लेखन लेखन प्रक्रिया पुस्तके लिखाण

पुस्तक लिहिण्याची सुरुवात कशी करावी आणि त्यासाठी काय काय करणे गरजेचे असते, कृपया मुद्देसूद सांगावे?

2 उत्तरे
2 answers

पुस्तक लिहिण्याची सुरुवात कशी करावी आणि त्यासाठी काय काय करणे गरजेचे असते, कृपया मुद्देसूद सांगावे?

8
प्रथम आपण आपले लिखाण डॉक्युमेंट फोर्मेटमध्ये तयार करून घेतले पाहिजे.आपण पुस्तक लिहिताना जर आपणास पेज फुल्ल कागदाच्या साईझचे हवे असेल तर पेजची साईझ A4 ठेवावी.

जर आपणस पुस्तक हे नेहमीच्या पुस्तकी साईझ प्रमाणे हवे असल्यास पेज लेआउट मध्ये जाऊन पेज चा साईझ 5.5 X 8.5इतका ठेवावा.

तसेच पेज बोर्डर मध्ये जाऊन चोकोनी एकेरी बोर्डर सिलेक्ट केल्यास पेज एका चौकोनात फिट झाल्यासारखे दिसते.

आपणास हवा असेल तो फोन्ट सिलेक्ट करणे जर आपण इंग्रजीत लिहीत असाल तर शक्यतो Arial किंवा Times New Roman हे फोन्ट वापरावेत.

आपणस जर मराठीत लिहायचे असेल तर आपणस पुढील  लिंकवर जाऊन आपल्या कॉम्प्युटर वर मराठी इन्स्टॉल करू शकता.

आपल्या नेहमीच्या लेखनाचा साईझ १० ते ११ हा ठेवावा व टायटल बोल्ड फोन्ट मध्ये ठेवावीत.

 पुस्तक लिहिताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी :

प्रथम आपण काय लिहिणार आहोत याची एक रूपरेषा बनवावी. प्रथम विषयाची ओळख नंतर एक एक भाग निरनिराळ्या विभागात सविस्तरपणे मांडावा.

प्रत्येक नवीन भागाची सुरवात आधीच्या भागाला लिंक करून चालू करावी व शेवटी आपण पुढील भागात काय शिकणार आहात याबद्दल महिती द्यावी.

पुस्तकात चित्रे, आकृत्या, नकाशे,  टेबल यांचा आवर्जून वापर करावा यामुळे बऱ्याच गोष्टी वाचकांना समजण्यास सोप्या जातात व पुस्तकही सुंदर दिसते.

आपण पुस्तकाच्या शेवटी संदर्भ व आभार पत्र तसेच इतर महिती लिहू शकतो.

आपल्या पुस्तकाच्या आराखड्यानुसार अनुक्रमणिका बनवावी व त्यानुसार आपण आपले संपूर्ण लेखन मायक्रोसोफ्ट वर्ड मध्ये लिहून काढावेत.

जर आपण स्टोरी लिहीत असला तर प्रथम आपल्या कथेतील पात्रे त्यांची नावे त्यांचे वर्णन व स्वभाव कसा असेल या बद्दल विचार करून लिहून ठेवा.

तसेच कथेतील ठिकाण व प्रसंग चितारताना अत्यंत बारकाईने आजूबाजूच्या वातावरणाचे वर्णन करावे.एक आभासी जग तयार करून ते वाचकांसमोर मांडावे, जेणे करून वाचकांना आपण त्या नवीन जगात जाऊन आपण कथेतील पात्रांबरोबर कथेची अनुभूती घेत आहोत असे वाटेल.

कथेत वापरले जाणारे पात्रांच्ये तोंडचे संवाद,धावते वर्णन ,चालू वर्तमानकाळ यांचा वापर कथेला जिवंतपणा देतात.

कथेत टर्न ,ट्वीस्ट ,मसाला ,धक्का ,गोडवा यांचे मिश्रण असेल तर वाचकाकडून मस्त प्रतिसाद मिळतो.

पुस्तकाचे मुखपृष्ठ :

पुस्तकाच्या मुखपृष्ठाला अनन्यसाधारण महत्व आहे ..बऱ्याचदा वाचक हा मुखपृष्ठ पाहूनच पुस्तकाकडे आकर्षिला जातो.

आपल्या पुस्तकाच्या कव्हर वर ठळक दिसणारे पुस्तकाचे नाव असावे,तसेच एका ओळीत आणखी काही  महिती किंवा दर्शनी ओळ किंवा त्यात नक्की काय आहे याची हिंट देणारी ओळ थोड्या लहान फोन्ट मध्ये लिहावी.

