शब्दाचा अर्थ स्वभाव

धैर्य म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

धैर्य म्हणजे काय?

12
धैर्य” शब्दाचा अर्थ “रोखठोखपणा, मनमोकळेपणा, स्पष्टवक्‍तेपणा” असा होतो...
“धाडस, आत्मविश्‍वास, निर्भीडता” हे अर्थ देखील या शब्दात समाविष्ट आहेत. पण, धैर्याने बोलण्याचा अर्थ फटकळपणे किंवा इतरांच्या भावना दुखावतील अशा रीतीने बोलणे असा होत नाही...
धैर्य म्हणजे स्वतःला धीर देणे... आणि पुढे चालत राहणे...
उत्तर लिहिले · 22/9/2018
कर्म · 458560
7
⬇️

 ▶️ 🌐
  • 🔶धैर्य
एक उशीराचं समाधान:


✍️* एका शिक्षकाने आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाला एक एक छानसं 🍫🍫🍫चाँकलेट दिले आणि नंतर एक विचित्र अट घातली ⬇️

 ▶️ मुलानो! मी दहा मिनिटांत प्राचार्यांना भेटून परत येतो, तो पर्यंत तुम्ही तुमची चाॅकलेटस् खायची नाहीत. असे सांगून ते शिक्षक वर्ग कक्षातून बाहेर पडले.

🍫🍫🍫वर्गात काही क्षण शांतता होती, प्रत्येक मुल त्यांच्या चाँकलेटकडे पहात होते आणि प्रत्येक क्षणी स्वत: ला चाँकलेट खाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत होते. दहा मिनिटे संपली आणि शिक्षकाने वर्गात प्रवेश केला. आढावा घेतला. संपूर्ण वर्गात अशी सात मुले होती, की ज्यांच्या हातात चाॅकलेट जसेच्या तसे होते, तर इतर सर्व मुले चाॅकलेट खात होती आणि तिच्या रंग आणि चवीबदल भाष्य करीत होती. शिक्षकाने गुपचुपपणे या सात मुलांची नावे आपल्या डायरीत नोंदविली आणि नोंद घेतल्यानंतर ती नावे वर्गात वाचून दाखविली.
या शिक्षकाचे नाव होते 🔶 प्रोफेसर वॉल्टर मिशेल 🔶

👍👍👍बऱ्याच वर्षानंतर, प्रोफेसर वॉल्टर यांनी स्वतःची डायरी उघडली आणि सात मुलांची नावे काढून त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. दीर्घ प्रयत्नानंतर त्यांना माहीती मिळाली की या सात मुलांनी त्यांच्या जीवनात खूप यश मिळवले आहे आणि ते त्या त्या क्षेत्रातील लोकांमध्ये सर्वात यशस्वी आहेत. मग प्रोफेसर वाल्टर यांनी आपल्या उर्वरित विद्यार्थ्यांचा ज्यांनी चाॅकलेटस् खाल्ली होती

😯😯😯त्यांचाही शोध घेतला आणि त्यांना असे आढळले की त्यातील बरेच लोक सामान्य ते अतिसामान्य जीवन जगत होते, त्यात असे काही लोक होते ज्यांना कठोर आर्थिक आणि सामाजिक संकटांचा सामना करावा लागला होता, काही व्यसनाधीन झाले होते.

▶️या सर्व प्रयत्नांचा आणि संशोधनाचा परिणाम प्रोफेसर वॉल्टर यांनी एका वाक्यात सांगितला ते वाक्य होते -
⬇️


"जो माणूस दहा मिनिटे धैर्य ठेवू शकत नाही तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही."

या संशोधनाला जगभरात प्रसिद्धी मिळाली आणि त्याला * "मार्श मेलो थिअरी" * असे नाव देण्यात आले कारण प्रोफेसर वॉल्टर यांनी मुलांना दिलेल्या चाॅकलेटचे नाव "मार्श मेलो" होते . ते फोमसारखे मऊ आणि उच्च दर्जाच्या चवीचे होते.

 🌐🌐🌐
या सिद्धांतानुसार,
जगातील सर्वात यशस्वी लोकांमध्ये 'धैर्य' हा गुण विषेशत्वाने आढळतो, कारण ही गुणवत्ता माणसाची शक्ती वाढवते, ज्यामुळे माणूस कठीण परिस्थितीत निराश होत नाही आणि हा गुणविशेष लाभलेला मनुष्य विलक्षण व्यक्तिमत्ववाचा धनी असतो.


🔶धैर्य हे जीवनाचे सार आहे.🔶
उत्तर लिहिले · 20/4/2020
कर्म · 115390
0

धैर्य म्हणजे भीती, दुःख किंवा बदलांना न डगमगता तोंड देण्याची मानसिक आणि भावनिक शक्ती.

धैर्य म्हणजे:

  • धैर्याने वागणे: संकटांचा सामना करताना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खंबीर राहणे.
  • आत्मविश्वास: स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असणे.
  • नकारात्मकतेवर मात करणे: अडचणींवर मात करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे.

धैर्य एक महत्त्वाचे गुण आहे, जो आपल्याला जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करतो.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 860

Related Questions

तरुण पिढी व वडील पिढी यांची स्वभाव वैशिष्ट्ये काय आहेत?
उद्बोधन, प्रबोधन, कीर्तन, प्रवचन, टीकाटिप्पणी, निंदानालस्ती, वादविवाद स्पर्धा सर्वच ठिकाणी आहे. कथा, व्यथा, संवेदना आहेत. महाभारत, रामायण ऐकून देखील मनुष्य स्वभाव का बदलला नाही? आजची नेतागिरी आणि विकास नीती पर्व नेमकं काय करते? पैसा, सत्ता, अहंकार यांचे निर्मूलन कधी होईल? विवेकी उत्तर हवे.
सण सोहळे, उपास, व्रत वैकल्ये तसेच आदर सत्कार, पूजाअर्चा यांनी परंपरेचा साज चढवला आहे, त्यात भर म्हणून वाढदिवस, मुंज, बारसे हे उत्सव साजरे करत रितीरिवाज तयार झाले, यात्रा, जत्रा, रौप्य, अमृत, हिरक महोत्सव साजरे होतात. हे चित्र प्रेमाभक्तीने निर्मळ, निरंकुश, निरागस असावे असा मनुष्य स्वभाव धर्म आवश्यक वाटतो काय?
पत्रामधून लेखकाचे व्यक्तिमत्व, स्वभाव, त्याची विचार पद्धती याचे दर्शन होते, हे विधान साने गुरुजींच्या 'सुंदर पत्रे' या पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
पत्रामधून लेखकाचे व्यक्तिमत्व, स्वभाव, त्याची विचार पद्धती याचे दर्शन होते, हे विधान साने गुरुजींच्या सुंदर पत्रांमधील लेखकावरून स्पष्ट करा.
पाऊस आला मोठा या गौरी देशपांडे यांच्या कथेतील स्त्री स्वभावाचे दर्शन घडवा?
१९९४ मध्ये गॅट करार रद्द झाल्यामुळे काय बदल दिसून आले?