2 उत्तरे
2
answers
अरबी समुद्रातील प्रवाळ बेटांची नावे सांगा?
1
Answer link
कोकण किनारपतट्टीला विजयदुर्गापासून 100ते110 किमी अंतरावर नवीन काही प्रवाळ बेटांचा शोध लावण्यात आला आहे, यांना कान्होजी आंग्रेंच्या स्मरणार्थ 'आंग्रे किनारा' (Angria Bank) असे नामकरण करण्यात आले आहे. याखेरीज लक्षद्वीप द्वीपसमूहात काही बेटे आहेत त्यांची माहिती खालीलप्रमाणे:
भारताचा केंद्रशासित प्रदेश व अरबी समुद्रातील एक द्वीपसमूह. ८० ते १२० १३’ उ.अक्षांश आणि ७१० ते ७४०पू. रेखांश यांदरम्यान याचा विस्तार आहे. या द्वीपसमूहात २० प्रवाळ बेटांचा समावेश असून त्यांत १२ कंकणद्वीपे, ३ प्रवाळशैलभित्ती व ५ निमज्जित किनारपट्ट्या आहेत. सर्व बेटांचे एकूण क्षेत्रफळ ३२ चौ.किमी असून ॲन्ड्रोथ (क्षेत्रफळ ४.८ चौ.किमी.-लोकसंख्या ६,८१२-१९८१), अमिनी (२.६-५,३६७), अगत्ती (२.७-४,१११), बित्रा (०.१-१८१), चेटलट (१.०-१,४८४), काडमट (३.१-३,११४), काल्पेनी (२.३-३,५४३), काव्हारट्टी (३.६-६,६०४), किल्टन (१.६-२,३७५) व मिनिकॉय (४.४-६, ६५८) या प्रमुख दहा बेटांवरची एकूण लोकसंख्या ४०,२४९ होती (१९८१). सर्वात कमी लोकसंख्या बित्रा या बेटावर असून कोणत्याही बेटाची रुंदी २ किमी.पेक्षा अधिक नाही. केरळ राज्यातील कोचीन शहरापासून लक्षद्वीप बेटे सु. २२० ते ४४० किमी. अंतरावर आहेत. काव्हारट्टी हे या प्रदेशाच्या राजधानीचे ठिकाण आहे

0
Answer link
अरबी समुद्रातील प्रवाळ बेटांची काही प्रमुख नावे खालीलप्रमाणे आहेत:
- लक्षद्वीप बेटे: ही भारतातील केंद्रशासित प्रदेश आहे. लक्षद्वीपमध्ये अनेक प्रवाळ बेटे आहेत, त्यापैकी काही प्रमुख बेटे खालीलप्रमाणे:
- कवरत्ती
- अमिनी
- अगाती
- मिनिकॉय
- मालदीव: मालदीव हे बेट राष्ट्र हिंदी महासागरात (अरबी समुद्राचा भाग) स्थित आहे. हे राष्ट्र हजारो प्रवाळ बेटांनी बनलेले आहे.
- चागोस द्वीपसमूह: हा हिंदी महासागरात स्थित आहे. या द्वीपसमूहात साठहून अधिक प्रवाळ बेटे आहेत.
टीप: ही माहिती विविध स्त्रोतांवर आधारित आहे आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी अद्ययावत माहिती घेणे आवश्यक आहे.