2 उत्तरे
2
answers
अनुच्छेद, कलम व परिशिष्ट यात काय फरक आहे?
6
Answer link
अनुच्छेद म्हणजे काय?
अनुच्छेद म्हणजे प्यारेग्राफ(Paragraph). अनुच्छेद एखाद्या विषयाला अनुसरून किंवा एखाद्या कल्पनेला अनुसरून लिहला असतो. जसे आपण शाळेत निबंध लिहतो तेव्हा. समजा निबंध आहे माझी आई, तर पहिला अनुच्छेद आई आपल्याला का आवडते मग दुसरा अनुच्छेद आई चे लहानपण कसे होते असं.
कायदा, अधिनियम बनवताना पण अनुच्छेद बनवलेले असतात. समजा चोरी केल्यावर दंड देण्याचा कायदा असेल तर त्यात खूप सारे अनुच्छेद बनतील ज्यात वेगळ्या वेगळ्या प्रकारची चोरी चे दंड सांगितले असतील.
कलम म्हणजे काय?
कलम अर्थात धारा म्हणजे असं असं झालं तर असं असं करायचे असं सविस्तर पूर्ण डिटेलमध्ये लिहलेले असणे होय. कलम ला सेक्शन, आर्टिकल, विधान, नियमावली पण म्हणतात.
ज्यात गुन्ह्याची पूर्ण दखल घेऊन एकदम सविस्तरपणे काय कार्यवाही करायची, कोण करू शकेल, कोणाकोणावर करायची, किती करायची असं सगळं सगळं नीट सुटसुटीतपणे दिलेलं असते. असं वर वर पाहायला गेले म्हणजे कलम म्हणजे कायदाच होतो ज्यात सगळे हक्क आणि नियम लिहलेले असतात आणि ते तुटले का काय होईल ते पण..
उदारणार्थ :
कलम ४९७ सध्या गाजत आहे, कलम १९८ पण.. ह्या पतिपत्नीच्या व्यभिचाराबद्दल आहे.
परिशिष्ट म्हणजे काय?
आपणास माहित आहे कि जे काही कलमे कायदे लिहले गेले बनवले गेलेत त्यांना आता बरीच वर्ष होऊन गेली आहेत. एवढ्या वर्षांत असंख्य गुन्हे झालेत आणि ह्या कायद्यांचा कलमांचा वापर करून त्यांनुसार कार्यवाही झाली. परंतु जसा जसा वेळ गेला बऱ्याच कलमात काही गोष्टी नव्याने ऍड झालीत, तशी गरज पडली. परिस्थिती बदलत गेली आणि कलमात कायद्यात नवनवीन छोटं मोठं बदल होत गेलेत.
जेव्हा कायद्यांत कलमात काही नवीन गरजेचं ऍड करायचं असतं तेव्हा त्याला सरळ कलमात न लिहता परिशिष्ट अ, ब, क, ड असं ठरवून नमूद केलं जात. परिशिष्ट म्हणजे Addendum अर्थात थोडंसं एक्स्ट्रा ऍड केलेलं.
0
Answer link
अनुच्छेद, कलम आणि परिशिष्ट हे कायदे, नियम किंवा करारांसारख्या औपचारिक कागदपत्रांचे भाग आहेत. त्यांच्यातील फरक खालीलप्रमाणे:
अनुच्छेद (Article):
- अनुच्छेद हा कायद्याचा किंवा कराराचा एक स्वतंत्र भाग असतो.
- हे कायद्यातील विशिष्ट विषयावर माहिती देतात.
- उदा. भारतीय संविधानात ३९५ अनुच्छेद आहेत.
कलम (Section):
- कलम हे कायद्याच्या विशिष्ट भागातील एक उपविभाग आहे.
- एका अनुच्छेदात अनेक कलम असू शकतात.
- कलम विशिष्ट तरतुदी आणि नियमांविषयी माहिती देतात.
परिशिष्ट (Schedule):
- परिशिष्ट म्हणजे कायद्याच्या शेवटी जोडलेली अतिरिक्त माहिती.
- यात आकडेवारी, तक्ते, याद्या किंवा कराराचे तपशील असू शकतात.
- हे कायद्याचा भाग नसतात, परंतु कायद्याला अधिक स्पष्टता देतात.
थोडक्यात, अनुच्छेद कायद्याचा मुख्य भाग असतो, कलम त्यातील उपविभाग असतो, तर परिशिष्ट अतिरिक्त माहिती पुरवते.
अधिक माहितीसाठी: