व्यवसाय व्यवसाय मार्गदर्शन लग्न कार्यक्रम व्यवस्थापन

मला स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करायची आहे, तर एखाद्या कार्यक्रमाचे, जाहीर सभेचे किंवा लग्न सोहळ्याचे इव्हेंट मॅनेजमेंट कसे करतात याबद्दल मला मराठीतून सविस्तर माहिती हवी आहे?

2 उत्तरे
2 answers

मला स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करायची आहे, तर एखाद्या कार्यक्रमाचे, जाहीर सभेचे किंवा लग्न सोहळ्याचे इव्हेंट मॅनेजमेंट कसे करतात याबद्दल मला मराठीतून सविस्तर माहिती हवी आहे?

2
इव्हेंट मॅनेजमेंट हे क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे. मोठया इव्हेंटच्या प्रायोजकांच्या इव्हेंट मॅनेजरकडून नेहमीच मोठया अपेक्षा असतात आणि इव्हेंट मॅनेजरची ती एक जबाबदारी असते. वेगवेगळ्या कल्पना सुचणं, आर्थिक नियोजन करणं, योग्य प्रदर्शन, स्टेज शो, फॅशन शो, मैफल यांची योग्यरीत्या आखणी करणं अशी महत्त्वपूर्ण कामं त्याला करावी लागतात. त्यामुळे इव्हेंट मॅनेजमेंटचं शिक्षण घेणं आवश्यक असतं. यासाठी डी.इ.एम. (डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट), पी.जी.डी.ए.एम.(पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट), पी.जी.डी.एम.ए. (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट अ‍ॅक्टिवेशन) असं पदव्युत्तर शिक्षण तुम्ही घेऊ शकता. यातील डी.इ.एम. कोणत्याही शाखेतून बारावी पास झाल्यावर तुम्ही करू शकता. पी.जी.डी.ए.एम., पी.जी.डी.एम.ए. या पदव्या मिळवायला किमान पदवी असणं आवश्यक आहे.
मुंबईत नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट, इन्स्टिटयूट ऑफ मीडिया, फॅशन अँड अलाइड आर्ट्स, इएमडीआय इन्स्टिटय़ूट ऑफ मीडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशन अशा काही संस्था इव्हेंट मॅनेजमेंटचा पूर्ण अभ्यास शिकवतात.
इव्हेंट मॅनेजर होण्याकरता लागणारी कौशल्य
= जनसंपर्क : इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात जनसंपर्क तगडा असणं गरजेचं असतं. ग्राहकांशी कसं बोलावं, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचावं याचं कौशल्य आत्मसात करून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर इव्हेंटसाठी पूर्ण टीमची आवश्यकता असते. त्यामुळे तुमचा फोटोग्राफर, म्युझिशियन्स, आचारी, डेकोरेटर्स यांच्याशी संपर्क असला पाहिजे.
= सर्जनशीलता : नवीन नवीन कल्पना सुचणं इव्हेंट मॅनेजरसाठी आवश्यक असतं. आयोजनातील वेगळेपणा कल्पनांतून दिसला पाहिजे.
= विपणन कौशल्य : ग्राहकाला कल्पना पटवून देता आल्या पाहिजेत आणि त्याचा योग्य मोबदला घेता आला पाहिजे. * कोणतंही काम करण्याची तुमची तयारी असली पाहिजे.
= व्यवस्थापन कौशल्य : टीममधील प्रत्येकाकडून वेळेत काम करून घेण्याचं कौशल्य अंगी बाळगलं पाहिजे.
ही काही महत्त्वपूर्ण कौशल्यं इव्हेंट मॅनेजरकडे असली पाहिजेत. व्यवस्थापनाचे पैलू, माध्यमांचा अभ्यास, आर्थिक बाबींची माहिती, संवाद साधण्याची कला याचा अभ्यास असला पाहिजे.

इव्हेंट्सचे काम तुम्हाला मिळू शकते. या उद्योगासाठी तुम्हाला अंदाजे ५ ते ७ लाखांचे भांडवल लागेल. एमबीए तसेच बीपीओचा कामाचा अनुभव असलेले तसेच वेब डेव्हलपमेंट व मॅनेजमेंटचा अनुभव असणारे हा व्यवसाय सहजतेने सुरू करू शकतात. सर्वसाधारणत: एखादे मध्यम स्वरूपाच्या इव्हेंटचे काम मिळाले तर ते सुमारे दोन महिने चालते. एका इव्हेंटसाठी तुम्हाला अंदाजे दोन लाख रुपये फी मिळू शकते. तुम्ही एकाच वेळी ३ ते ४ इव्हेंटस्चे काम पाहू शकता. वर्षाला अशा २० ते २५ इव्हेंटस्चे काम तुम्हाला मिळवता व हाताळता येईल. एकूण ४० ते ५० लाखांपर्यंतचा उद्योग एका वर्षात होईल. सर्व खर्च वजा जाता १० ते १५ लाखांचा नफा एका वर्षात तुम्हाला या उद्योगात मिळू शकतो.
अधिक माहिती करिता
अधिक माहिती करिता
अधिक माहिती करिता
अधिक माहिती करिता
अधिक माहिती करिता
अभ्यासक्रम
उत्तर लिहिले · 15/12/2018
कर्म · 99520
0

