भूगोल राजधानी

लक्षद्वीपची राजधानी कोणती आहे?

3 उत्तरे
3 answers

लक्षद्वीपची राजधानी कोणती आहे?

12
लखदी. भारताचा केंद्रशासित प्रदेश व अरबी समुद्रातील एक द्वीपसमूह. ८० ते १२० १३’ उ.अक्षांश आणि ७१० ते ७४०पू. रेखांश यांदरम्यान याचा विस्तार आहे. या द्वीपसमूहात २० प्रवाळ बेटांचा समावेश असून त्यांत १२ कंकणद्वीपे, ३ प्रवाळशैलभित्ती व ५ निमज्जित किनारपट्ट्या आहेत. सर्व बेटांचे एकूण क्षेत्रफळ ३२ चौ.किमी असून ॲन्ड्रोथ (क्षेत्रफळ ४.८ चौ.किमी.-लोकसंख्या ६,८१२-१९८१), अमिनी (२.६-५,३६७), अगत्ती (२.७-४,१११), बित्रा (०.१-१८१), चेटलट (१.०-१,४८४), काडमट (३.१-३,११४), काल्पेनी (२.३-३,५४३), काव्हारट्टी (३.६-६,६०४), किल्टन (१.६-२,३७५) व मिनिकॉय (४.४-६, ६५८) या प्रमुख दहा बेटांवरची एकूण लोकसंख्या ४०,२४९ होती (१९८१). सर्वात कमी लोकसंख्या बित्रा या बेटावर असून कोणत्याही बेटाची रुंदी २ किमी.पेक्षा अधिक नाही. केरळ राज्यातील कोचीन शहरापासून लक्षद्वीप बेटे सु. २२० ते ४४० किमी. अंतरावर आहेत. काव्हारट्टी हे या प्रदेशाच्या राजधानीचे ठिकाण आहे...




              धन्यवाद
उत्तर लिहिले · 12/4/2019
कर्म · 39105
3
'लक्षद्वीप' हे आपल्या भारताच्या संघराज्यांपैकी एक संघराज्य क्षेत्र असून, लक्षद्वीपची राजधानी 'कवरत्ती' आहे.
उत्तर लिहिले · 12/4/2019
कर्म · 1235
0

लक्षद्वीपची राजधानी कवरत्ती आहे.

कवरत्ती हे लक्षद्वीप बेटा समूहांमधील एक महत्वाचे बेट आहे. हे बेट प्रशासकीय केंद्र म्हणूनही काम करते.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5240

Related Questions

भारताच्या शेजारील देश?
नंदूरबार जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कुठे आहेत?
महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे कुठे आहेत?
भारतका छोटा राज्या कौनसा है?
सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या राज्याला लाभला आहे?
महाराष्ट्राला किती लांब समुद्रकिनारा लाभला आहे?
भारतामध्ये किती किल्ले आहेत?