भूगोल सामान्य ज्ञान बेट

जगातील सर्वात मोठे नदिबेट कोणते ?

4 उत्तरे
4 answers

जगातील सर्वात मोठे नदिबेट कोणते ?

0

●ग्रीनलँड

क्षेत्रफळ(km2) = 2,130,800

क्षेत्रफळ(sq mi) = 822,706

822,706 = ग्रीनलँड(डेन्मार्क चा घटक)

.......

ग्रीनलंड हा अटलांटिक महासागर व आर्क्टिक महासागरह्यांच्या मधील उत्तर अमेरिका खंडातील एक स्वायत्त देशआहे. ग्रीनलंडवर डेन्मार्कच्या राजतंत्राची सत्ता आहे. ग्रीनलंड हे जागातील सर्वात मोठे बेट व जगातील सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेला देश आहे. नूक ही ग्रीनलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
उत्तर लिहिले · 19/11/2018
कर्म · 9150
0
आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीत वसलेले माजुली बेट हे अनेक कारणांनी प्रसिद्ध आहे. निसर्गसौंदर्य, हिरवी गार भातशेती, येथील आदिवासी रहिवासी, स्थलांतरीत पक्षांचे माहेरघर, सांस्कृतिक वारसा जपणारे ठिकाण अशा अनेक कारणांनी हे बेट ओळखले जाते. विशेष म्हणजे एकेकाळी जगातील सर्वात मोठे नदीतील बेट अशी त्याची ओळख होती. त्यावेळी या बेटाचा परिसर १२५० चौरस किलोमीटरचा होता. मात्र ब्रह्मपुत्रेच्या वेळोवेळी पात्र बदलण्यामुळे या बेटाचा बराचसा भाग नदीत बुडला असून आता ४०० चौरस किलोमीटरचा भाग शिल्लक राहिला आहे. आजही पावसाळ्यात हे बेट नदीच्या पुरात बुडते.


भारतातील सुंदर पर्यटनस्थळांपैकी माजुली एक असले तरी येथे पर्यटकांसाठी खास सोयी नाहीत. चांगली हॉटेल्स नाहीत मात्र पूर्वकल्पना दिली असेल तर येथे होम स्टेची सुविधा मिळू शकते. स्थलांतरीत पक्ष्यांचे हे माहेरघर. अ्रनेक प्रकारचे पक्षी येथे पाहता येतात व त्यामुळे पक्षी निरीक्षकांचे ते आवडते स्थळ आहे. जानेवारी ते मार्च हा त्यासाठी उत्तम काळ. सुमारे दीड लाख लोकसंख्येचे हे बेट. येथे बहुतांशी आदिवासी जमातीच आहेत. आपला सांस्कृतिक वारसा त्यांनी फार चांगल्या प्रकारे जपला आहे. शेती हा येथला मुख्य व्यवसाय असून येथे खते व किटकनाशके न वापरता सुमारे १०० प्रकारच्या तांदळाचे उत्पादन होते.


येथील हातमागावरील विणकाम फारच प्रसिद्ध असून जगप्रसिद्ध मुंगा सिल्कपासून येथे अनेक कपडे बनविले जातात. मातीची सुंदर घटांची भाजून बनविलेली भांडी हेही येथील एक वैशिष्ठ. या भांड्यांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली आहे. नोव्हेंबरमध्ये येथे साजरा होत असलेला रास फेस्टीव्हल हा तीन दिवसांचा उत्सव पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. या उत्सवात या बेटावरील एकूणएक नागरिक भाग घेतात. श्रीकृष्णाचा हा उत्सव कार्तिकी पर्णिमेला साजरा होतो. या उत्सवासाठी फारच अप्रतिम मुखवटे बनविले जातात त्यानंतर बोटींची रेस होते.हा काळही या बेटाला भेट देण्यासाठी चांगला असतो.
अक्षांश-रेखांश :   27°0'42"N   94°11'58"E
उत्तर लिहिले · 19/11/2018
कर्म · 4910
0

जगातील सर्वात मोठे नदी बेट माजुली बेट (Majuli Island) आहे. हे बेट भारतातील आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात आहे.

माजुली बेट:

  • हे जगातील सर्वात मोठे नदी बेट आहे.
  • स्थान: आसाम, भारत
  • नदी: ब्रह्मपुत्रा

माजुली बेट हे केवळ भौगोलिकदृष्ट्याच महत्त्वाचे नाही, तर ते सांस्कृतिकदृष्ट्या देखील खूप महत्त्वाचे आहे. येथे अनेक प्राचीन मठ (सत्र) आहेत, जे वैष्णव धर्माचे केंद्र आहेत.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5280

Related Questions

नदीवरील सर्वात मोठे बेट कोणते?
द्वीपगृह म्हणजे काय?
जगातील सर्वात मोठे बेट कोणते?
जगातील सर्वात मोठा बेटांचा समूह कुठे आहे?