पुस्तकाच्या खाली लेखकाचे नाव किंवा टोपणनाव (प्रसिद्ध असेल तर) तसेच लेखकाच्या अचिव्हमेंट बद्दल त्याच्या बद्दल एखाद्या ओळीत लहान फोन्ट मध्ये महिती द्यावी (उदा :xxx  या प्रसिद्ध पुस्तकाचे लेख ,शिक्षण ,पुरस्कार ).

मुखपृष्ठावरचे चित्र आकर्षित व पुस्तकाच्या गाभ्याला व नावालाअनुसरून असावे.आपण काही चित्रकार किंवा प्रोफेशनल कव्हर डिझाईनर याकडून रेडीमेड कव्हर तयार करून घेवू शकता किंवा स्वतः फोटो शॉप किंवा पेंट तसेच इंटरनेटवरील चित्रांच्या मदतीने कव्हर तयार करू शकता.

अँमेझोनवर खास कव्हर डिझाईनचे सोफ्टवेअर देण्यात आलेले आहे याद्वारे आपण पुस्तक जर अँमेझोनवर प्रदर्शित करणार असाल तर आपले लॉग इन करून कव्हर डिझाईनर च्या मदतीने मस्त मस्त कव्हर अतिशय सोप्या पद्धतीने तयार करू शकता.

पुस्तकाचे मलपृष्ठ :

पुस्तकाचे शेवटचे पण हे आधीच्या प्रदर्शित पुस्तकांच्या प्रसिद्धीसाठी वापरणे असा प्रघात आहे .

शेवटच्या पानावर आधीची पुस्तके त्यांची महिती तसेच आगामी पुस्तके यांचीही थोडक्यात महिती द्यावी.

तसेच काही वेळा शेवटच्या आपणावर लेखकांचा फोटो व त्यांचे कार्ये ,शिक्षण यांचीही सविस्तर महिती दिली जाते.

पुस्तकाचे आवृत्ती क्रमांक तसेच नोंदणी क्रमांक,किंमत ही महिती कोपऱ्यात द्यावा.

काही वेळा मुखपृष्ठाला मँच होणारे एखादे सोफ्ट डिझाइन ,नक्षीकाम ही आपण मलपृष्ठावर वापरू शकतो.

पी डी एफ फोर्मेट मध्ये पुस्तक तयार करणे:  

आपण लिहिलेले लिखाण कोणीही बदलू नये यासाठी ते पी डी एफ या फोर्मेट मध्ये कन्व्हर्ट करावे जेणेकरून त्याचे फोर्मेटिंग कायम राहील व व लिखाण रीड ओन्ली मोड मध्ये राहील.

आपले संपूर्ण लेखन व कव्हर्स तयार झाल्यावर आपण ते पीडीएफ फोर्मेट मध्ये कन्व्हर्ट करावेत .

आपले कव्हर व लिहिलेले टेक्स्ट यांचा पेज साईझ एकाच असावा,यासाठी आपण आपले कव्हर फोटो मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये पेस्ट करून ते पेज आपल्या पुस्तकाच्या आकाराच्या इतके बनवून नंतर ते वेगळे वेगळे ठेवून पीडीएफ मध्ये कन्व्हर्ट करून मग मर्ज करावे.

यासाठी आपण पुढील सोफ्टवेअर वापरू शकता. :

Cute PDF : [http://www.cutepdf.com/products/cutepdf/writer.asp] ,PDF converter,

तसेच आपण ऑनलाईन पीडीएफ कन्व्हर्ट करू शकता.

लिंक : https://www.wordtopdf.com/

आपले पेज पी डी एफ मध्ये कन्व्हर्ट झाले की मग त्यावर आपण कव्हर पेज मर्ज करून फायनल कॉपी तयार करू शकतो.

पीडीएफ जोडण्यासाठी : PDF Split Merg Basic tool : http://www.pdfsam.org/download/

पी डी एफ मध्ये फाईल पाहण्यासाठी आपल्या कॉम्प्युटर वर पीडीएफ रीडर इन्स्टॉल असणे आवश्यक आहे याद्वारे आपण तयार केलेली पुस्तकाची पी डी एफ फाईल ओपेन करून पाहू शकतो.

ऑडोबी पी डी एफ रीडर डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक पहावी : http://get.adobe.com/reader/

आता आपले पुस्तक पी डी एफ फोर्मेट मध्ये तयार झालेले आहे.

