2 उत्तरे
2
answers
एटीएमद्वारे करण्यात येणारी कामे कोणती?
4
Answer link
*_🏦 बँकेत जायचा वेळ वाचवा, ATMमधून करू शकता ही 8 महत्त्वाची कामं❕_*
_👩👩👧👧 लोक जास्त करून ATMचा उपयोग पैसे काढण्यासाठीच करतात. फार फार तर आपला अकाउंट बॅलन्स किती आहे, ते तपासण्यासाठी करतात. पण आता बँक ATM मधून आपल्या ग्राहकांना अनेक सेवाही देतेय. ज्यासाठी तुम्हाला बँकांमध्ये तासोनतास उभं राहावं लागायचं, ते आता तुम्हाला ATMमधून लगेच मिळू शकतं._
*💷 फिक्स्ड डिपाॅझिटची सुविधा :*
तुम्ही ATMमधून FD म्हणजेच फिक्स्ड डिपाॅझिट करू शकता. तुम्हाला मेन्यूमध्ये दिलेल्या स्टेप्सप्रमाणे जायचंय. त्यात तुम्हाला डिपाॅझिटचा काळ, रक्कम निवडल्यानंतर कन्फर्म करायचा आॅप्शन निवडावा लागेल.
*❕कर भरणं :*
देशातल्या अनेक मोठ्या बँका एटीएमद्वारे अन्कम टॅक्स भरण्याची सुविधा देतायत. यात अॅडव्हान्स टॅक्स, सेल्फ असेसमेंट टॅक्स आणि रेग्युलर असेसमेंटनंतर दिला जाणारा कर यांचा समावेश आहे.ATM द्वारे आयकर भरायचा असेल तर तुमच्या बँकेच्या वेबसाइट किंवा शाखेत जाऊन या सुविधेसाठी रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर ATMच्या मदतीनं तुम्ही कर भरू शकता.अकाउंटमधून तुमचे पैसे कापले गेले की एक CIN नंबर येईल. त्यानंतर 24 तासानंतर तुमच्या बँकेच्या वेबसाइटवर जाऊ शकता. तिथून तुम्ही सीआयएन नंबर वापरून चलनची प्रिंट घेऊ शकाल.
*📼 ATMमध्ये पैसे जमा करू शकता :*
मोठ्या सरकारी बँका आणि खासगी बँका यांनी एटीएममध्ये कॅश डिपाॅझिट मशीन ठेवलीय. यात तुम्ही 49,900 रुपये जमा करू शकता. या मशीन्समध्ये 2000, 500, 100 आणि 50 रुपयांच्या नोटा जमा करता येतात.
*📄 इन्शुरन्स पाॅलिसीचे पैसे भरू शकता :*
LIC, HDFC लाइफ आणि SBI लाइफसारख्या विमा कंपनींनी बँकांसोबत करार केलाय. त्यानुसार या कंपन्यांचे विमा ग्राहत एटीएममधून विमा भरू शकतात. यासाठी तुम्हाला पाॅलिसी नंबर तयार ठेवावा लागेल. एटीएमच्या बिलावर सेक्शनमध्ये विमा कंपनीचं नाव सिलेक्ट करावं लागेल. यानंतर पाॅलिसी नंबर एंटर करावा लागेल. त्यानंतर जन्मतारीख आणि मोबाइल नंबर. मग प्रीमियमची रक्कम अॅड करा आणि कन्फर्म करा.
*✍🏻 कर्जासाठी अर्ज करू शकता :*
कमी रकमेच्या पर्सनल लोनसाठी तुम्ही ATMमधून अप्लाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला फोन बँकिंग किंवा बँक ब्रँचपर्यंत जायची गरज नाही. अनेक खासगी बँका ATM मधून आपल्या ग्राहकांना प्री अॅप्रुव्हड पर्सनल लोन देतात.हे कर्ज तुम्ही ATMमधून काढू शकता. कर्जाची रक्कम अॅडव्हान्स अॅनालिटिक्स पडताळून पाहतो. त्यासाठी ग्राहकांचे ट्रॅन्झॅक्शन डिटेल्स, अकाउंट बॅलन्स, पगाराची रक्कम, क्रेडिट,डेबिट कार्डाच्या रिपेमेंटचे डिटेल्स हे सगळ तपासलं जातं.
*💰 पैसे ट्रान्सफर :*
तुम्ही नेटबँकिंग करत नसाल तर ATMच्या मदतीनं तुमच्या खात्यातून दुसऱ्या खात्यात रक्कम ट्रान्सफर करू शकता. त्यासाठी तुम्हाला आॅनलाइन किंवा ब्रँचमध्ये जाऊन त्या खात्यात रजिस्टर करावं लागेलं, ज्या खात्यात रक्कम ट्रान्सफर करायची आहे. एका वेळी ATMमधून तुम्ही 40 हजार रुपयापर्यंत ट्रान्सफर करू शकता. एका दिवसात तुम्ही अनेक वेळा रक्कम ट्रान्सफर करू शकता.
*📄 ही बिलं भरू शकता :*
टेलिफोन, वीज, गॅस किंवा दुसरी अनेक बिलं एटीएमद्वारे भरू शकता. याआधी तुम्हाला बँकेच्या वेबसाइटवर स्वत: रजिस्टर करावं लागेल.
*_🧿 देशाची सर्वात मोठी बँक SBI एटीएमद्वारा तिकीट बुक करायची सेवा देते. यात तुम्ही लांब पल्ल्याच्या ट्रेन्सची तिकिटं बुक करू शकता._*

0
Answer link
एटीएम (ATM) द्वारे करण्यात येणारी काही कामे खालीलप्रमाणे:
- पैसे काढणे: तुम्ही तुमच्या खात्यातून कधीही पैसे काढू शकता.
- बँक स्टेटमेंट: तुम्हाला तुमच्या खात्यातीलstatement मिळवू शकता.
- पिन बदलणे: तुम्ही तुमच्या एटीएम कार्डचा पिन बदलू शकता.
- मोबाइल रिचार्ज: काही एटीएममध्ये मोबाइल रिचार्ज करण्याची सुविधा असते.
- बॅलन्स तपासणे: तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक तपासू शकता.
- पैसे जमा करणे: काही एटीएममध्ये पैसे जमा करण्याची सुविधा असते.