2 उत्तरे
2 answers

पारिभाषिक म्हणजे काय?

6
विशिष्ट ज्ञान शाखेच्या संदर्भात खास अर्थाने वापरलेल्या शब्दास 'पारिभाषिक शब्द' असे म्हणतात. कोणत्याही भाषेतील शब्दसमुच्चयाचे 'सामान्य शब्द' आणि 'पारिभाषिक शब्द' असे दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल.

सामान्यतः 'सामान्य शब्द' हे सर्वसाधारण व्यवहारात वापरले जातात. 'पारिभाषिक शब्द' मर्यादित क्षेत्रासाठी.

जागतिक स्तरावर विस्तारित होणाऱ्या ज्ञानशाखा, तंत्रज्ञानात वेगाने होणारे बदल तसेच माहितीक्षेत्रातील क्रांतीमुळे सर्वच भाषांना विशिष्ट अर्थ अभिप्रेत करणाऱ्या 'पारिभाषिक शब्दांची' मोठ्या प्रमाणावर गरज भासू लागलेली आहे.

उदाहरणार्थ :
Aggregate गोळाबेरीज
Aggregator संचयक
Album संचयिका
Allocate नेमणे
Allocation नेमणूक
Alphabet मुळाक्षर
Alphabetic अक्षरी
Alphabetical अकारविल्हे

संर्दर्भ :
पारिभाषिक शब्द : विकिपेडीया
उत्तर लिहिले · 7/11/2018
कर्म · 75305
0

पारिभाषिक म्हणजे विशिष्ट ज्ञानशाखा, कला, विज्ञान किंवा व्यवसायातील संकल्पना व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे विशिष्ट शब्द किंवा संज्ञा होय.

उदाहरणार्थ:

  • विज्ञान: 'अणू', 'रेणू', 'पेशी'
  • अर्थशास्त्र: 'मागणी', 'पुरवठा', 'महागाई'
  • कायदा: 'अधिनियम', 'कलम', 'न्यायालय'

पारिभाषिक शब्दांचा उपयोग विषयाला अधिक स्पष्ट आणि अचूक बनवतो.

अधिक माहितीसाठी:

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ - १२ वी मराठी युवकभारती (पृष्ठ क्र. १८०)
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5280

Related Questions

वृत्ती सारूप्यमितरत्र यांचा अर्थ काय आहे?
न, न, वी, डा, स , का, ठ , ध्या, कु म्हण शोधून दे?
अ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ अं अः?
गहूची किचळीला मराठी मध्ये काय म्हणतात?
संस्कृत भाषेत वैज्ञानिक महत्त्व स्पष्ट करा?
संस्कृतमधील वर्णमाला सविस्तर स्पष्ट करा?
चिमणी या पक्षासाठी संस्कृत शब्द कोणता आहे?