सामान्य ज्ञान दिनविशेष टपाल

जागतिक टपाल दिनाबद्दल माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

जागतिक टपाल दिनाबद्दल माहिती मिळेल का?

7
*📮जागतिक टपाल दिवस, वडिलधाऱ्यांना नमस्कार अन् छोटूला गोड गोड पापा*
----------------------------------

▪जगभरात 9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

▫25 ते 30 वर्षापूर्वी टपाल हेच आपल्या संवादाचे प्रमुख माध्यम होते.

▪पत्रास कारण की... या वाक्याने सुरुवात व्हायची अन् संपूर्ण कुटुंबाची खुशाली कळायची. नातेवाईकांच्या खुशालीची वाट पाहायची.

▫पोस्टमन काका आल्यास त्यांच्यामागे धावत धावत काका आमच्या आत्याचं पत्र आलं का ? असा प्रश्न विचारायचं, 15 पैशांच्या त्या पत्रातून खूप आनंद मिळायचा.

▪मात्र, काळाच्या ओघात ही पत्रे आता इतिहास जमा झाली आहेत. 

▫आज फेसबुक, मेसेंजर, व्हॉट्सअॅप आणि डिजीटल अॅपच्या माध्यमातून क्षणार्धात संदेशाची देवाण-घेवाण होते.

▪मात्र, पोस्टमन काकाच्या पाठिमागे फिरुन आपल्या मामाचं पत्र मिळविण्यात, आपल्या आत्याची खुशाली ऐकण्यात जो आनंद होतो, तो आनंदही आज टपालासोबतच नाहीसा झाला आहे.

*💁‍♂ भारतातील टपालाचा इतिहास*

▪भारतामध्ये पहिल्या टपालाच्या तिकिटाची सुरुवात सिंध जिल्ह्यामध्ये 1852 मध्ये झाली. तर 1854 पर्यंत सगळीकडे एका प्रकारच्या तिकिटांचं प्रचलन सुरू झाले.

▫भारतातलं पहिलं रंगीत तिकीट छापण्यासाठी 1931 साल उजाडावं लागलं.

▪पहिलं स्वातंत्र्योत्तर तिकीट 1947 मध्ये निघालं आणि त्यावर भारतीय झेंडा होता.

*💥टपाल दिन-भारताला पिनकोड सिस्टिम दिलीय या मराठी माणसाने..*

जाणून घ्या हा पिनकोड वाचायचा कसा?

पिन कोड तर पाह्यलाच असेल. पाह्यला असेल काय, कित्येकदा लिहिला पण असेलच. पण कधी विचार केलाय, ही भानगड कशी आणि का अस्तित्वात आली याचा? किंवा याच्या मागं नक्की कुणाचं सुपीक डोकं असेल याचा? ही आयडियाची कल्पना आहे  श्रीराम वेलणकर या मराठमोळ्या माणसाची.

यांनीच पूर्ण भारताला पिनकोडची देणगी दिलीय...

_PIN म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर्. हे घडलं १९७२मध्ये. तोपर्यंत जनरल पोस्ट ऑफिसांत पत्रांवरचे पत्ते वाचून त्यांचि विभागवार विभागणि व्हायची. पण त्यात बऱ्याच अडचणी यायच्या. म्हणजे एकसारख्या नावाची माणसं, एकसारख्या नावाचि गावं, कधी  कुणाचं अक्षर नीट वाचता येण्यासारखं नसे, आणि हे सगळं कमी की काय म्हणून आपल्या देशभरात पत्ता लिहिण्यासाठी वापरलेल्या कितीतरी भाषा!!  चुकीचे पत्ते लिहिणं हा तर काही लोकांचा जन्मसिद्ध अधिकार आहेच. हे सगळं टाळण्यासाठी विभागवार पत्रांची विभागणी करण्यासाठी ही पिनकोड पद्धत अंमलात आणण्यात आली._

_पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असताना श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी त्यावर उपाय म्हणून १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली.  त्यामुळेच श्रीराम भिकाजी वेलणकर यांना ‘पिन कोड’ प्रणालीचे जनक म्हणतात. या पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली_

_*पिनकोडची रचना अशी आहे.*_

_पूर्ण देश ९ झोन मध्ये विभागला गेला आहे. यातले ८ झोन हे भौगोलिक विभाग आहेत, तर एक मिलिट्रीसाठी वापरला जातो._

*आता पाहूयात हा पिनकोड वाचायचा कसा..*

_यातले पहिले दोन अंक पोस्टऑफिस दर्शवतात. म्हणजे यातही हा तक्ता वापरता येईल_

_*११ - दिल्ली*_
_*१२ व १३ - हरयाणा*_
_*१४  ते १६ - पंजाब्*_
_*१७ - हिमाचल प्रदेश्*_
_*१८ ते १९ जम्मू आणि काश्मिर्*_
_*२० ते २८ - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड*_
_*३० ते ३४ - राजस्थान्*_
_*३६ ते ३९ - गुजरात्*_
_*४० ते ४४ - महाराष्ट्र*_
_*४५ ते ४९ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड*_
_*५० ते ५३ - आंध्र प्रदेश*_
_*५६  ते ५९ - कर्नाटक*_
_*६० ते ६४ - तामिळनाडू*_
_*६७ ते ६९ - केरळ*_
_*७० ते ७४ - पश्चिम बंगाल्*_
_*५५ ते ७७ - ओरिसा*_
_*७८ - आसाम*_
_*७९ - पूर्वांचल*_
_*८० ते ८५ बिहार आणि झारखंड*_
_*९० ते ९९ - आर्मी पोस्टल सर्व्हिस्*_

_म्हणजे सहा आकडी पिनकोडमधला पहिला अंक दाखवतो- विभाग, दुसरा अंक- उपविभाग, तिसरा अंक - सॉर्टींग जिल्हा आणि राहिलेले शेवटचे तीन अंक हा त्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर असतो. उदाहरणार्थ ४१३००१ हा सोलापूरचा पिनकोड आहे. यात पहिला अंक दाखवतो- पश्चिम विभाग, त्यानंतर १३ हा पश्चिम विभागातल्या महाराष्ट्रातला एक उपविभाग दाखवतो, ४१३ हा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो, तर शेवटचे तीन अंक - ००१ हा सोलापूर जिल्ह्यातल्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर आहे.*_

_आता पत्रं लिहिणं दुर्मिळ होत चाललं असलं तरी पिनकोड सिस्टिम कधीच इतिहासजमा होणार नाही._

_*श्रीराम भिकाजी वेलणकर हे संस्कृत पंडित होते व पाली भाषेचे गाढे अभ्यासकही होते.*_



​🏣  _*टपालदिनानिमित्त पोस्टकार्डावरील एक मेसेज आज व्हायरल होतोय*_

💬 *MAHA DIGI| VIRAL*

बदलत्या काळानुसार एकमेकांना पत्र लिहीण्याची पद्धत लोप पावली आणि मेसेजेसचा जमाना आला. त्या नंतर व्हाईस मेसेज आणि आता तर व्हिडीओ कॉलिंगमुळे पत्र ही संकल्पनाच हळुहळू कालबाह्य होऊ गेली आहे.

📭 *या पोस्टकार्डाच्या पत्त्याच्या जागी दुरावलेले नातेवाईक, मित्र, स्नेही यांच्या आठवणीत....असा उल्लेख आहे, तर पिनकोडच्या जागी मी काय म्हणतो...असे लिहीले आहे*.

स.न.वि.वि.
15 पैशांच पोस्ट कार्ड
खुशाली कळवत होत,
अर्ध लिहीलेल कार्ड
रडायला लावत होतं..
एक रुपया सुट्टा घेऊन....एसटीडीच्या लाईनमध्ये उभा राहत होतो
फोन लागला की मन भरुन येत होत.

व्हॉटसअँपवर आता 24 तास संपर्कात राहातोय
ना ती ओढ ना ती हुरहूर आहे.
काळ बदलला, बदलली साधने मी अजूनही जिव्हाळा शोधतच आहे....
25 हजारांच्या मोबाईलला 15 पैशांच्या पोस्टकार्डाची सर नाही...
अजून काय काय बदलेल पण ते दिवस...ती माया ...ती आपुलकी पुन्हा कधीच मिळणार नाही.

🥳 *तुम्हाला माहित आहे का टपाल खात्याच्या स्टॅम्पवर स्वतःचा फोटोही बनवून घेता येऊ शकतो...*

*🔰📶Maha Digi | Informative*

📬 टपाल खात्याने 2013 पासून 'माय स्टॅम्प' योजना सुरू केली आहे हे बऱ्याच जणांना ज्ञात नाही. टपाल खात्याने सुरू केलेल्या ‘माय स्टॅम्प’ योजनेअंतर्गत केव्हाही स्वतःचा, प्रिय व्यक्ती किंवा आवडीच्या विषयावरील स्टॅम्प तयार करून देण्यात येतो.

🤔 *कसं करतात हे ?*

📇 माय स्टॅम्प योजनेनुसार 300 रुपये भरून कुणीही आपल्या फोटोसह 12 टपाल तिकिटे जारी करवू शकतो.

📇 त्याबदल्यात स्वतःचे फोटो असलेली पाच रुपयांची बारा तिकिटे मिळतात.

📇 त्याला सामान्य टपाल तिकिटांचाच दर्जा असतो.

📇 छायाचित्रासह स्वत:च्या माहितीचा अर्ज भरावा लागतो.

📇 सत्यापनासाठी स्वत: डाक विभागात जावे लागते.

😍 स्वतःच्या फोटोशिवाय आवडीचे एखादे चित्र, संस्थेचा लोगो, ऐतिहासिक वास्तू, प्रसिद्ध पर्यटन स्थळ, ऐतिहासिक शहर, प्राणी यांचीही तिकिटे तयार करून दिली जातात.

👀 मोबाईल इंटरनेटच्या जमान्यात टपाल कार्यालयाकडे पाऊले कमी पडत असली तरी या योजनेमुळे तरुणाई मात्र टपाल कार्यालयात मोठ्या प्रमाणात अगदी उड्या मारत जाते.

