महाभारत व्यक्ति इतिहास

नकुल व सहदेव बद्दल माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

नकुल व सहदेव बद्दल माहिती मिळेल का?

0

महाभारतातील दोन गूढ पात्रे ‘नकुल-सहदेव’ यांच्याबद्दल तुम्ही आजवर कधीही न ऐकलेल्या गोष्टी! 


https://bit.ly/36MlWZt
____________________________

🌠 _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ 🌠
____________________________
*_दि. २८ एप्रिल २०२०_*
महाभारत तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्यातील कुरुक्षेत्राचे युध्द, पांडवांचेजीवन याविषयी मुलभूत माहिती तर आपल्याला आहेच. परंतु त्यामधील सर्वात छोट्या दोन पांडवांबद्दल आपण फारसे परिचित नाही आणि त्यांचा कुठे जास्त उल्लेख होताना देखील आढळत नाही. पंडूची दुसरी पत्नी माद्री हिच्या पोटी भगवान अश्विन कुमार यांच्या आशीर्वादाने जन्मलेल्या या  दोन पांडवांबद्दल काही आश्चर्यकारक गोष्ट जाणून घेऊया.
नकुल आपली सुंदरता आणि मोहक चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध होता. कौरवांची बहिण दुशला नेहमी त्याच्या सौंदर्याची स्तुती करत असे.सहदेव हा एकमेव मुलगा होता, ज्याला पंडूने स्वतःच्या शरीराचे मांस खाण्यासाठी विनंती केली. वडिलांच्या आज्ञेचे पालन करून त्याने आपल्या वडिलांच्या मेंदूचा भाग खाल्ला. यामुळे सहदेवाला भूतकाळ आणि भविष्यकाळ पाहण्याची शक्ती प्राप्त झाली.              
╔══╗
║██║      _*ⓂⒶⒽⒾⓉⒾ*_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
नकुल आणि सहदेव यांना प्राण्यांची संभाषणे समजायची. त्यांना वनस्पती आणि प्राणी यांचे विचार, संवाद आणि कृती समजत असे. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट, नकुल आणि सहदेव यांनी वैद्य देवताआणि त्यांचा जन्मदाता असलेल्या अश्विन कुमार यांच्याकडून आशीर्वाद मिळवला होता. अश्विन कुमाराकडून मिळालेल्या वरदानानुसार दोन्ही बंधूंना आयुर्वेदाचे प्रचंड ज्ञान होते. प्राण्यांच्या जखमा आणि हाडे कश्या दुरुस्त कराव्यात यावर देखील त्यांनी प्रभुत्व मिळवले होते. त्यांच्या उपचारांनी कोणीही सजीव तत्काळ बरा होत असे.


अज्ञातवासाच्या काळात नकुल आणि सहदेवने मत्स्यराज्याच्या पदरी वेश बदलून चाकरी केली होती. त्यांच्याकडे गोशाळेचे काम देण्यात आले होते. त्यांच्या देखरेखीखाली गायींनी जास्त दुध देण्यास सुरुवात केली, मरगळलेले घोडे सुदृढ आणि चपळ झाले.नकुल पावसात घोडेस्वारी करून सुद्धा भिजत नसे. तो प्रकाशाच्या वेगाने घोडा पळवत असे. घोड्यावर बसून एखाद्या किल्ल्याच्या भिंतीवरून सुद्धा तो सहज उडी मारतअसे.सहदेव हा मात्र अतिशय चतुर होता. त्याचे ज्ञान अफाट होते. तो भविष्यातील घटना सांगत असे, तसेच गूढ गोष्टींवर देखील त्याचे प्रभुत्व होते. दुर्योधनाच्या सांगण्यावरूनच सहदेवाने कुरुक्षेत्राच्या युद्धासाठी शुभ तारीख निवडली होती.नकुलच्या लढाईमधील शंखाला सुघोश आणि सहदेवच्या शंखाला मनी पुष्पक म्हटले जाई.नकुलने धारदार आणि तळपती तलवार हेआपले मुख्य हत्यार म्हणून निवडले,तर सहदेवने कुऱ्हाड त्याचे मुख्य हत्यार म्हणून निवडले.कुरुक्षेत्र युद्धाच्या १८ व्या दिवशी नकुलने आपल्या काकांना आणि उरलेल्या इतर कौरवांना पराभूत केले, परंतु तो त्यांना ठार मारू शकला नाही.
द्रोपदीला द्यूतात जिंकल्यानंतरतिचा सार्वजनिकरित्या झालेला अपमान बघून सहदेव याने शकुनीला मारण्याची शपथ घेतली. सहदेवने शकुनीला कुरुक्षेत्र युद्धाच्याशेवटच्या दिवशी म्हणजेच १८ व्या दिवशी ठार मारले. सहदेवला माहित होते की शकुनीचा मृत्यू आपल्याच हातून होणार आहे, कारण तसे भविष्य त्याने पाहिले होते. त्यामुळे योग्य वेळ येण्याची त्याने वाट पाहिली आणि आपल्या पत्नीच्या अपमानाचा बदला घेतला.आपण जे महाभारत पाहतो, वाचतो त्यात या दोन बंधूंबद्दल फारच कमीगोष्टी कळतात, पण महाभारताच्या खोलात या दोन बंधूंबद्दल अश्या कित्येक गोष्टी आहेत ज्या वाचकांचं मनोरंजन करतातhttps://bit.ly/36MlWZt
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇_*      
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
0

नकुल आणि सहदेव हे दोघे माद्री आणि पांडू यांचे पुत्र होते. ते पांडवांमध्ये सर्वात लहान होते. ते जुळे भाऊ होते.

नकुल:
  • नकुल हे त्यांचे वडील पांडू यांच्यासारखेच शूर आणि पराक्रमी होते.
  • ते उत्तम तलवारबाज आणि घोडेस्वार होते.
  • त्यांना पशुवैद्यक आणि घोड्यांबद्दलचे ज्ञान होते.
  • महाभारताच्या युद्धात त्यांनी शूरतेने लढा दिला.
सहदेव:
  • सहदेव हे सर्वात बुद्धिमान मानले जातात.
  • त्यांना ज्योतिष, गणित आणि इतर शास्त्रांचे ज्ञान होते.
  • युधिष्ठिराने त्याला राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी दिली होती.
  • सहदेवानेही महाभारताच्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली.

नकुल आणि सहदेव हे दोघेही धर्मनिष्ठ, सत्यवचनी आणि आपल्या भावांवर प्रेम करणारे होते. त्यांची पांडवांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका होती.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 2680

Related Questions

भारतातील सर्वात मोठा योद्धा कोण होता?
महाराष्ट्राचा सर्वात मोठा योद्धा कोण होता?
बिंबदेव यादव यांच्याबद्दल माहिती द्या?
रामजी जाधव यांची माहिती द्या?
छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय?
कोल्हापूर आणि डॉ. आंबेडकर यांचा काय संबंध होता?
धावजी पाटील यांच्याबद्दल माहिती?