4 उत्तरे
4 answers

1 ब्रास म्हणजे किती?

23
ब्रास हे एकक बांधकाम करतांना वापरले जाते. ब्रास गणितीय पद्धातीने मांडतात. जसे एक डझन म्हणजे १२ तसे एक ब्रास म्हणजे १०० होय.

ब्रास मुख्यत्वे करुन जागेचे क्षेत्रफळ(Sq.ft.) आणि जागेचे घनफळ (CFt.) मध्ये मोजतात.

sq.ft. म्हणजे स्क्वेअर फूट आणि CFt. क्युबिक फूट होय.

उदाहरणार्थ :

समजा आपला स्ल्याब(छत) ची जागा आहे ४० बाय ३० ची म्हणजे ४० फूट लांबीत आणि ३० रुंदी. तर त्या जागेचे क्षेत्रफळ होईल ( ४० फूट * ३० फूट ) = १२०० Sq.ft ना...

मग १२००/१०० = १२ ब्रास झाले कारण १०० ब्रास म्हणजे १ ना.. म्हणजे आपण सांगु स्ल्याबचे क्षेत्रफळ १२ ब्रास झाले.

उदाहरणार्थ :

समजा एक ट्रक आहे जी ५० बाय २० असुन तिच्या ट्रोलीची खोलता(डेप्थ, Depth) ३ फुट आहे तर त्या ट्रोलीचे घनफळ झाले ( ५० फूट * २० फूट * ३ फूट ) = ३०० क्युबिक फूट CFt.

३०० / १०० = ३ ब्रास.. मग आपण सांगु त्या ट्रालीत एकदम काठोकाठ ३०० क्युबिक फूट किंवा ३ ब्रास वाळु माती मावेल.

टीप :
ब्रास फक्त आणि फक्त Sq.Ft. किंवा CFt. वरच मोजतात. जर आपले एकक स्क्वेअर मीटर आहे तर सरळ त्याला १०० ने भागायच नाही. अगोदर Sq.M च Sq. Ft. मध्ये रुपांतर करावे आणि मग १०० ने भागावे.
उत्तर लिहिले · 28/9/2018
कर्म · 75305
8
31-Mar-2017 · 1 brass sand = 100 cubic foot of sand; 1 brass sand =4528 kg; 1 cum sand wt. = 1600 kg; 1 brass = 2.83 cum; wt. of sand in 1 brass ...

मित्रा, 

एक ब्रास वाळू बरोबर शंभर घनफूट. म्हणजेच दहा बाय दहा बाय एक फुट.
एक घनमीटर वाळूचे वजन सोळाशे किलो. दोन पॉईंट त्र्याऐंशी घनमीटर बरोबर एक ब्रास म्हणजे 2.83×1600=4528 किलो.


घनमीटर
उत्तर लिहिले · 31/12/2018
कर्म · 20800
0

1 ब्रास म्हणजे 100 स्क्वेअर फूट. लांबी आणि रुंदी 10 फूट असल्यास, 1 ब्रास होतो.

  • 1 ब्रास = 100 चौरस फूट
  • 1 ब्रास = 9.29 चौरस मीटर

हे बांधकाम आणि लाकडी कामासाठी वापरले जाणारे एक परिमाण आहे.

उदाहरणार्थ, जर तुमच्या जमिनीची लांबी 10 फूट आणि रुंदी 10 फूट असेल, तर ती जमीन 1 ब्रास आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980

Related Questions

एक क्यूबिक मीटर म्हणजे किती?
एक पावशेर म्हणजे किती?
पावशेर म्हणजे किती?
3 मी 5 मी 10 सेमी 12 मी 90 सेमी अशी लांब असलेली कापडाची तीन तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी?
१ परस म्हणजे किती फूट?
एक कोस म्हणजे किती किलोमीटर असते?
एक इंच म्हणजे किती?