नोकरी मुलाखत भाषण व्यक्तिमत्व विकास

Self Introduction कसे द्यायचे आणि त्यामध्ये काय काय सांगावे लागते?

3 उत्तरे
3 answers

Self Introduction कसे द्यायचे आणि त्यामध्ये काय काय सांगावे लागते?

10
वेगवेगळ्या जागी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे इन्ट्रोडक्शन द्यायची गरज असते, प्रत्येक वेळी एकच प्रकार चालत नाही.

सर्वप्रथम तुम्हाला माहिती असले पाहिजे की कोणत्या ठिकाणी तुम्हाला इन्ट्रोडक्शन द्यायचे आहे,
जर तुम्ही एखाद्या वयक्तीला पहिल्यांदा भेटले तर

एखाद्या ऑफिस मध्ये बोलायचे असेल तर पुढीलप्रमाणे सुरू करा

हॅलो (सर / मॅडम वय लहान असेल तरीही ) - गुड मॉर्निंग - माझे नाव आलोक दिवटे आहे ( स्वतः चे नाव न सांगता तुम्ही समोर बोलले की करायला गेलेले काम नक्कीच होणार नाही ) - ( आता तुम्ही नाव सांगितलं पण तुमच्या कडे समोरच्या वयक्ती सोबत बोलण्याची काही Authority आहे का याकरता आपले पद सांगा)
मी कॉप्टरव्हीजन इन्फोकॉम प्रायवेट लिमिटेड या कंपनीचा डायरेक्टर ऑफ सेल्स आहे.- मग तुम्हाला कोणत्या विषयावर बोलायचे आहे ते सांगा.

Client समोर असेल तर पुढीलप्रमाणे सुरू करा

हॅलो सर/मॅडम/मॅम - गुड मॉर्निंग- कसे आहात (3-5 सेकंद थांबा) - मी आलोक - तुम्हाला काय मदत करू शकतो ?

Client ला तुम्ही कॉल केला असेल तर

हॅलो - गुड मॉर्निंग ____ (समोर च्या व्यक्ती के फक्त नाव किंवा आडनाव घ्या व सर/मॅडम नक्की लावा )- मी Qoptervzn Infocom मधून आलोक बोलत आहे (पद मोठं असेल तुमचं तर नावा सोबत आडनाव पण सांगा) - मग बोला "या" संबंधी माहिती द्यायला कॉल केलेला आहे.

Client ने पहिल्यांदा तुम्हाला कॉल केला असेल तर

हॅलो - मी Qoptervzn Infocom मधून आलोक बोलत आहे- आपली काय मदत करू शकतो - सामोरं चा व्यक्ती समस्या सांगेल मग म्हणा - सर/मॅम आपले नाव जाणू शकतो ?.- नाव सांगितले की पुढे बोलत असताना पहिल्या एक मिनिटात 3 वेळा त्या वयक्ती चे नाव घेऊन घ्या, मग दर 3 मिनिटात 1 दा त्या वयक्ती चे नाव घ्या.
कॉल कापताना आपले नाव पुन्हा सांगा व म्हणा तुम्ही माझे नंबर या नावाने सेव करून घ्या.व कधीही मला कॉल करा.

ऑफिस मध्ये वेगळ्या प्रकारे
इंटरव्ह्यू मध्ये वेगळ्या प्रकारे
क्लाइन्ट समोर वेगळ्या प्रकारे
शालेत वेगळ्या प्रकारे, कॉलेज मध्ये वेगळ्या प्रकारे.
फोन केला तर वेगळ्या प्रकारे, फोन आला तर वेगळ्या प्रकारे
असे 150+ इन्ट्रोडक्शन चे प्रकार आहेत.
तुम्हाला नेमक्या कोणत्या ठिकाणा करिता हवा आहे ते कळवा,

माझे नाव आलोक दिवटे व मी
Qoptervzn Infocom Pvt. Ltd.
या कंपनी मध्ये Director of Sales आहे.
कंपनी कोणत्या प्रकारे आपले सर्विस व प्रोडक्ट विकतील याचे प्लॅन्स तयार करणे व सेल्समन लोकांना त्याची ट्रेनिंग देने हे माझे काम आहे.
या कामाचे मला छंद आहे.

Sales, Communication,
Advertising व Marketing,
या बद्दल चे कोणतेही प्रश्न मला विचारू शकता.

