2 उत्तरे
2
answers
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सोयराबाई यांचे निधन कसे झाले?
13
Answer link
शिवरायांच्या निधनानंतर सोयरामातोश्रींच्या मनात अण्णाजी दत्तो यांनी विष कालवले व बाळराजे राजाराम यांचे कटकारस्थान करून मंचकारोहण केले आणि दुसरीकडे शंभूराजांच्या अटकेसाठी अनाजी दत्तो, हंबीरराव मोहिते सारखे अनेक गेले पण हंबीरराव मोहिते यांनी स्वराज्याची बाजू धरून शंभूराजांची साथ दिली नंतर यामागचे कटकारस्थान करणारा नेमका कोण याचा शोध शंभूराजे घेऊ लागले. अनाजी दत्तो, सोमाजी आणि मोरोपंत यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सोयरा मातोश्री या कारस्थानात शामिल असल्याचे त्यांच्याकडून कळले. हंबीरराव मोहित्यांनी स्वतःच्या भाच्याचा बाळराजे राजारामांचा विचार न करता स्वराज्याचा विचार केला आणि शंभुराजांना राज गादीवर बसवले.
शम्भूराजे गादीवर बसताच कटकारस्थान करणारे अनाजी दत्तो, सोमाजी, हिरोजी, चिटणीस बाळाजी याना हत्तीच्या पायाखाली दिले. सोयरामातोश्रींच्या मनाचा ठाव हा कधीच कोणाला घेता आला नाही ना छत्रपती शिवाजी महाराजांना, ना शंभुराजांना. त्यांच्याकडून झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त त्यांनी स्वतः कोणी कल्पनाही करून घेणार नाही अश्या प्रकारे केले. तो दिवस म्हणजे १६८१ अश्विन मध्य प्रतिपदा. त्या दिवशी दिवस वर चढून आला तरीही त्यांच्या महालाचा दरवाजा हा उघडलेच नव्हता म्हणून तेथील पहारेकर्यांनी सुरुवातीला महालाचा दरवाजा ठोठावला, पण कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी महाराणी येसूबाई व राजाराम महाराजांना बोलावून घेतले.
त्यांनी देखील दरवाजा ठोठावून उघडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी देखील कोणताच प्रतिसाद न आल्याने येसूबाईंनी दरवाजा मोडून काढण्याचा हुकूम दिला. त्यानंतर त्यांना जे दृश्य दिसले ते अंगावर काटा आणणारे होते. मंचकावर सोयरा मातोश्री स्तब्ध पडलेल्या होत्या, त्यांच्या शेजारी रिकामी विषाची कुपी पडलेली होती. गडावरचे वातावरण मन सुन्न करणारे झाले होते राजारामराजे, येसूबाई याना शोक अनावर झालेला होता. शंभूराजे देखील या प्रकाराने सुन्न झालेले होते, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. शंभूराजे मनात म्हणाले आम्ही जर आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो असतो तर सगळे प्रश्न मिटले असते तुमचे, आमचे, आबासाहेबांचे आणि सर्वांचेच.

0
Answer link
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सोयराबाई यांचे निधन विषबाधेमुळे झाले.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांना राजगादी मिळू नये यासाठी सोयराबाईंनी काही लोकांसोबत षडयंत्र रचले. १६८१ मध्ये त्यांनी संभाजी महाराजांविरुद्ध कट रचला आणि राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला.
त्यानंतर संभाजी महाराजांनी सोयराबाईंना कैद केले आणि १८ ऑक्टोबर १६८१ मध्ये विष देऊन त्यांची हत्या केली.