन्ह वाक्यात वापरले जाते. हे चिन्ह भावनादर्शक शब्द दर्शवण्यासाठी वापरतात. उदा. अरे वा ! किती सुंदर फुले आहेत. अभिनंदन ! अशीच प्रगती करा.

प्रश्नचिन्ह ( ? ) : एखद्या प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचाण्यासाठी हे चिन्ह वापरतात. हे चिन्ह वाक्यात आल्यावर तेथे प्रश्न आहे असे समजले जाते. उदा. भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे? सध्याचे राज्यपाल कोण आहेत?

*एकेरी अवतरणचिन्ह(‘ ’)* :- एखाद्याचे वाक्य दुसऱ्याला अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी किंवा एखाद्या शब्दाचे महत्व पटवण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात. उदा. अ) पुण्याला महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक’ राजधानी म्हणून ओळखले जातात.

*दुहेरी अवतरण चिन्ह(" ")*:-एखाद्याने बोलेले
वाक्य तसे च्या तसे बोलायचं किंवा लिखाण करायच्या वेळी हे चिन्ह वापरतात. उदा:"तो माणूस माझा मोठा भाऊ आहे"असे शिरिष म्हणाला.
उत्तर लिहिले · 3/7/2019
कर्म · 3930
0
मी नक्कीच मदत करू शकेन! विरामचिन्हे म्हणजे भाषेला अधिक स्पष्ट आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी वापरली जाणारी चिन्हे.

विरामचिन्हे:

विरामचिन्हे म्हणजे भाषेला अधिक स्पष्ट आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी वापरली जाणारी चिन्हे. यांच्यामुळे वाक्यरचना अधिक सोपी होते आणि वाचकाला वाक्याचा अर्थ समजायला मदत होते.

४ विरामचिन्हे:

  1. पूर्णविराम ( . ): वाक्य पूर्ण झाले हे दर्शवण्यासाठी वापरतात.
  2. स्वल्पविराम ( , ): वाक्यात थोडा वेळ थांबायचा असल्यास वापरतात.
  3. प्रश्नचिन्ह ( ? ): प्रश्न विचारण्यासाठी वापरतात.
  4. उद्गारवाचक चिन्ह ( ! ): भावना व्यक्त करण्यासाठी वापरतात.
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980

Related Questions

लेखनामधील विराम चिन्हांचे महत्त्व विशद करा?
एकुण विराम चिन्हे किती आहेत?
विरामचिन्हे म्हणजे काय ते सांगून चार विरामचिन्हे सोदाहरण लिहा?
स्वल्पविराम चिन्ह घालण्याचे नियम सोदाहरण स्पष्ट करा?
एखाद्या शब्दावर जोर दाखवला नसताना कोणते विरामचिन्हे वापराल?
होय महाराज, आम्हाला क्षमा करा. विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा कसे लिहाल?
आदेशात्मक चिन्ह कोणते आहे?