इव्हेंट मॅनेजमेंट: मार्गदर्शन

स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करण्यासाठी आणि कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी तपशीलवार माहिती:

१. कार्यक्रमाचे नियोजन:

  • ध्येय निश्चित करा: कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? उदा. लग्न, सभा, मनोरंजन, इ.
  • Target Audience (लक्ष्यित प्रेक्षक): तुमचे प्रेक्षक कोण आहेत? त्यांची आवड निवड काय आहे?
  • बजेट: तुमच्याकडे किती बजेट आहे? त्यानुसार खर्चाचे नियोजन करा.
  • वेळ आणि तारीख: कार्यक्रमासाठी योग्य वेळ आणि तारीख निश्चित करा.
  • स्थळ निवड: कार्यक्रमासाठी योग्य स्थळ (Venue) शोधा.

२. टीम तयार करा:

  • सदस्य: तुमच्या टीममध्ये क्रिएटिव्ह डिझायनर, डेकोरेटर, फायनान्स मॅनेजर, मार्केटिंग एक्सपर्ट, आणि समन्वयक (coordinator) असावेत.

३. कामाची विभागणी:

  • प्रत्येक सदस्याला जबाबदारी द्या.
  • जबाबदारीचे योग्य वाटप करा.
  • वेळेनुसार काम पूर्ण करण्याचे नियोजन करा.

४. विक्रेत्यांशी संपर्क साधा:

  • डेकोरेटर: सजावट करण्यासाठी योग्य डेकोरेटर शोधा.
  • कॅटरर: जेवण बनवण्यासाठी चांगले कॅटरर (caterer) शोधा.
  • लाइटिंग आणि साऊंड: उत्तम lighting आणि sound system arrange करा.

५. मार्केटिंग आणि प्रमोशन:

  • सोशल मीडिया: फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवर पेज तयार करा आणि कार्यक्रमाची माहिती share करा.
  • Website: कंपनीसाठी website तयार करा.
  • Local जाहिरात: स्थानिक वृत्तपत्रे आणि रेडिओमध्ये जाहिरात करा.

६. कार्यक्रम व्यवस्थापन:

  • नोंदणी: event मध्ये येणाऱ्या लोकांची नोंदणी करा.
  • सुरक्षा: कार्यक्रमस्थळी सुरक्षा व्यवस्था ठेवा.
  • समन्वय: सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी टीममध्ये समन्वय ठेवा.

७. कार्यक्रमाचे मूल्यमापन:

  • Feedback: कार्यक्रम संपल्यावर लोकांकडून feedback घ्या.
  • सुधारणा: Feedback च्या आधारावर तुमच्या कामात सुधारणा करा.

इव्हेंटनुसार आवश्यक गोष्टी:

लग्न सोहळा:

  • स्थळ: (Venue)
  • डेकोरेशन: (मंडप, स्टेज)
  • Catering: (buffet, drinks)
  • मनोरंजन: (DJ, संगीत)
  • वस्त्र आणि सौंदर्य: (wedding dress, makeup artist)

जाहीर सभा:

  • स्थळ: मोठे हॉल किंवा मैदान
  • साउंड सिस्टीम: (speakers, microphones)
  • प्रकाश योजना: (lighting)
  • सुरक्षा: (security)
  • स्वयंसेवक: (volunteers)

कॉर्पोरेट इव्हेंट:

  • स्थळ: (conference hall, hotel)
  • टेक्निकल सपोर्ट: (projectors, screens)
  • Catering: (lunch, snacks)
  • मनोरंजन: (team building activities)

इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी:

  • व्यवसाय योजना (business plan)
  • गुंतवणूक (investment)
  • ऑफिस (office space)
  • मनुष्यबळ (staff)
  • परवाने (licenses and permissions)
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1620

Related Questions

सूत्रसंचालनाच्या दृष्टीने कार्यक्रम पत्रिकेचे महत्त्व आणि तिच्यात काय सुधारणा करता येतील हे स्पष्ट करा.
निमंत्रण कोणी दिले?
नमस्कार मित्रांनो, मला इव्हेंट मॅनेजमेंटबद्दल पूर्ण माहिती कोण देईल का?
इव्हेंट मॅनेजमेंट बद्दल सविस्तर माहिती सांगावी?
इव्हेंट मॅनेजमेंट, डान्स कॉम्पिटिशन कसे आयोजित करावे?
सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्नेहसंमेलन यात काय फरक आहे?
एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याचा क्रम कसा असला पाहिजे?