अंतराळ ई-मेल नासा

नासा 2020 साली मंगळावर यान सोडणार आहे, आपले नाव नोंदवण्यासाठी नासाचा ईमेल पत्ता काय आहे?

2 उत्तरे
2 answers

नासा 2020 साली मंगळावर यान सोडणार आहे, आपले नाव नोंदवण्यासाठी नासाचा ईमेल पत्ता काय आहे?

3

_*‼  आता तुमचं नाव पाठवा थेट मंगळ ग्रहावर....नासाने दिलीय ऑफर !!  ‼*_

    *आपण अनेकदा नासा, इस्रोच्या मिशनबद्दल ऐकलं असेल, पण आता आपल्याला या मिशनमध्ये सामील होता येणार आहे. हे मिशन पण साधंसुधं नाही. नासा मंगळ ग्रहावर आपलं यान पाठवणार आहे.या मिशनमध्ये आपण कसे सामील होऊ शकतो? चला समजून घेऊया !!*

*मंडळी, नासाने २०२० च्या “मिशन मंगल”साठी लोकांना आपली नावं द्यायला सांगितली आहेत. ही नावं एका सिलिकॉन चीपवर छापण्यात येतील. यासाठी खास मायक्रो बिमचा वापर केला जाईल. या एका चीपवर लाखो नावं छापली जाऊ शकतात. ही नावं केसापेक्षाही लहान आकारात असतील. ही चीप नंतर “मार्स २०२० रोवर” मध्ये बसवून मंगळवर पाठवण्यात येणार आहे. नासाचा “मार्स २०२० रोवर” काहीसा असा दिसतो. https://mars.nasa.gov/participate/send-your-name/mars2020/ या लिंकवर जाऊन तुम्हाला आपली माहिती भरायची आहे. तुमचं नाव, आडनाव, देशाचं नाव, पिनकोड, आणि इमेल आयडी भरला की तुम्हाला एक बोर्डिंग पास मिळतो. या बोर्डिंग पासवर यान कुठून निघणार आहे, कधी पोहोचेल, आपला क्रमांक काय आहे हे सगळं लिहिलेलं असेल. एक लक्षात ठेवा तुम्हाला ३० सप्टेंबरच्या आत नाव पाठवावं लागणार आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट नासाचं यान जुलै २०२० साली मंगळ ग्रहाच्या दिशेने निघणार आहे. फेब्रुवारी २०२१ ला हे यान मंगळवर पोहोचेल. फार पूर्वीपासून मंगळवर जीवन होतं असं म्हटलं जातं, या संदर्भात आणखी शोध घेण्यासाठी हे मिशन महत्वाचं ठरेल. याखेरीज मंगळ ग्रहावरचं वातावरण, तिथलं भूगर्भशास्त्र यांचा पण अभ्यास केला जाईल.
मंडळी, या महत्वाच्या मिशन सोबत आपलं नाव छापलं जाणार आहे. आपण असं म्हणू की ज्यांची ज्यांची नावं छापली जातील ते एक प्रकारे मंगळावर पोहोचणारे पहिले मानव असतील. नावात काय असतं म्हणणाऱ्यांना हे ही बातमी नक्की सांगा..
बोभाटा वरून साभार
----------------------------------------------

0

नासा 2020 साली मंगळावर यान सोडणार आहे, आपले नाव नोंदवण्यासाठी नासाचा कोणताही ईमेल पत्ता नाही. नासाने 'इन्साइट' (InSight) या मोहिमेदरम्यान लोकांना त्यांची नावे एका सिलिकॉन चिपवर पाठवण्याची संधी दिली होती.

तुम्ही नासाच्या MARS Exploration Program या वेबसाइटला भेट देऊ शकता.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980

Related Questions

अंतराळात ग्रह कसे फिरतात, तेथे हवा का नसते?
सुनिता विल्यम्स अंतराळात किती दिवस राहिली व कशासाठी?
सुनिता विल्यम्स अंतराळात किती दिवस राहिल्या व कशासाठी राहिल्या?
मिशन ज्यूस हे कोणत्या अंतराळ संस्थेचे मिशन आहे?
सुनिता विलियम्स अंतराळात?
भारतीय वैज्ञानिकांनी अंतराळ संशोधनात घेतलेल्या गरुड भरारीचे वर्णन करा.
सुनिता উইলিয়াম्स अंतराळात किती दिवस राहिल्या व कशासाठी?