आरक्षण सामाजिक

आरक्षण म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

आरक्षण म्हणजे काय?

4
आरक्षण शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो -

आरक्षण (समुदाय सवलत) - विशिष्ट समुदायाला सवलती देणे.

आरक्षण (जागा) - मर्यादित जागा असलेल्या ठिकाणी काही नियमांनुसार जागा राखून ठेवणे.

उत्तर लिहिले · 6/10/2018
कर्म · 5350
0
👨‍💼 * माहिती जाणून घ्या : सरपंच पदाचे आरक्षण*

*_🔰📶Maha Digi | Informative_*

🌅 ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. 15 जानेवारीला मतदान, 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

🏤 आता ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 22 जानेवारीपासून आरक्षण सोडत घोषित होणार आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष नव्याने होणाऱ्या आरक्षणाच्या सोडतीकडे लागले आहे.


🪑 * सरपंच पदाकरिता आरक्षण*

💡 सरपंचाच्या पदाकरिता आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. यात राखीव जागा आळीपाळीने नेमून देण्यात येतात. पुढील गटातील व्यक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.

👉 अनुसूचित जाती करिता लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असते. या आरक्षित जागा पैकी 50% जागा महिलांसाठी आरक्षित असतात.

👉 अनुसूचित जमाती मध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असते व या आरक्षित जागा पैकी 50% जागा महिलासाठी आरक्षित असतात.

👉 सरपंचाच्या पदामध्ये इतर मागास वर्गीयांसाठी 27% आरक्षण असते. व या आरक्षित जागा पैकी 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित आसतात.

👉 या पदामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी देखील आरक्षण असते.

🤔 * निवडणूकीनंतर आरक्षण सोडतीने काय होईल ?*

🔈 सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केल्यानंतर संबंधित जातीच्या दाखल्यांची पडताळणी वेळेत न होणे, जातीचा दाखला अमान्य होणे, तसेच बनावट प्रमाणपत्र सादर करणे या कारणांमुळे निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यावी लागते, असे सरकारने यासंबंधी जाहीर केलेल्या आदेशात म्हटले आहे.

👍 थोडक्यात काय तर सरपंच पदासाठी करण्यात येणारा घोडेबाजार टळेल, असे सरकारचे म्हणणे आहे.

🧾 * ग्रामपंचायत निवडणूक : मतदार यादी कशी पाहाल ?*

*🔰📶Maha Digi | Informative*

🏫 महाराष्ट्रात 14 हजार 234 इतक्या गावांमध्ये 15 जानेवारीला मतदान होईल, तर 18 जानेवारीला निकाल लागेल.

👤 आपल्या वॉर्डातील उमेदवार आणि त्याची माहिती जजे की नाव, शिक्षण, गुन्हे, संपत्ती याची माहिती तसेच गावातील मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही हे आता आपण घरबसल्या पाहू शकता...

🤔 *मतदार यादी कशी पाहायची ?*

🔖 मतदार यादी पाहण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्हाला https://ceo.maharashtra.gov.in/Defaultc.aspx हा पत्ता टाईप करावा लागेल.

🔖 या वेबसाईटवरील उजवीकडच्या Go to New Website या पर्यायावर क्लिक केले की एक नवीन पेज ओपन होईल.

🔖 त्यानंतर यादी पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि गावाचे नाव निवडायचे आहे.

🔖 त्यानंतर Open PDF यावर क्लिक केले की तुमच्यासमोर तुमच्या गावाची मतदार यादी ओपन होते.

📜 * उमेदवार व त्याचे प्रतिज्ञापत्र*

• वॉर्डनिहाय उमेदवार आणि त्यांचे प्रतिज्ञापत्र पाहण्यासाठी https://panchayatelection.maharashtra.gov.in/ असे टाईप करावे.

• इथे तुम्हाला Affidavit by the final contesting candidates या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

• यानंतर Search Document नावाने एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

• इथे तुम्हाला Local Body मधील पर्यायांपैकी ग्रामपंचायत हा पर्याय निवडायचा आहे.

• त्यानंतर Division मध्ये तुमचे गाव ज्या विभागात येते तो विभाग निवडायचा आहे. त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडायचे आहे.

• त्यानंतर Election Programe Name या पर्यायासमोर आपल्याला Gram Panchayat General Election -2020; Date:15-01-2021 हा पर्याय निवडुन तुमचा वॉर्ड निवडा.

• All Final Contesting Candidate List या पर्यायासमोर तुम्हाला दिसेल.

• इथे उमेदवाराचा नोंदणी क्रमांक, पूर्ण नाव, वॉर्डाचा नंबर, वॉर्डाचे नाव आणि डाऊनलोड हा पर्याय दिलेला असेल.

• उमेदवाराच्या नावासमोरील View Affidavit या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

• त्यानंतर तुमच्यासमोर उमेदवाराने उमेदवारी अर्जासोबत सादर केलेले प्रतिज्ञापत्र ओपन होईल.

• या प्रतिज्ञापत्रात उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी, व्यवसायाचा तपशील, मालमत्तेचा तपशील व इतर सविस्तर माहिती दिलेली असते.

👍 अशापद्धतीने तुम्ही तुमच्या वॉर्डमधील उमेदवारांची नावे आणि त्यांच्याविषयीचा तपशील इथे पाहू शकता.
____________________________________
*🤳🌐 आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_

*_ महा डिजिटल मॅगेझिन_*

https://bit.ly/34kRwdy
उत्तर लिहिले · 14/1/2021
कर्म · 569245
0

आरक्षण म्हणजे सरकारी नोकऱ्या, शिक्षण संस्था आणि इतर क्षेत्रांमध्ये काही विशिष्ट सामाजिक आणि आर्थिक गटांसाठी जागा राखीव ठेवण्याची प्रक्रिया आहे.

हे खालील गोष्टी सुनिश्चित करते:

  • सामाजिक समानता
  • वंचितांना संधी
  • प्रतिनिधित्व

भारतात, आरक्षण हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी (OBC), अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) साठी आहे.

अधिक माहितीसाठी:

Reservation Policy (इंग्रजी)
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1440

Related Questions

खेड्यांच्या विकासासाठी ग्राम गौरव प्रतिष्ठानने कोणती उद्दिष्ट्ये बाळगली आहेत?
वृद्धाश्रम चालवण्यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करावी लागतात?
वृद्धांची सेवा क्षेत्रे किती आणि कोणती?
सामाजिक सुरक्षेचे स्वरूप स्पष्ट करा?
सामाजिक सुरक्षा काय आहे, स्पष्ट करा?
स्त्रियांसाठी सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या योजना राबवल्या जातात?
उत्तर भारतात, 'श्रीमती' हे महिलांच्या नावाच्या आधी लावले जाते आणि महाराष्ट्रात ते 'सौभाग्यवती' या नावाने लावले जाते. तर, 'श्रीमती' हे सर्वांसाठी, सर्रास वापरणे कितपत योग्य आहे?