3 उत्तरे
3
answers
बहुजन हिताय बहुजन सुखाय या वाक्याचा मराठीत अर्थ काय होतो?
7
Answer link
"बहुजन सुखाय, बहुजन हिताय च". - ऋग्वेद
बहु - अनेक, अधिक
जन - जन, माणूस
सुखाय - सुखप्राप्ती
हिताय - हित, चांगले होणे..
याचा अर्थ "सगळ्यांच्या आनंदासाठी, सुखासाठी.. सगळ्यांच्या हितासाठी"..
गौतम बुद्ध ह्यांनी पण त्यांच्या शिष्यांना इतरांच्या आनंदासाठी कार्यरत होण्यासाठी हे ब्रीदवाक्य सांगितले होते. तसेच स्वामी विवेकानंदांनी आणि श्री ऑरोबिंदू ह्यांनी पण हे सांगितले आहे.
हे वाक्य All India Radio(AIR) चे घोष वाक्य पण आहे.
संदर्भ:
विकिपीडिया :-)
2
Answer link
"बहुजन हिताय: बहुजन सुखाय:" असा अभिप्राय आहे की आर्यावर्तातील सर्व नागरिकांचे हित व्हावे आणि सर्व सुखाने राहावे. कोणामध्ये कधीही कोणताही भेदभाव नसावा. समाजामध्ये जे वर्गीकरण करतात आणि जात वा संप्रदायच्या आधारावर आपल्याला नीच वा उच्च मानणाऱ्यांच्या प्रती आचार्य चाणक्य यांनी हे मूल्य मंत्र सांगितले, जेणेकरून समाजामध्ये एकता आणि अखंडता बनी राहील आणि भारतातील सर्व वर्गांमध्ये मतभेद कधीही न व्हावा. समाज वर्णव्यवस्थेनुसार चालावा, जातीव्यवस्थेनुसार नव्हे.
0
Answer link
बहुजन हिताय बहुजन सुखाय या वाक्याचा अर्थ आहे:
बहुजन हिताय - जास्तीत जास्त लोकांचे हित साधणे.
बहुजन सुखाय - जास्तीत जास्त लोकांना आनंद देणे.
म्हणजेच, जास्तीत जास्त लोकांचे कल्याण आणि सुख (+ आनंद) ज्यात आहे, ते करणे.
हे वाक्य गौतम बुद्धांच्या शिकवणुकीतून आले आहे.