फरक डॉक्टर वैद्यकीय शिक्षण आरोग्य

एमडी आणि एमबीबीएस डॉक्टर मध्ये काय फरक आहे?

2 उत्तरे
2 answers

एमडी आणि एमबीबीएस डॉक्टर मध्ये काय फरक आहे?

26
१. मूलभूत पदवी : MBBS. हे कुटुंबवैद्य असतात.
२. पदव्युत्तर शिक्षणाच्या दोन प्रमुख शाखा : MD & MS
३. MD मध्ये जवळपास ५० उपशाखा आहेत. त्यापैकी नेहमी लागणारे डॉ.( Consultant / Specialist) खालील शाखांचे असतात:

• मेडिसिन : हे डॉ. हृदय, फुफ्फुस, पोटातील अवयव, मेंदू , मधुमेह, रक्तदाब इ. चा एकत्रित अभ्यास केलेले असतात.
• फुफ्फुसरोग तज्ञ
• बालरोगतज्ञ
• स्त्री रोग व प्रसूती तज्ञ
• त्वचा व गुप्तरोग तज्ञ
• मनोविकार तज्ञ
. Pathology ( laboratory medicine)
• Radiology ( X ray, sonography, CT scan, MRI इ.) तज्ञ
• भूलतज्ञ

४. MS मध्येही खूप उपशाखा आहेत. त्यापैकी नेहमी लागणारे तज्ञ असे :

• जनरल सर्जन
• हाड व सांधे विकारतज्ञ ( Orthopedics)
• डोळ्यांचे विकार तज्ञ
• कान, नाक व घसा तज्ञ
• Plastic surgeon

५. DM ही MD च्या पुढील Superspeciality आहे. यात सुमारे ३० उपशाखा आहेत. त्यातील नेहमीच्या अश्या :
• हृदयविकार तज्ञ
• मेंदूविकार तज्ञ
• कर्करोग तज्ञ
• पोट व यकृत विकार तज्ञ
• रक्तविकार तज्ञ
• हॉरमोन विकार तज्ञ
• मूत्रपिंड विकार तज्ञ
• सांधे विकार तज्ञ (Rheumatologist)
• संसर्गजन्य विकार तज्ञ
• अतिदक्षताविभाग तज्ञ ( Critical Care Medicine)
• Immunologist

६. MCh ही MS च्या पुढील Superspeciality आहे. त्यातील प्रमुख उपशाखा :

• हृदय शस्रक्रिया तज्ञ
• मेंदू शस्रक्रिया तज्ञ
• पोट, यकृत इ. चा शस्रक्रिया तज्ञ
• बालक शस्रक्रिया तज्ञ
• कर्करोग शस्रक्रिया तज्ञ
• मूत्रमार्ग व प्रोस्टेट शस्रक्रिया तज्ञ
• हात शस्रक्रिया तज्ञ

MD & MS ना समकक्ष असणारा अजून एक अभ्यासक्रम म्हणजे Diplomate of National Board (DNB). ही पदवी राष्ट्रीय पातळीवर परिक्षा घेऊन दिली जाते. या अंतर्गतही वर उल्लेखिलेल्या अनेक उपशाखा असतात. सर्वसामान्य लोकांना DNB हे नेमके काय हे फारसे माहित नसते. तेव्हा अशी पदवी असणारा डॉ. हा स्पेशालिस्टच असतो हे ध्यानात घ्यावे.
तर थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. उपयोगी पडावा ही अपेक्षा. काही शंका असल्यास त्यांचे स्वागत.
उत्तर लिहिले · 25/9/2018
कर्म · 9150
0

एमडी (डॉक्टर ऑफ मेडिसिन) आणि एमबीबीएस (बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी) हे दोन्ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रम आहेत, पण त्यामध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत:

एमबीबीएस (MBBS):

  • हा एक पदवी स्तरावरील (Undergraduate) अभ्यासक्रम आहे.

  • एमबीबीएस पूर्ण केल्यावर, एक व्यक्ती डॉक्टर म्हणून प्राथमिक आरोग्य सेवा (Primary healthcare) देण्यासाठी पात्र होते.

  • या अभ्यासक्रमात शरीरशास्त्र (Anatomy), शरीरक्रियाशास्त्र (Physiology), औषधशास्त्र (Pharmacology) आणि शस्त्रक्रिया (Surgery) यांसारख्या विषयांचा समावेश असतो.

एमडी (MD):

  • एमडी हे पदव्युत्तर (Postgraduate) शिक्षण आहे, जे एमबीबीएस पूर्ण झाल्यावर केले जाते.

  • एमडी केल्यावर, तुम्ही एखाद्या विशिष्ट क्षेत्रात विशेषज्ञ (Specialist) बनता, जसे कीInternal Medicine (इंटर्नल मेडिसिन), बालरोगशास्त्र (Pediatrics), त्वचाविज्ञान (Dermatology) किंवा मानसोपचार (Psychiatry).

  • एमडीमध्ये तुम्हाला तुमच्या निवडलेल्या विषयात अधिक सखोल ज्ञान आणि प्रशिक्षण मिळते.

सारांश:

एमबीबीएस तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रातील मूलभूत ज्ञान देते, तर एमडी तुम्हाला विशिष्ट क्षेत्रात विशेषज्ञ बनवते.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980

Related Questions

विदर्भात एकूण किती वैद्यकीय महाविद्यालय आहेत?
मला भविष्यात मेडिकल टाकायचे आहे, तर त्यासाठी मला कोणते शिक्षण घ्यावे लागेल?
डीएमएलटी (DMLT) बुक मराठीत कुठून भेटेल?
एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर मी आता काय करू?
डॉक्टरची सर्वात मोठी पदवी कोणती?
MBBS चा फुल फॉर्म काय आहे?
एमबीबीएस सारख्या डिग्री विषयी माहिती हवी आहे, कृपया मदत करा?