🕺 बऱ्याच जणांना हे ठाऊक नाही परंतू टपालाच्या स्टॅम्पबद्दल प्रत्येकाला एक वेगळेच आकर्षक असल्याने हे समजल्यावर कोणी तिकडे जाणार नसेल तर नवलच... !!!

💁‍♂️  *फक्त 300 रुपयांत पोस्टाच्या तिकीटावर छापा स्वत:चा फोटो -  पहा कशी आहे पोस्टाची माय स्‍टॅम्‍प योजना !*

🧐  पोस्टाची तिकीटे पाहून अनेकांना आपला फोटो यावर असावा, असे वाटले असेल , मात्र आतापर्यंत केवळ महान व्यक्ती आणि अतुलनीय कार्य करणाऱ्या लोकांचेच फोटो ,टपाल तिकीटावर छापण्याची प्रथा होती

📍  माय स्‍टॅम्‍प यायोजनेअंतर्गत तुम्ही स्वत:चा फोटोही टपाल तिकीटावर छापू शकता. एवढेच नव्हे तुम्ही लग्नाच्या वाढदिवसाला पती-पत्नीचा फोटो , किंवा तुमच्या कुटुंबाचा फोटोही टपाल तिकीटावर छापू शकता

🤔  *जाणून घ्या महत्वाची अट ?* - या योजनेतंर्गत फोटो छापण्यासाठी संबंधित व्यक्ती जिवंत असणे गरजेचे आहे , आपण नजीकच्या टपाल कार्यालयात, या योजनेची आणखी माहिती मिळू शकते. तसेच आपण https://www.indiapost.gov.in/Philately/Pages/Content/My-Stamp.aspx या संकेतस्थळावर भेट देऊनही याविषयी आणखी माहिती घेऊ शकता

💁‍♂️ *यासाठी किती खर्च येईल* - माय स्‍टॅम्‍प’ योजनेतंर्गत टपाल तिकीटावर तुमचा फोटो छापण्यासाठी केवळ 300 रुपये इतका खर्च येईल. यामध्ये तुम्हाला 12 टपाल तिकीटे मिळतील , विशेष म्हणजे इतर टपाल तिकीटांप्रमाणे ही तिकीटे तुम्ही व्यवहारासाठीही वापरु शकाल , _पोस्टाच्या माय स्‍टॅम्‍प योजनेबाबद्दलची हि माहिती कशी वाटली?_ *आम्हाला कळवा*
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर न्यूज,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
उत्तर लिहिले · 10/10/2018
कर्म · 569245
0

जागतिक टपाल दिन (World Post Day) हा दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

इतिहास:

  • ९ ऑक्टोबर १८७४ रोजी स्वित्झर्लंडमधील बर्ने येथे युनिव्हर्सल पोस्टल युनियनची (UPU) स्थापना झाली. या घटनेच्या स्मरणार्थ जागतिक टपाल दिन साजरा केला जातो.
  • १९६९ मध्ये टोकियो, जपान येथे झालेल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियन काँग्रेसमध्ये जागतिक टपाल दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.

उद्देश:

  • लोकांमध्ये टपाल सेवा आणि तिच्या भूमिकेबद्दल जागरूकता वाढवणे.
  • सामाजिक आणि आर्थिक विकासात टपाल विभागाच्या योगदानाला प्रोत्साहन देणे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर टपाल सहकार्याला चालना देणे.

महत्व:

  • जागतिक टपाल दिन हा टपाल कर्मचाऱ्यांच्या योगदानाला आदराने गौरवण्याचा दिवस आहे.
  • हा दिवस लोकांना टपाल सेवांच्या महत्त्वावर विचार करण्यास प्रवृत्त करतो.
  • टपाल विभाग जगाला जोडण्याचे आणि संवाद सुलभ करण्याचे कार्य करते.

साजरा करण्याची पद्धत:

  • या दिवशी अनेक देशांमध्ये टपाल विभाग विविध कार्यक्रम आयोजित करतात.
  • टपाल तिकिटांचे प्रदर्शन, कार्यशाळा, आणि चर्चासत्रांचे आयोजन केले जाते.
  • उत्कृष्ट टपाल कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो.

जागतिक टपाल दिन हा टपाल सेवांच्या महत्त्वाची आठवण करून देणारा आणि टपाल कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2360

Related Questions

खंड किती व ते कोणते? दुसरा प्रश्न: पृथ्वीचा उपग्रह कोणता? तिसरा प्रश्न: पृथ्वीवरील महासागर कोणते? चौथा प्रश्न: सर्वात मोठा महासागर कोणता? पाचवा प्रश्न: सर्वात लहान खंड कोणता?
जीवन मित्रा सोबत शाळेत गेला?
गरीब मुलगा, मेहनत, इच्छा, आणि कष्ट यांवरून एक गोष्ट सांगा?
आता किती वाजले आहेत?
आंतरराष्ट्रीय चहा दिवस कधी असतो?
श्रीकांत चंद्रकांत जाधव यांच्याबद्दल माहिती द्या?
जगातील सर्वात लहान माणूस किंवा स्त्री कोण आहे?