2 उत्तरे
2
answers
लॉटरी लागली असा मेसेज येतो, खरे काय?
1
Answer link
(३ डिसेंबर २०१७ ची माहिती सेवाची फेसबुक पोस्ट)
_____________
*🌀 अब दुनिया झुकनेवाली नही! 🌀*
मुख्य बातमी
कोल्हापूर : विजय पाटील
आपल्याला 100 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. आपला मोबाईल क्रमांक आम्ही निवडला असून, आपल्याला 10 कोटी रुपये तत्काळ ट्रान्स्फर करायचे आहेत..अशा आशयाचे संदेश आणि कॉल्स कुणालाही येतात. हे बनावट कॉल सबंधितांकडून बँकेसंदर्भात तसेच एटीएमसंदर्भात सगळी गोपनीय माहिती काढून घेऊन समोरच्याला क्षणभरात कंगाल करून सोडतात; पण यापुढे अशी फसवणूक होऊ नये यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) थेट मैदानात उतरली आहे. आरबीआयच्या वतीने मोबाईल मेसेज पाठवून तसेच व्हॉईस कॉलद्वारे जनजागृती केली जात आहे.
‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये’ हा प्रसिद्ध डायलॉग भुरट्या माफियागिरीसाठी मंत्र असतो. ही मंडळी नियोजनबद्धरीत्या मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर करून सध्या अनेकांना कंगाल करत सुटली आहेत. माणसांना लुभावणारे आणि हाव सुटण्यास भाग पाडणारे मोबाईल मेसेज पाठवून जाळे विणले जाते. या जाळ्यात अडकलेले सावज अतीलोभापायी मागेल ती माहिती देत जाते. या माहितीचा वापर करून मग संबंधिताचे बँक खाते रिकामे केले जाते. एटीएममधील पैसे सहजपणे उडवले जातात. ही फसवणूक सहजपणे केली जाते हे माहिती असूनही कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक दररोज देशाच्या कानाकोपर्यात होते.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=434331450298117&id=100011637976439
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
आता या फसवणुकीला आळा घालण्यासाठी आर्थिक शिखर संस्था असलेली आरबीआयच मैदानात उतरली आहे. आरबीआय कडून मोबाईलधारकांना सावध राहण्याचे संदेश पाठवले जात आहेत. या संदेशातून फसवणूक कशी केली जाते याचीही माहिती देण्यात येत आहे. तसेच फसवणूक झाल्यास कोणत्या विभागाला तक्रार करायची याबाबतही मार्गदर्शन केले जाते. या संदेशामुळे लोकांमध्ये फसवणुकीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. या चर्चामुळे जनजागृती अधिकच व्यापक होत असल्याचे दिसते. अधिक माहिती असल्यास आरबीआयने दिलेल्या क्रमांकावर मिस कॉल दिल्यास तत्काळ संबंधिताला फोनवरून सर्व माहिती दिली जाते. यासह आरबीआयने जनजागृतीसाठी ीरलहशीं.ीलळ.ेीस.ळप हे संकेतस्थळ प्रसारित केले आहे. या वेबपेजवर तक्रारीची सुविधा आहे.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
एकूणच आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी या चांगल्या उपक्रमाची माहिती नक्कीच घ्यायला हवी. आरबीआयने मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू केल्याने ऑनलाईन फसवणूक करणार्यांना आता ‘अब दुनिया झुकनेवाली नही,’ असा संदेश जाण्यास वाव आहे.
____
0
Answer link
lottery लागल्याचा मेसेज (message) खरा आहे की नाही हे तपासण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या:
lottery संदर्भात फ्रॉड (Fraud ) होण्याची शक्यता असते त्यामुळे खात्री केल्याशिवाय कोणतीही माहिती share करू नये.
- संदेश (message) : लॉटरी जिंकल्याचा संदेश अनपेक्षितपणे आला असेल, तर तो संशयास्पद असू शकतो.
- अधिकृतता : लॉटरी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा खात्रीशीर माध्यमातून माहिती तपासा.
- शुल्क (fees) : लॉटरी जिंकल्याबद्दल पैसे काढण्यासाठीprocess fees किंवा tax भरण्याची मागणी केली जात असेल, तर तो घोटाळा असू शकतो.
- संपर्क : लॉटरी कंपनीच्या Customer care number वर संपर्क साधा.