व्याकरण संज्ञा

नामाची व्याख्या लिहा?

2 उत्तरे
2 answers

नामाची व्याख्या लिहा?

5
खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या आणि गुणांच्या नावांना 'नाम' असे म्हणतात.

नामाचे प्रकार :-

           १. सामान्य नाम
           २. विशेष नाम
           ३. भाववाचक नाम

१. सामान्य नाम :-

            एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तुला मिळालेले नाव म्हणजे सामान्यनाम होय.
उदा. मुले, मुली, शाळा, पुस्तक, ई.

२.विशेष नाम :-

           जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा,प्राण्याचा किंवा वस्तूंचा बोध करून त्या नावाला विशेष नाम असे म्हणतात.
उदा. रामदास, गंगा, यमूना, हिमाचल इ.

३.भाववाचक नाम :-

             ज्या नामामुळे एखाद्या प्राण्यामधील किंवा पदार्थामधील गुणांचा,भावांचा अथवा धर्माचा बोध होते त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात.
उदा. आनंद, दु:ख, ई.
उत्तर लिहिले · 29/6/2019
कर्म · 3930
0

नामाची व्याख्या:

व्याख्या:
ज्या शब्दाने एखाद्या वस्तूला, स्थळाला, व्यक्तीला, प्राण्याला, गुणधर्माला किंवा कल्पनेला नाव दिले जाते, त्या शब्दाला नाम असे म्हणतात.

उदाहरण:

  • वस्तू: टेबल, खुर्ची, पुस्तक
  • स्थळ: मुंबई, भारत, बाग
  • व्यक्ती: राम, सीता, महात्मा गांधी
  • प्राणी: सिंह, वाघ, गाय
  • गुणधर्म: प्रामाणिकपणा, सौंदर्य, आनंद
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1040

Related Questions

धूमकेतू ला इंग्रजीत काय म्हणतात?
दारू पिणाऱ्याला तळीराम का म्हणतात?
स्त्रोत म्हणजे काय?
पोर्तुगीजांचा उल्लेख समकालीन मराठी कागदपत्रात कोणत्या शब्दाने केला?
प्लॅटफॉर्मला मराठीत काय म्हणतात?
धातुसाधित नाम म्हणजे काय?
बहीनाम्यांचे एकवचनी रुपातील सामान्य रूप कसे लिहाल?