कायदा कायदेशीर कागदपत्रे लिखाण

आमच्या भाड्याच्या रूममध्ये एक मुलगा रहायला आला आहे, तर त्याला 'मला काही हरकत नाही' असे लिहून देण्यासाठी नमुना (फॉर्मेट) हवा आहे.

2 उत्तरे
2 answers

आमच्या भाड्याच्या रूममध्ये एक मुलगा रहायला आला आहे, तर त्याला 'मला काही हरकत नाही' असे लिहून देण्यासाठी नमुना (फॉर्मेट) हवा आहे.

2
भाडयाचं करारपत्र हा एक कायदेशीर दस्तऐवज असतो, जो मालक आणि भाडेकरू यांच्या संगनमताने मान्य केलेल्या अटी असतात. दोघांमध्ये काहीही मतभेद झाल्यास हा दस्तऐवज अतिशय निर्णायक ठरतो. म्हणूनच हा कागद तयार करताना खूप काळजी घेणं आवश्यक असतं. त्यात भविष्यातल्या सर्व अटी आणि नियम नमूद केलेल्या असाव्यात. म्हणूनच याबाबत तुम्हाला काहीही माहिती नसेल तर हे कागदपत्र तयार करण्यासाठी तुम्ही कायदेशीर सल्लागाराची मदत घ्या. सगळ्याची चौकशी करा, तपासा आणि महत्त्वाचं म्हणजे त्या कागदपत्रांची पोलिसांकडून पडताळणी करून घ्यावी. असं भाडयाचं करारपत्र तयार करण्यापूर्वी काय मुद्दे लक्षात ठेवावे लागतात हे पाहू या.

»  मालक आणि भाडेकरूचं नाव, पत्ता, वडिलांचं नाव या गोष्टी त्यात नमूद करणं आवश्यक आहे.

»  या करारपत्रात नमूद करण्यात आलेल्या व्यक्तीचा त्या मालमत्तेवर कायदेशीररित्या मालकी हक्क असला पाहिजे याची पडताळणी करून घ्यावी.

»  भाडयाची रक्कम त्या करारपत्रात स्पष्टपणे नमूद केलेली असावी. त्यात मेन्टेनन्सची रक्कमही स्पष्ट नमूद करावी.

»  भाडं कधीपासून वाढेल किंवा कोणत्या तारखेपासून भाडं सुरू होईल, तसंच पैसे देण्याची पद्धती या सगळ्या गोष्टी त्यात नमूद करणं आवश्यक आहे. भाडं देण्यास विलंब झाला तर काय करावं लागेल या गोष्टीही त्या करारपत्रात नमूद करणं आवश्यक आहे.
आपण ही पोस्ट माहिती सेवा ग्रूप वर वाचत आहात.
»  भाडेदारीचा कालावधी नमूद करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे डिपॉझिटची रक्कमही, तसंच भाडं वेळेवर न मिळाल्यास बंद करण्याचा कालावधीही त्यात लिहिलेला असणं आवश्यक आहे. तसंच रक्कम परत करण्याची पद्धती किंवा ती अ‍ॅडव्हान्समध्ये देण्यात येणार आहे की नाही याबाबतही त्यात नमूद करणं आवश्यक आहे.

»  पाणीपट्टी, वीज बिल, मेन्टेनन्स कोण भरणार हेदेखील त्यावरच नमूद करणं आवश्यक आहे.

»  त्याचप्रमाणे तुमचं घर फर्निचरने भरलं असेल किंवा तुमच्या घरात लाईट-पंखे असतील त्याबातही त्यात नमूद करायला हवं, त्याचबरोबर त्याचं नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार हेदेखील त्यात असावं. मालकाने प्लम्बिंग, इलेक्ट्रिकल तसंच सॅनिटरी फिटिंग्जची तपासणी करून त्यांची अवस्था अ‍ॅग्रीमेंटमध्ये नमूद करावी. याचबरोबर भिंत, छत आणि गच्ची या गोष्टीदेखील नमूद कराव्यात जेणेकरून भविष्यात अशा गोष्टी उद्भवल्यास त्यावरून तंटा होणार नाही.

»  मालमत्ता भाडयाने देताना ती कार्यालयीन कामासाठी देण्यात येणार आहे की रहिवासी स्वरूपात याबाबतचा म्हणजे मालमत्ता भाडयाने देण्यामागचा हेतू स्पष्टपणे त्यावर लिहिलेला असावा.

»  एखाद्याला करार संपण्यापूर्वीच घर रिकामं करायचं असेल तर त्याबाबतच्या अटीही त्यात नमूद केलेल्या असाव्यात.

»  अ‍ॅग्रीमेंटमध्ये उपलब्ध असलेल्या सुखसोयींविषयी म्हणजे जीम, गच्ची, बगीचा, स्वीमिंग पूल, कार पार्किंग, लायब्ररी, क्लब याबाबत सूचना केलेल्या असाव्यात त्याचप्रमाणे या सुविधांचा वापर करायचा झाल्यास त्यासाठी काय फी आकारण्यात येते याविषयीही नमूद केलेलं असावं.

»  याशिवाय मालक आणि भाडेकरू यांच्या मतानुसार त्यात ते असंख्य अटी आणि नियम घालू शकतात.

करारपत्र
0
div > div >

नमुना: भाड्याच्या खोलीत राहण्यास हरकत नसल्याचे पत्र

दिनांक: [आजची तारीख]

ठिकाण: [ठिकाण]

मी, [तुमचे नाव], खाली सही करणारा/करणारी, [तुमचा पत्ता] येथे राहतो/राहते. माझ्या भाड्याच्या रूममध्ये [मुलाचे नाव] यांना राहण्यास माझी कोणतीही हरकत नाही.

त्यांचे नाव [मुलाचे नाव] असून ते [त्यांचा पत्ता] येथे राहणारे आहेत. माझ्या रूममध्ये राहण्यासाठी माझी पूर्ण सहमती आहे आणि मला भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही.

सही:

[तुमची सही]

[तुमचे नाव]

Witness (साक्षीदार):

1. नाव: [साक्षीदाराचे नाव]

सही: [साक्षीदाराची सही]

2. नाव: [साक्षीदाराचे नाव]

सही: [साक्षीदाराची सही]

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980

Related Questions

खरेदी प्रमाणे माझी जागा १५ फूट पूर्व पश्चिम २८ फूट आहे, तरी मला माझी जागा पूर्णपणे मिळू शकते का?
खरेदी प्रमाणे माझी जागा पण उत्तर ते दक्षिण?
वजन व समोरच्या व्यक्तीची जागा खरेदी केलेली आहे व माझी जागाही आठ अ प्रमाणे आहे, तर कोणाला कोणाची जागा त्याच्या हक्काप्रमाणे मिळेल?
घरकूल बांधकामास शेजारील व्यक्ती अडथळा आणत आहे?
माझी जागा खरेदी प्रमाणे 15x28 आहे आणि मी माझ्या जागेवर 14x28 प्रमाणे बांधकाम करत आहे, आणि शेजारील व्यक्ती बांधकाम करण्यास अडवत आहे, तर काय करावे लागेल?
खरेदी केलेल्या जागेवर शेजारी व्यक्ती बांधकामास अडथळा आणत आहे, तर काय करावे?
खरेदी केलेल्या जागेवर शेजारी काही अडचण आणू शकतो का?