शिक्षण
औषधनिर्माणशास्त्र
मला बी फार्मसी बद्दल माहिती मिळेल का ?
मूळ प्रश्न: डी फार्मसी आणि बी फार्मसी विषयी माहिती मिळेल का?
सर्वप्रथम ते D.pharm (म्हणजेच डिप्लोमा इन फार्मसी) व B. Pharm (म्हणजेच Bachelor in Pharmacy) असं आहे.
यात D. pharm हा पदविका कोर्स आहे त्याचा कालावधी 2 वर्षाचा असतो, जो पूर्ण केल्यावर महाराष्ट्र स्टेट फार्मसी कॉउन्सिल ला रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून नोंद केली जाऊ शकते. ज्याच्याआधारे तो उमेदवार आपले स्वतःचे औषधी दुकान काढू शकतो, तसेच Medical Representative (MR) , Hospital Pharmacist, Lab Assistant, Pharma Industry , सरकारी संस्थांमध्ये Pharmacist/Pharmacy Officer इत्यादी पदांवर नोकरी करू शकतात.
आता B. Pharm बद्दल पाहूया B.pharmacy हा चार वर्षांचा Degree (पदवी) कोर्स आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर आपल्याला वरील(D. Pharma) मधील सर्व प्रकारच्या पात्र ठिकाणी नोकरी करता येते तसेच फर्मासिच्या शिक्षणसंस्थेत प्राध्यापक पदावरही कार्य करण्याची संधी मिळू शकते, शिवाय Pharma Industry मध्ये Quality control / Quality Assurance ह्या पदांवरही नोकरीच्या संधी आहेत. आणि सरळसेवा भरतीतून अन्न आणि औषध निरीक्षक म्हणूनही कार्यरत असण्याच्या संधी आहेत.
आशा आहे आपल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकलो , फार्मसिबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर विचारू शकता. भविष्यासाठी शुभेच्छा 💐

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers