बायकोशी नवऱ्याने कसे वागावे?
*दुःख समजून घ्यावे*
*रविवारी तरी बिचारीला*
*जास्त झोपू द्यावे*
*काय हरकत आहे तिला*
*चहा करून द्यायला*
*विसरू नये जास्त दुध*
*आणि अद्रक घालायला*
*विनाकारण खुसपट काढून*
*आदळ-आपट करू नये*
बागलेतले काढून उगी
*बाजारात मांडू नये*
*सकाळ संध्याकाळ ती*
*किचन मध्येच असते*
*सांगा बर किती वेळ*
*तक्क्याला टेकून बसते ?*
*म्हणून तिला रविवारी*
*सुट्टी दिली पाहिजे*
*हॉटेल मध्ये जेवणाची*
*ऑफर दिली पाहिजे*
*माणूस म्हणून तिच्याकडे*
*थोडं तरी बघा*
*मोलकरीण नाही पत्नी आहे*
*ती आनंदाने जगा*
*असू द्या तुझ्या डायरीत*
*तिच्या कष्टांची नोंद*
*कधीतरी तिचं नांव*
*तुझ्या हातावर गोंद*
*म्हणून तरी पहा तिला*
*चल सिनेमाला जाऊ*
*येता येता हॉटेल मध्येच*
*तुझ्या आवडीचं खाऊ*
*ती कुठे म्हणत असते*
*युरोप टूरला जाऊ*
*गोडी गोडीत म्हणा यंदा*
*माथेरानच पाहू*
*येताजाता घालून पाडून*
*बोलणं तुम्हाला शोभतं का ?*
*बघा थोडं बायकोचा*
*मित्र होता येतं का ?*
*छोट्या छोट्या demand असतात*
*पूर्ण करायला शिका*
*नेहमी नेहमी काढू नये
*फक्त तिच्याच चुका*
*मोकळे पणाने बोलायला*
*पैसे थोडेच लागतात*
*काही काही नवरे बायकोशी*
*विचित्रपणेच वागतात*
*ती समोर दिसली की*
*वेडं-वाकडं तोंड करतात *
*स्पष्ट ऐकू येत नाही पण*
*काहीतरी बोलतात*
*खवचटपणा सोडून देऊन*
*जरा नीट वागा*
*गुलुगुलु कसे बोलतात*
* थोडं शेजारी पण बघा*
*बायको म्हणजे लफडं थोडंच*
*झालं काय लाजायला ?*
*कुठे कुणाची हरकत आहे*
*हातात हात घेऊन बोलायला ?*
*सुकलेली दिसतेस आज*
*तुझं काही दुखतंय का ?*
*खरं सांग माझ्या वागण्यात*
*कुठे काही चुकतंय का ?*
*मनांत काही ठेऊ नकोस*
*मोकळेपणाने बोल*
*तुझ्या भावना माझ्यासाठी*
*आहेत खूप अनमोल*
*तिचे काही चुकले तर*
*एकांतात सांगावे*
*पोरं सोरं सुनां समोर*
*आदरानेच बोलावे*
*दोघांनीही मान्य कराव्यात*
*आपल्या आपल्या चुका*
*भांडण करायला काय लागतं*
*Sorry म्हणायल शिका
🙏🙏🙏😀😀😀
राजे
१५ व्या शतकातील एक काव्य आहे हे... आर्थर नावाचा एक तरुण राजा होता. शेजारच्या राज्यातल्या सम्राटाने त्याच्यावर हल्ला करून त्याला कैद केलं. त्याला मृत्युदंडच देण्यापूर्वी त्याचं कोवळं वय आणि त्याचे आदर्श विचार बघता त त्याने आर्थरपुढे एक पर्याय ठेवला. आर्थरने जर सम्राटाच्या एका कठीण प्रश्नाचं उत्तर दिलं तर सम्राट त्याला सोडून देईल. आर्थरला प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एक वर्षांची मुदत दिली. या मुदतीत जर तो प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही, तर त्याला मृत्यूदंड नक्कीच होता.
प्रश्न असा होता- स्त्रियांना खरोखरच काय हवं असतं?
हा प्रश्न नक्कीच खूप अवघड होता पण मरण्यापेक्षा बरं म्हणून त्याने सम्राटाचा प्रस्ताव स्वीकारला.
आता त्याच्याकडे एक वर्षांचा अवधी होता. तो त्याच्या राज्यात परत आला धर्मगुरू, पंडित , सेनापती अगदी दरबारातल्या विदूषकालाही त्याने विचारलं. मात्र कुणीच त्याला समाधानकारक उत्तर देऊ शकलं नाही.
अनेक लोकांनी त्याला म्हाताऱ्या चेटकिणीचा सल्ला घ्यायला सांगितला. तिच्याकडेच या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता होती. पण सल्ला देण्यासाठी ती जे मूल्य आकारत असे, ते खूप महाग होतं. त्यामुळेच ती प्रसिद्ध होती.
वर्षांचा शेवटचा दिवस उगवला आणि आर्थरपुढे त्या चेटकिणीशी बोलण्याशिवाय दुसरा काही पर्यायच उरला नाही. तिने त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं कबूल केलं पण त्याने आधी तिचं मूल्य कबूल करावं अशी तिची अट होती. म्हाताऱ्या चेटकिणीला सर लॅन्सलॉटशी लग्न करायचं होतं जो एक उमदा सरदार आणि आर्थरचा अगदी जवळचा मित्र होता.
आर्थर ही मागणी ऐकून शहारलाच. म्हातारी अतिशय कुरूप होती. तिला पाठीवर कुबड होतं. एकच पुढे आलेला मोठा दात होता. तिच्या अंगाला दुर्गंधी यायची. ती काहीतरी बीभत्स आवाज काढत बोलायची. आयुष्यात इतक्या घृणास्पद प्राण्याशी त्याची गाठ पडली नव्हती.
