2 उत्तरे
2
answers
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात आहे?
4
Answer link
कळसुबाईचे शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. शिखराची उंची पाच हजार चारशे फूट म्हणजेच एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर. सह्याद्रीच्या रांगेत पाच हजार फूटांच्या वर तीनच शिखरे आहेत. त्यांपैकी ‘घनचक्कर’च्या मुडा शिखराचा (१५३२ मीटर) तिसरा क्रमांक लागतो. दुस-या क्रमांकावर ‘साल्हेर’वर असलेले ‘परशुराम मंदिरा’चे शिखर (१५६७ मीटर) आहे, तर पहिल्या क्रमांकावर 'कळसुबाई शिखर'! तो ट्रेक तीन तासांची तंगडतोड करून साधता येण्याजोगा आहे. शिखरापर्यंत पोचण्यासाठी ट्रेकिंग आणि पादचारी असे मार्ग आहेत. शिखरावर जाण्याचा मुख्य रस्ता भंडारदऱ्यापासून सहा किलोमीटरवर असलेल्या बारी गावापासून सुरू होतो. नाशिक - इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते. कळसुबाई पुण्यापासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. भंडारदरा रस्त्यावरच उजव्या हाताला रंधा धबधबा आहे. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे समुद्र नाला हे घनदाट जंगलही त्याच भागात आहे.
0
Answer link
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई अहमदनगर जिल्ह्यात आहे.
हे शिखर सह्याद्री पर्वतरांगेत असून त्याची उंची १६४६ मीटर (५४०० फूट) आहे.
स्त्रोत: विकिपीडिया