3 उत्तरे
3
answers
उत्पन्न दाखल्यासाठी रेशनकार्ड लागतेच का?
7
Answer link
उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी पुढील पायऱ्यांनी जा.
१) पुर्वतयारी – उत्पन्नाचा व रहिवासी पुरावा घेणे
२) आवश्यक कागदपत्रे जमा करणे
३) प्रक्रिया – सेतु केंद्रातुन उत्पन्नाचा दाखला काढणे
पायरी १) पुर्वतयारी – उत्पन्नाचा आणि रहिवासी पुरावा घेणे.
● उत्पन्नाचा पुरावा काढणे
अ) अर्जदार शेतकरी/मजुर असल्यास आपले रेशनकार्ड दाखवुन गाव कामगार तलाठ्याकडुन तुमच्या नावाचा मागील तीन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला घ्या.
ब) अर्जदार नोकरदार असल्यास पगाराची स्लिप घ्यावी.
क) अर्जदार व्यावसायिक असल्यास व्यवसायाचे आयकर विवरणपत्र घ्यावे.
ड) अर्जदाराला वैद्यकीय कारणासाठी प्रमाणपत्र हवे असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र घ्यावे.
ई) अर्जदार जर पेन्शनर असतील तर बँकेचे पासबुक/बँकेचे प्रमाणपत्र घ्यावे.
● रहिवासी पुरावा घेणे
गावकामगार तलाठ्याकडुन तुमच्या नावाचा रहिवासी दाखला घ्यावा.
पायरी २) आवश्यक कागदपत्रे जमा करणे
● उत्पन्नाचा पुरावा
● रहिवासी दाखला
● ओळखीचा पुरावा (कोणताही एक) – तुमचा फोटो असणारे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा तत्सम अधिकृत ओळखपत्र यापैकी कोणत्याही एकाची साक्षांकित प्रत
● पत्त्याचा पुरावा (कोणताही एक) – रेशनकार्ड, लाईट बिल, मिळकत कर पावती, ७/१२ किंवा ८अ उतारा, फोन बिल, पाणीपट्टी, घरपट्टी यापैकी कोणत्याही एकाची साक्षांकित प्रत
● विहित नमुन्यातील अर्ज व त्यावर १०₹ चे कोर्ट फी स्टॅम्प/तिकीट आणि अर्जदाराचा फोटो
● उत्पन्नाबाबत १००₹ स्टॅम्प पेपरवर स्वयं घोषणापत्र/शपथपत्र/प्रतिज्ञापत्र
अ) अर्जदाराचे वय १८ वर्ष पुर्ण असल्यास त्याने स्वतःने केलेले प्रतिज्ञापत्र
ब) अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असल्यास त्याचे आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान व्यक्तीने केलेले प्रतिज्ञापत्र.
(वरील कागदपत्रांची फाईल बनवुन साक्षांकित प्रत तयार करुन ठेवावी.)
पायरी ३) प्रक्रिया – सेतु केंद्रातुन उत्पन्नाचा दाखला काढणे
सेतु/नागरी सुविधा केंद्र/तहसील कार्यालयामधुन उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असणारा फॉर्म घ्यावा. त्यातील सर्व माहिती अचुकपणे भरुन तुमची सही करावी. त्यावर १०₹ किंमतीचे कोर्ट फी स्टँप/तिकीट लावावे. तुमचा फोटो लावावा. या फॉर्मसोबत वर यादीत दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
हा पुर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला फॉर्म सेतु/नागरी सुविधा केंद्र/तहसील कार्यालयमध्ये जमा करावा. फॉर्म जमा केल्यावर पोचपावती/टोकन घ्यावे. सदर टोकन वर तुमचा उत्पन्नाचा दाखला मिळण्याची तारीख दिली जाते.
हे टोकन जपुन ठेवावे आणि टोकनवर दिलेल्या दिवशी येऊन टोकन दाखवुन आपला उत्पन्नाचा दाखला घ्यावा.
त्यावर तहसीलदाराची सही-शिक्का असल्याची खात्री करावी. उत्पन्नाचा दाखला मिळाल्यावर त्याच्या आवश्यक तेवढ्या झेरॉक्स काढुन सत्यप्रत (True Copy) तयार करुन ठेवाव्यात. उत्पन्नाच्या दाखल्याचा उपयोग नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी होतो.

1
Answer link
उत्पन्न दाखला घेण्यासाठी रेशनकार्डची आवश्यकता नाही. जर नोकरदार असाल, तर कार्यालयाचे तीन वर्षांचे उत्पन्न प्रमाणपत्र, तलाठ्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड प्रत, रहिवासी दाखला या कागदपत्रांची आवश्यकता असते.
0
Answer link
उत्पन्न दाखल्यासाठी (Income Certificate) रेशनकार्ड आवश्यक आहे की नाही, हे तुम्ही तो दाखला कोणत्या कारणासाठी काढत आहात आणि कोणत्या রাজ্যে काढत आहात यावर अवलंबून असते.
सामान्यपणे,उत्पन्न दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे असू शकतात:
- अर्जदाराचा फोटो
- ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, ভোটার আইডি, প্যান কার্ড, পাসপোর্ট)
- पत्त्याचा पुरावा (रेशन कार्ड, लाईट बिल, पाणी बिल, भाडे करार)
- उत्पन्नाचा पुरावा (पगार स्लिप, फॉर्म १६, आयकर रिटर्न)
- स्वयं घोषणापत्र
रेशन कार्ड हे पत्त्याच्या पुराव्यासाठी वापरले जाऊ शकते. परंतु, ते अनिवार्य नाही. पत्त्याच्या पुराव्यासाठी तुम्ही इतर कागदपत्रे देखील वापरू शकता.
तुम्ही ज्या विशिष्ट कामासाठी उत्पन्न दाखला काढत आहात, त्यासाठी रेशन कार्ड आवश्यक आहे की नाही, याची माहिती मिळवण्यासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी:
- तुम्ही तुमच्या राज्य सरकारच्या महसूल विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.
- किंवा तुमच्या এলাকার तहसील कार्यालयात चौकशी करू शकता.