कायदा मराठा कागदपत्रे जात प्रमाणपत्र

मराठा जात प्रमाणपत्र काढायचे आहे?

3 उत्तरे
3 answers

मराठा जात प्रमाणपत्र काढायचे आहे?

9
खालील परिपत्रकामध्ये संपूर्ण माहिती आहे. उत्तर खालील परिपत्रकामध्ये पहा.
उत्तर लिहिले · 15/12/2018
कर्म · 569245
3
⭕⭕  मराठा:जातीचा दाखला कसा काढायचा? वाचा प्रक्रिया ⭕⭕

राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाचा कायदा लागू केला आहे. विधीमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. तर, राज्यपालांच्या सहीनंतर हा कायदा 1 डिसेंबरपासून राज्यात लागू झाला आहे. मात्र, मराठा समाजातील मुलांनी जात प्रमाणपत्र कसे काढायचे हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यासाठी खालील प्रकियेचे अनुकरुन करावे लागणार आहे

💁‍♂जातीचा पुरावा काढा.
◾सर्वप्रथम तुमच्या नावापुढे "मराठा" असा उल्लेख असणारा इयत्ता पहीली ते इयत्ता बारावी पर्यंतच्या कोणत्याही एका वर्गातील तुमचा शाळा सोडल्याचा दाखला काढा.

◾जर तुम्हाला असा दाखला मिळाला नाही आणि तुम्ही महाविद्यालयात शिकत असाल तर तिथुन बोनाफाइड सर्टिफिकेट काढा.

💁‍♂13 ऑक्टोबर 1967 चा जातीचा पुरावा
तुमच्या वडिलांचा 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्यापुर्वी जन्म झाला असेल तर त्यांच्या दाखल्यावर "मराठा" अशी जात नमुद असलेला खालीलपैकी कोणताही एक पुरावा घ्या.

◾पहीली ते बारावी पर्यंतचा शाळा सोडल्याचा दाखला (ओरीजनल किंवा डुप्लीकेट) किंवा आधीच काढला असेल तर अशा दाखल्याची सत्यप्रत शिल्लक असेल तर ती घ्या.

◾जन्म-मृत्यू नोंदीचा महसुल अभिलेखातील उतारा

◾शासकीय-निमशासकीय नोकरीत असल्यास सेवापुस्तकाच्या पहिल्या पृष्ठाचा संबंधित कार्यालयाने जातीची नोंद साक्षांकित केलेला उतारा

◾समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जातीबाबत प्रमाणपत्र.

💁‍♂जातीचा दाखला नसेल तर?
काही कारणाने वडिलांचा जातीचा दाखला उपलब्ध होत नसेल तर, तुमच्या घरात 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्यापुर्वी जन्म झालेले तुमचे भाऊ, बहीण, चुलते, आत्या, आजोबा किंवा इतर रक्त नाते संबंधातील व्यक्ती यापैकी कोणीही असेल तर त्याची "मराठा" अशी जात नमुद असणारा वरीलपैकी कोणताही एक पुरावा घ्या.

🔖🔖 💁‍♂रहिवासी व ओळखीचा पुरावा घेणे.

1) रेशनकार्ड

2) आपले रेशनकार्ड घेऊन आपल्या भागातील तलाठी कार्यालयात जा.आपले रेशनकार्ड दाखवुन तलाठ्याकडुन तुमच्या नावाचा रहीवासी दाखला घ्या.
किंवा

3) लाईट बिल किंवा कर आकारणी पावती

४) मतदान ओळखपत्र/पैन कार्ड/ड्राइविंग लाइसेंस/कॉलेज ओळ्खपत्र/आधारकार्ड
अशा प्रकारे रहिवासी व ओळखीच्या पुराव्यासाठी तुमच्याकडे पुढील कागदपत्रे तयार ठेवा.

💁‍♂तहसीलदार कार्यालयातून जातीचा दाखला काढणे.
1) तुमच्या जातीचे, रहिवासी व ओळखीचे पुरावे घेऊन तहसीलदार कार्यालय मधे जा.

2) तेथुन जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक असणारा अर्ज घ्या. अर्ज व्यवस्थित भरुन आवश्यक तेथे तुमची सही करा. अर्जावर 10 रु. किंमतीची तिकीटे/कोर्ट फी स्टँप लावा.

🔖🔖 💁‍♂पुढीलप्रमाणे कागदपत्रे जोडा

◾पुर्ण भरलेला व तिकीटे लावलेला अर्ज

◾रेशनकार्डची सत्यप्रत

◾रहिवासी दाखला

◾तुमच्या जातीच्या पुराव्याची सत्यप्रत

◾13 ऑक्टोबर 1967 च्या जातीच्या पुराव्याची सत्यप्रत

◾साध्या कोऱ्या कागदावर जातीबाबत व वंशावळीबाबत तुमचे स्वतःचे सत्य प्रतिज्ञापत्र व त्यावर 5 रु. चे तिकीट/कोर्ट फी स्टँप

अ) अर्जदार सज्ञान असल्यास स्वतःने केलेले प्रतिज्ञापत्र

ब) अर्जदार अज्ञान असल्यास त्याचे आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान पालकाने अर्जदाराच्या नावाने केलेले प्रतिज्ञापत्र.

💁‍♂कार्यालयीन प्रक्रिया
◾हा पुर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला अर्ज घेऊन सेतुमधे जा.

◾सेतुमध्ये अर्ज व त्यावरील माहिती अचुक भरली आहे का ते तपासुन घ्या.

◾शिक्के मारलेल्या अर्जावर व प्रतिज्ञापत्रावर सक्षम प्राधिकाऱ्याची सही घ्या.

◾सही झाल्यानंतर तुमचा अर्ज सेतु मधे जमा करा.

◾अर्ज जमा केल्यानंतर त्याची पोचपावती/टोकन घ्यावे.सदर टोकन वर तुमचा जातीचा दाखला मिळण्याची तारीख दिली जाते.हे टोकन जपुन ठेवावे.

❗ जातीचा दाखला मिळेपर्यंत शालेय कामांसाठी हे टोकन दाखवले तरी चालते. ❗



उत्तर लिहिले · 13/12/2018
कर्म · 1100
0

मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे आणि प्रक्रियेची आवश्यकता असेल:

  1. आवश्यक कागदपत्रे:
    • अर्जदाराचा जन्म दाखला.
    • शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate).
    • रेशन कार्ड (Ration Card).
    • आधार कार्ड (Aadhar Card).
    • पॅन कार्ड (Pan Card).
    • मतदान कार्ड (Voter ID).
    • अर्जदाराच्या वडिलांचे किंवा कुटुंबातील सदस्यांचे जात प्रमाणपत्र (असल्यास).
    • १९६७ पूर्वीचे महसूल किंवा शालेय अभिलेखातील पुरावे (उदाहरणार्थ, जन्मनोंद, जमिनीचे अभिलेख).
    • affidavit ( प्रतिज्ञापत्र )
  2. प्रक्रिया:
    • प्रथम, तुम्हाला तहसील कार्यालयात किंवा सेतू केंद्रावर जाऊन अर्ज प्राप्त करावा लागेल.
    • अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडा.
    • अर्ज सादर करा आणि पावती घ्या.
    • तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल.
    • पडताळणीनंतर, तुम्हाला जात प्रमाणपत्र मिळेल.
  3. कुठे अर्ज करावा:
    • तहसील कार्यालय (Tehsil Office).
    • सेतू केंद्र (Setu Kendra).
    • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: आपले सरकार

टीप: मराठा जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी, तुमच्याकडे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1780

Related Questions

मी SC कॅटेगरीत आहे, मला माझ्या मुलींचा जातीचा दाखला काढायचा आहे. माझ्याकडे कागदपत्रांसाठी 1950 अगोदरचे कोणतेही कागदपत्र नाही, तर मी काय करावे?
कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी यामध्ये काय फरक आहे? जात मराठा आहे पण आरक्षणासाठी कुणबी काढले आहे. जातीच्या दाखल्यावर फक्त कुणबी असा उल्लेख आहे, मराठा कुणबी असा नाही, तर फक्त कुणबी उल्लेख असल्यामुळे अडचण येणार नाही ना?
माझ्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू-मराठा जात लिहिली आहे आणि माझ्या वडिलांच्या दाखल्यावर हिंदू-इतर लिहिले आहे, तर मी हिंदू ओबीसीचा दाखला काढू शकतो का? वडिलांचा जन्म 1964 सालचा आहे, पण आजोबांच्या दाखल्याचा काहीच पुरावा मिळत नाही, म्हणून मी ओबीसीचा दाखला काढू शकतो का?
भारतीय सैन्य मध्ये जात वैधता SC जाती साठी लागू आहे का?
माझ्या शाळेतील दाखल्यावर हिंदू वंजारी मराठा अशी जात लागली आहे, माझी जात हिंदू वंजारी आहे. मला दाखल्यावर हिंदू वंजारी जात लावायची आहे, त्यासाठी काय करावे लागेल?
माझे वडील कर्नाटकचे होते, जन्म १९४७ चा आहे. ते चाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात स्थायिक झाले. ते आता हयात नाहीत. मला अनुसूचित जातीचा दाखला दोन्हीकडील तहसीलदार नाकारत आहेत. मी काय करावे? जातीचा पुरावा कर्नाटकचा व इतर सर्व महाराष्ट्रातील आहे.
मी ओबीसी आहे, मला ओपन मध्ये जात बदल करता येणार का?