हे पुस्तक आपण मित्रांना व काही ओळखीच्या जाणकार लोकांना पाहण्यासाठी व रिव्हु करून चुका व सुधारणा कळवण्यासाठी पाठवू शकता व त्यानुसार आपल्या पुस्तकात प्रदर्शना आधी सुधारणा करू शकता.

धन्यवाद.
उत्तर लिहिले · 2/12/2018
कर्म · 11860
0

पुस्तके लिहिण्याची सुरुवात कशी करावी आणि त्यासाठी काय काय करणे गरजेचे आहे, याची माहिती खालीलप्रमाणे:

1. तयारी (Preparation):

  • विषय निवडणे: तुम्हाला कोणत्या विषयावर लिहायचे आहे ते निश्चित करा. तुमची आवड, ज्ञान आणि अनुभव यानुसार विषय निवडा.
  • रिसर्च (Research): निवडलेल्या विषयावर पुरेसे संशोधन करा. पुस्तके, लेख, वेबसाइट्स, आणि तज्ञांची मुलाखती घ्या.
  • लक्ष्य गट (Target Audience): तुमचे पुस्तक कोणासाठी आहे हे ठरवा. लहान मुले, युवा पिढी, प्रौढ, व्यावसायिक, इत्यादी.

2. नियोजन (Planning):

  • रूपरेषा (Outline): पुस्तकाची एक रूपरेषा तयार करा. प्रस्तावना, प्रकरणे, उप-प्रकरणे, आणि निष्कर्ष यांचा समावेश असावा.
  • वेळापत्रक (Schedule): लेखन पूर्ण करण्यासाठी एक वेळापत्रक तयार करा. प्रत्येक दिवसाचे किंवा आठवड्याचे ध्येय निश्चित करा.
  • स्थळ (Setting): शांत आणि आरामदायक जागा निवडा जिथे तुम्हाला लिहायला सोपे जाईल.

3. लेखन (Writing):

  • सुरुवात (Start): पहिल्या प्रकरणात वाचकाला आकर्षित करण्याची क्षमता असावी.
  • शैली (Style): सोपी आणि स्पष्ट भाषा वापरा. क्लिष्ट वाक्ये टाळा.
  • नियमितता (Regularity): रोज ठराविक वेळ लिहा.
  • पुनरावृत्ती (Review): लिहिलेले नियमितपणे तपासा आणि सुधारणा करा.

4. संपादन (Editing):

  • स्व-संपादन (Self-Editing): स्वतःच आपल्या लेखनाची तपासणी करा. व्याकरण, वाक्य रचना, आणि तथ्यांची जुळवाजुळव तपासा.
  • इतरांची मदत (Feedback): आपले मित्र, कुटुंब, किंवा तज्ञांकडून अभिप्राय घ्या.
  • व्यावसायिक संपादक (Professional Editor): शक्य असल्यास, व्यावसायिक संपादकाची मदत घ्या.

5. प्रकाशन (Publishing):

  • पारंपरिक प्रकाशन (Traditional Publishing): प्रकाशकांशी संपर्क साधा आणि आपली पांडुलिपी (manuscript) पाठवा.
  • स्वयं-प्रकाशन (Self-Publishing): स्वतःच पुस्तक प्रकाशित करा. ऍमेझॉन किंडल डायरेक्ट पब्लिशिंग (Amazon Kindle Direct Publishing) हा एक चांगला पर्याय आहे.

6. विपणन (Marketing):

  • सोशल मीडिया (Social Media): फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, आणि लिंक्डइन (LinkedIn) यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या पुस्तकाचा प्रचार करा.
  • वेबसाइट/ब्लॉग (Website/Blog): स्वतःची वेबसाइट किंवा ब्लॉग तयार करा आणि पुस्तकाविषयी माहिती द्या.
  • पुस्तक प्रकाशन सोहळा (Book Launch): पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करा आणि लोकांना आमंत्रित करा.

टीप:

  • धैर्य आणि चिकाटी ठेवा.
  • नकारात्मक प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करा.
  • नवीन गोष्टी शिकत राहा.
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1040

Related Questions

विषय, सूत्र, संविधान, आप्पांचे चित्र आणि संवाद गृहीत धरून लेखक वरील घटकांचे नियोजन कसे करतो?
एखादे पुस्तक लिहायचे असल्यास कसे लिहावे / कशी सुरुवात करावी?
एखादे पुस्तक लिहिण्यासाठी काय काय करावे लागते?