आपल्या मराठी लोकांना फ्री मध्ये सगळ सांगायला व मदत करायला मला नक्कीच आनंद होईल.
उत्तर लिहिले · 20/2/2019
कर्म · 2970
9
१. आपल्या चेहऱ्यावर एक स्मिथ हास्य 😊  ठेऊन प्रारंभ करा  सगळ्यात आधी सुप्रभात किंवा जी वेळ असेल त्याचप्रमाणे ग्रीटिंग करावे.  त्यानंतर आपले नाव, ठिकाणा बद्दल तपशील द्या.
२. आपल्या शैक्षणिक तपशीलाबद्दल सांगा. 🎓
३. आपणास अनुभव असल्यास त्याबद्दल माहिती द्यावी.
४. एखादा जास्तचा शैक्षणिक course किंवा डिप्लोमा केला असेल तर त्याच्याबद्दल माहिती द्यावी . 📃🗞️
५. तुमच्या व्यक्तिमत्वा बद्दल माहिती द्यावी जसे की कठोर परिश्रम करणारा, सकारात्मक दृष्टीकोन असणारा .
६. मग आपल्या intrests/छंद बद्दल माहिती द्यावी. 🖌️
७. आवश्यक असल्यास केवळ आपले कौटुंबिक तपशील देऊ शकता 👨‍👩‍👧‍👧
८. मग शेवटी आपल्या मुलाखात घेणा-या व्यक्तीस धन्यवाद द्यावा. 🤝🙏


टिप:
    सगळ्यात महत्तवाचे self Introduction देताना तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहीजे कारण जो माणुस स्वताबद्दल आत्मविश्वासाने बोलु शकत नाही त्यावर कोणच विश्वास ठेवत नाही.

All the Best 😊✌️
उत्तर लिहिले · 19/2/2019
कर्म · 7975
0

Self Introduction (आत्म-परिचय) कसे द्यायचे आणि त्यामध्ये काय काय सांगावे लागते, याची माहिती खालीलप्रमाणे:

Self Introduction (आत्म-परिचय) म्हणजे काय?

Self Introduction म्हणजे स्वतःबद्दल माहिती देणे. हे तुम्ही नोकरीसाठी मुलाखत देताना, एखाद्या कार्यक्रमात किंवा नवीन लोकांना भेटताना उपयोगी ठरते.

Self Introduction मध्ये काय काय सांगावे:
  • नाव (Name):

    सर्वात आधी आपले पूर्ण नाव सांगा.

  • ठिकाण (Location):

    आपण कोठून आला आहात किंवा सध्या कोठे राहता, हे सांगा.

  • शिक्षण (Education):

    आपण काय शिक्षण घेतले आहे आणि कोणत्या संस्थेतून घेतले, याची माहिती द्या.

  • नोकरी किंवा व्यवसाय (Job or Business):

    आपण काय काम करता किंवा आपला व्यवसाय काय आहे, हे सांगा.

  • अनुभव (Experience):

    आपल्या कामाचा अनुभव किती आहे आणि कोणत्या क्षेत्रात आहे, हे सांगा.

  • कौशल्ये (Skills):

    आपल्यामध्ये कोणती विशेष कौशल्ये आहेत, जसे की भाषा, technical skills, किंवा इतर क्षमता.

  • आवडी (Hobbies):

    आपल्याला काय करायला आवडते, जसे की खेळ, वाचन, संगीत, किंवा चित्रकला.

  • ध्येय (Goals):

    आपले भविष्यकालीन ध्येय काय आहे, ते सांगा.

Self Introduction चे उदाहरण:

नमस्कार, माझे नाव [तुमचे नाव] आहे. मी [शहराचे नाव] येथे राहतो/राहते. मी [शिक्षणाचे नाव] शिक्षण घेतले आहे आणि [संस्थेचे नाव] मधून ते पूर्ण केले. मी [नोकरी/व्यवसाय] करतो/करते आणि मला [अनुभव] वर्षांचा अनुभव आहे. माझ्याकडे [कौशल्ये] कौशल्ये आहेत. मला [आवडी] करायला आवडते आणि माझे ध्येय [ध्येय] आहे.

टीप:

Self Introduction नेहमी स्पष्ट आणि संक्षिप्त ठेवा. बोलताना आत्मविश्वास ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन दर्शवा.

अधिक माहितीसाठी आपण खालील वेबसाईटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5300

Related Questions

स्वसामर्थ्याची ओळख यश प्राप्ती पर्यंत घेऊन जाते याची उदाहरणे मिळवा?
बालपणीचे अनुभव व व्यक्तिमत्व विकास यातील संबंध स्पष्ट करा?
हजरजबाबीपणा वाढविण्यासाठी काय करावे?
हजरजबाबीपणा नसल्यामुळे दुसऱ्यांसमोर कमजोर ठरतो का?
कोणत्याही क्षेत्रात कोणासारखे बनावे?
स्वतःचे व्यक्तिमत्व कसे वाढवावे?
स्वयं या पाठातून मानवी जीवन विकासासाठी स्वयं किती उपकारक ठरतो, असे साने गुरुजींनी कसे सांगितले ते थोडक्यात सांगा?