या म्हातारीशी लग्न करून आयुष्यभराचा त्रास मित्राला सहन करायला लॅवायचा हे काही आर्थरला पटलं नाही. त्याने काही त्याच्या मित्राला लग्न करायला सांगितलं नाही. पण लान्सलॉटला या प्रस्तावाबद्दल कळलं, तेव्हा तो आर्थरला म्हणाला-
आर्थरच्या जिवापुढे दुसरा कुठलाच त्याग मोठा ठरणार नाही. म्हणून मग लग्नाची घोषणा करण्यात आली.
चेटकिणीने आर्थरच्या प्रश्नाचं उत्तर असं दिलं- बाईला खरोखर काय हवं असतं, तर स्वत:च्या आयुष्यावर स्वत:चा ताबा. म्हणजेच आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य.
राज्यातल्या प्रत्येकाला ताबडतोब हे उमजलं, की चेटकिणीने एक महान सत्य सांगितलं आहे आणि आर्थरला आता जीवदान मिळणार.
आणि तसंच झालं.
शेजारच्या सम्राटाने आर्थरला मुक्त केलं.
लॅन्सलॉट आणि चेटकिणीचं मस्तपैकी लग्न झालं. मधुचंद्राचा क्षण आला. लॅन्सलॉटने त्या भयानक अनुभवाला कणखरपणे सामोरं जाण्याची तयारी करत शयनगृहात प्रवेश केला.
पण त्याच्यासमोर काय वाढून ठेवलं होतं!
त्याने आतापर्यंत कधीही बघितली नव्हती, अशी एक सौंदर्यवती त्याच्यासमोर मंचकावर पहुडली होती.
आश्चर्याने थक्क झालेल्या लॅन्सलॉटने काय घडलं, ते विचारलं. ती सौंदर्यवती म्हणाली की, ती चेटकिणीच्या भयानक रूपात असतानासुद्धा तो तिच्याशी दयाळूपणे वागला, म्हणून आता ती अर्धा वेळ चेटकिणीच्या विद्रूप रूपात, तर अर्धा वेळ सौंदर्यकन्येच्या रूपात राहील.
आता तो काय अधिक पसंत करील?
सौंदर्यवती दिवसा.. का रात्री?
लॅन्सलॉटने निर्माण झालेल्या परिस्थितीचा गंभीरपणे विचार केला.
दिवसा मित्रांसमोर मिरवायला एक लावण्यवती आणि स्वत:च्या राजवाडय़ात, एकांतात-एक कुरूप चेटकीण?
की दिवसा एक कुरूप चेटकीण, पण रात्री एक सौंदर्यवती- उत्कट क्षण उपभोगण्यासाठी?
काय आवडेल त्याला?
तुम्ही काय कराल?
लॅन्सलॉटने केलेली निवड पुढे दिली आहे; पण त्याचं मत जाणून घेण्याआधी तुमची निवड नक्की करा. ठीक आहे?
उमद्या मनाचा लॅन्सलॉट म्हणाला, काय निवड करायची, याचे अधिकार तो तिलाच देत आहे. तिनेच ते ठरवावं.
हे ऐकून ती सर्व वेळ सुंदरच राहील, असं तिनं जाहीर केलं. कारण त्याने तिच्या आयुष्यावर तिचंच नियंत्रण असण्याच्या तिच्या हक्काचा आदर केला होता....
तात्पर्य : बायकोच्या मताचा आदर करा, मत स्वातंत्र्य द्या..
1. आदर: बायकोचा आदर करणे खूप महत्त्वाचे आहे. तिच्या मतांचा, भावनांचा आणि निर्णयांचा आदर करा. तिला कमी लेखू नका.
2. प्रेम: बायकोवर प्रेम व्यक्त करणे महत्त्वाचे आहे. तिला वेळोवेळी 'मी तुझ्यावर प्रेम करतो/करते' हे सांगा. तिला स्पर्श करा, मिठी मारा आणि तिची काळजी घ्या.
3. संवाद: बायकोशी मनमोकळा संवाद साधा. तिच्याशी प्रत्येक विषयावर बोला. तिचे विचार आणि समस्या समजून घ्या.
4. साथ देणे: बायकोला तिच्या कामात आणि स्वप्नांमध्ये साथ द्या. तिला प्रोत्साहन द्या आणि तिची मदत करा.
5. समजूतदारपणा: बायकोच्या चुका माफ करा आणि तिच्याशी समजूतदारपणे वागा. प्रत्येक व्यक्तीकडून काही चुका होतात, त्यामुळे तिला समजून घेणे महत्त्वाचे आहे.
6. वेळ देणे: बायकोला वेळ देणे खूप महत्त्वाचे आहे. तिच्यासोबत फिरायला जा, चित्रपट बघायला जा किंवा घरी गप्पा मारा.
7. मदत करणे: घरातील कामांमध्ये बायकोला मदत करा. तिला कामाचा ताण कमी करण्यासाठी मदत करा.
8. सरप्राईज देणे: बायकोला वेळोवेळी सरप्राईज द्या. तिला आवडणाऱ्या गोष्टी करा, जसे की तिला फूल देणे किंवा तिच्यासाठी खास जेवण बनवणे.
9. प्रामाणिकपणा: बायकोशी नेहमी प्रामाणिक रहा. तिच्यापासून काहीही लपवू नका.
10. विश्वास: बायकोवर विश्वास ठेवा. तिच्यावर संशय घेऊ नका.
हे काही मुद्दे आहेत ज्यांच्या आधारावर नवऱ्याने बायकोशी चांगले संबंध ठेवता येतील.