विवाह स्वभाव लग्न समाज

मुलगी बघायला गेल्यावर तिला कोणते प्रश्न विचारायचे?

3 उत्तरे
3 answers

मुलगी बघायला गेल्यावर तिला कोणते प्रश्न विचारायचे?

21
लग्न हे माणसाच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. आज लव्ह मॅरेज करतांना अनेकांना मुलींना काहीही अन्य प्रश्न विचारावे लागत नाहीत. पण जेव्हा गोष्ट अॅरेंज मॅरेजची असते तेव्हा प्रश्न विचारावा लागू शकतो. कारण ती व्यक्ती आपल्यासाठी अनोळखी असते.

मुलानेही मुलीला एकांतात जाऊन काही प्रश्न विचारायला सांगितले जातात. पण अशा वेळेस काय प्रश्न विचारावे हे कळत नाही. पण आम्ही तुम्हाला ते प्रश्न सांगणार आहोत.

तुम्ही जसे गोधळात आहात तशी मुलगीही गोंधळात असते. त्यामुळे तिला कोणतेही उलट प्रश्न विचारून नाराज करू नका. तिला तिच्या आवडी निवडी विचारा. ती जर खूपच लाजाळू असेल तर तिला स्वत: विषयी विचारा. तिला अगोदर विश्वासात घ्या. मग तिच्या विषयी तुम्हाला सगळ काही माहित होऊन जाईल.


१. मोकळ्या वेळेत काय करायला आवडते ?

जेव्हा मोकळा वेळ मिळतो त्यावेळेत तु काय करतेस असा प्रश्न विचारायला काहीच हरकत नाही. तिचे फ्रेंडसर्कल विषयी माहिती घ्या. तिला कसे मित्र आवडतात यावरून तुम्हा तिच्याविषयी आणखी गोष्टी जाणून घेऊ शकाल.

२. आई-वडिलांविषयी काय विचाक केला?

मुलीला आपल्या आई-वडिलांची खूप काळजी असते. त्यावेळेस तुम्ही हा प्रश्न विचारू शकता की लग्नानंतर तुझ्या आई-वडिलांकडे कोण लक्ष देईल. त्यांच्या विषयी काय विचार केला आहेस? तिच्या उत्तरावरून तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल.

३. कसे कपडे घालायला आवडतात ?

कपडे म्हणजे मुलीसाठी महत्त्वाचा विषय. तिला कोणते प्रकारचे कपडे घालण्यास आवडतात. तिला वेस्टर्न आवडत असतील आणि तुमच्या घरी ते नसेल चालणार तर समस्या होऊ शकते. त्यामुळे ते जाणून घ्या.

४. विवाहाविषय काय विचार करतेस

मुलीला तिच्या होणाऱ्या पतीकडून लग्नाविषयी सल्ला घेण्यास नक्कीच आवडेल. ती तुमच्या सोबत लग्नाबाबत काय विचार करते हे देखील तुम्हाला कळेल.

५. करिअरविषयी तु काय विचार करतेस ?

मुलींना त्यांच्या करिअर बाबत विचारल्यास त्यांना आनंद होतो. तुम्ही तुमच्या करिअर विषयी तिला सांगा. तुम्हीही तिच्या करिअर विषयी जाणून घ्या. ती करिअर विषयी काय विचार करते. त्यावरून तिची इच्छा, ध्येय. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन माहित पडेल.
बेस्ट ऑफ लक
आपला भाऊ राजे

उत्तर लिहिले · 11/4/2019
कर्म · 65405
0
तुम्हाला मुलगी पसंत असेल तर तुम्ही पण तिला विचारा मी तुम्हाला पसंत आहे की नाही.. बस्स बाकी सर्व प्रश्न फालतू व फॉर्मॅलिटी असतात....
उत्तर लिहिले · 20/2/2020
कर्म · 16390
0
मुलगी बघायला गेल्यावर तिला विचारण्यासाठी काही प्रश्न खालील प्रमाणे:
  • तुम्ही काय करता? (तुमचा व्यवसाय काय आहे?)
  • तुमच्या कुटुंबाबद्दल काय सांगाल? (आई-वडील काय करतात, भावंडं किती आहेत?)
  • तुम्हाला काय आवडतं? (तुमचे छंद काय आहेत?)
  • तुम्ही भविष्यात काय करू इच्छिता? (तुमची ध्येये काय आहेत?)
  • तुम्हाला कोणत्या प्रकारचा जीवनसाथी हवा आहे?
  • तुम्ही लग्नानंतर नोकरी करणार आहात की नाही?
  • तुम्ही कुटुंबासोबतadjust कसं कराल?
  • तुम्हाला स्वयंपाक येतो का?
  • तुम्ही धार्मिक आहात का?
  • तुमचे विचार काय आहेत? (उदा. शिक्षण, समाज, राजकारण)
हे काही प्रश्न आहेत जे तुम्ही मुलगी बघायला गेल्यावर विचारू शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार प्रश्न विचारू शकता.
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1760

Related Questions

एस.सी. समाजात कोण येतं?
संयुक्त कुटुंब म्हणजे काय? संयुक्त कुटुंबाचे चार फायदे लिहा.
संयुक्त कुटुंब म्हणजे काय? संयुक्त कुटुंबाचे फायदे लिहा.
एकत्र कुटुंब पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती?
विवाहासाठी आवश्यक असलेले गुणधर्म कोणते?
आदिवासी प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने काय करायला हवे?
आदिवासी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना स्पष्ट करा?