2 उत्तरे
2 answers

अँड्रॉइड ओरिओ म्हणजे काय?

7
अँड्रॉईड 'ओ' 8.0 चं अखेर नामकरण करण्यात आलं आहे. जगातील नंबर वन ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या अँड्रॉईडचं पुढचं व्हर्जन 'ओरिओ' या नावाने ओळखलं जाणार आहे. हे सर्वात वेगवान आणि स्मार्ट व्हर्जन असेल, असं गुगलने म्हटलं आहे.

अँड्रॉइडच्या 'ओ' आवृत्तीचे सर्व फीचर्स आधीच जाहीर करण्यात आले होते, मात्र त्याचं नाव अद्याप जाहीर न झाल्याने अँड्रॉईड यूझर्समध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती. अखेर ओरिओ या नामकरणामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. बॅटरी लाईफ, स्पीड आणि सिक्युरिटी या तीन गोष्टींवर नव्या आवृत्तीत भर देण्यात आला आहे.

वर्षाच्या सुरुवातीलाच अँड्रॉइड 'ओ'चा पहिला प्रिव्ह्यू सादर करण्यात आला होता. यानंतर मे महिन्यात झालेल्या
गुगलच्या परिषदेत या प्रणालीचं सादरीकरण करण्यात आलं. गुगल पिक्सल फोन, गुगल पिक्सल एक्सएल, गुगल पिक्सल सी, गुगल नेक्सस 6 पी, गुगल नेक्सस 5 एक्स आणि नेक्सस प्लेअर या मॉडेल्समध्येच ही प्रणाली वापरता येत होती.

ओरिओ म्हणजे काय?

ओरिओ हे एक बिस्कीट असून यात चॉकलेटच्या दोन चीप्समध्ये क्रीम भरलेलं असतं. जगातल्या बहुतांश देशांमध्ये ओरिओ हा ब्रँड प्रसिद्ध आहे.

स्वीट्सच्या नावांची परंपरा

अँड्रॉइड प्रणालीच्या विविध आवृत्त्यांना आजवर जगाच्या विविध भागात लोकप्रिय असणारे गोड पदार्थ, चॉकलेट्स, डेझर्टस् यांची नावे देण्यात आली आहेत. यात इंग्रजी अल्फाबेटनुसार पहिल्या दोन आवृत्तींना अल्फा आणि बीटा ही नाव देण्यात आली. त्यानंतर सी पासून कपकेक (1.5), डोनट (1.6), इक्लेअर्स (2.0, 2.1), फ्रोयो (2.2, 2.2.3), जिंजरब्रेड (2.3, 2.3.7), हनीकोंब (3.0 आणि 3.2.6), आईस्क्रिम सँडविच (4.0, 4.0.4), जेली बीन (4.1, 4.3.1), किटकॅट (4.4, 4.4.4 आणि 4.4W, 4W.2), लॉलिपॉप (5.0 आणि 5.1), मार्शमेलो (6.0) आणि नोगट (7.0). आता अँड्रॉइड ओ म्हणजेच 8.0 ही आवृत्ती ओरिओ या नावाने ओळखली जाणार आहे.




ओरिओची वैशिष्ठे काय?

1) पिक्चर इन पिक्चर मोड.

2) नोटिफिकेशन डॉट्स.

3) एका वेळेस २ युझर्स अॅप वापरू शकतील.

4) नवीन इमोजी येणार.

ओरिओची बीटा व्हर्जन या अगोदर आली होती पण आज 21 ऑगस्ट पासून होणारे हे पदार्पण अधिकृत असेल. पण ही व्हर्जन सगळ्यांना मिळे पर्यंत वेळ लागणार आहे कारण सुरुवातीला ही ऑपरेटिंग सिस्टम फक्त गुगलच्या पिक्सल आणि नेक्सस या डिव्हाईस वरच मिळतील.

उत्तर लिहिले · 21/2/2019
कर्म · 55350
0

ॲन्ड्रॉइड ओरिओ (Android Oreo) हे गुगलने (Google) तयार केलेले ॲन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमचे (Android operating system) एक व्हर्जन (version) आहे.

हे व्हर्जन २१ ऑगस्ट, २०१७ रोजी प्रकाशित करण्यात आले.

ॲन्ड्रॉइड ओरिओमध्ये खालील सुधारणा आणि वैशिष्ट्ये आहेत:

  • पिक्चर-इन-पिक्चर मोड: वापरकर्ते एकाच वेळी दोन ॲप्स वापरू शकतात.
  • नोटिफिकेशन चॅनेल: ॲप्स नोटिफिकेशन्सना वेगवेगळ्या चॅनेलमध्ये गटबद्ध करू शकतात.
  • ऑटोफिल फ्रेमवर्क: हे फिचर (feature) युजरनेम (username) आणि पासवर्ड (password) लक्षात ठेवते.
  • जास्त बॅटरी लाईफ: ॲन्ड्रॉइड ओरिओ बॅटरीची कार्यक्षमता सुधारते.

ॲन्ड्रॉइड ओरिओ हे ॲन्ड्रॉइड नोगट (Android Nougat) नंतरचे व्हर्जन आहे.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1420

Related Questions

लिनक्स म्हणजे काय?
यूजर इंटरफेस चालवते, कंप्यूटरची साधने नियंत्रित करते आणि प्रोग्राम चालवते?
अँड्रॉइड ११ मध्ये नवीन काय आहे?
मी एक कॉम्प्युटर गेमर आहे. माझ्या कॉम्प्युटरचे कॉन्फिगरेशन हाय आहे, जसे की i7 प्रोसेसर, 16 GB रॅम, 2 GB ग्राफिक्स कार्ड... तर मला कोणती विंडोज बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम परफेक्ट राहील माझ्या पीसीसाठी?
मला i5 चा लॅपटॉप हवा आहे ज्यात 2gb ग्राफिक्स कार्ड आणि 8 gb रॅम असेल आणि तो डॉस ऑपरेटिंग सिस्टममध्ये असेल असा कोणता लॅपटॉप चांगला आहे, कृपया सांगा.
लिनक्स बद्दल माहिती मिळेल का?
iOS आणि Android मधील फरक?