ग्रंथ आणि ग्रंथालय मराठी कविता कविता संग्रह साहित्य

काव्य फुले हा काव्य संग्रह कोणी लिहला?

3 उत्तरे
3 answers

काव्य फुले हा काव्य संग्रह कोणी लिहला?

1
महात्मा जोतीबा फुले यांच्या स्त्रीशिक्षणाच्या चळवळीत ५० वर्षाहून अधिक काळ त्यांना साथ करणारी सहचारिणी, मैत्रीण, कार्यकर्ती म्हणजे सावित्रीबाई. शूद्र व अतिशूद्रांना हीन दर्जाची वागणूक देणाऱ्या कर्मठांविरोधात बंडाचे निशाण फडकावणाऱ्या सावित्रीबाईंचा ‘काव्यफुले’ हा दलित साहित्याची पूर्वधारा सांगणारा पहिला काव्यसंग्रह १८५४ साली प्रकाशित झाला. वयाच्या अवघ्या तेवीस-चोविसाव्या वर्षीच त्यांनी लिहिलेल्या या कवितासंग्रहातून क्रांतिकारी विचार आणि निसर्गाची चौफेर उधळण करणारी काव्यसुमने रचली आहेत.
उत्तर लिहिले · 15/2/2019
कर्म · 2865
0
सावित्रीबाई फुले
उत्तर लिहिले · 27/7/2023
कर्म · 10
0

काव्य फुले हा काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांनी लिहिला आहे.

सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि कवयित्री होत्या. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि समाजातील अन्याय दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

काव्य फुले हा काव्यसंग्रह 1854 मध्ये प्रकाशित झाला. यात सामाजिक अन्याय, शिक्षण आणि निसर्गावरील कवितांचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5280

Related Questions

राम गणेश गडकरी यांचे काव्यसंग्रह कोणते?