3 उत्तरे
3
answers
जीवाश्म (Fossil) म्हणजे काय ?
14
Answer link
📙 *जीवाश्म (Fossil) म्हणजे काय ?* 📙
************************************
इतिहासाचे लिखित ज्ञान जेमतेम काही शतकांवर थांबते. पुराणोक्त व परंपरागत ज्ञानालाही काही हजार वर्षांच्या मर्यादा पडतातच. संस्कृतीतील चालीरितींचा मागोवा घेत गेले, तरी या पलीकडच्या काळातील माहिती आपल्या हाती कधीच लागत नाही. मग पृथ्वीच्या उगमापर्यंत, जन्मापर्यंत पोहोचण्यासाठी इतिहास गुंडाळायचा तरी कसा व कोठे ? येथेच जीवाश्म मदतीला येतात. जीवाश्म किंवा अश्मीभूत अवशेष हा शब्द 'खणुन वर काढणे' या अर्थी मूळ लॅटिन शब्दापासून 'फाॅसिल' पासून आला आहे. जमिनीखाली गाडले गेलेले अवशेष काही कारणाने खोदकाम करताना वर काढले जातात, त्यावेळी त्यांचे स्वरूप अंतर्बाह्य बदललेले असते. नैसर्गिक क्षारांची पुटे बसून मूळ सांगाड्याने टिकाऊ रूप घेतलेले असते, पण त्यांचा आकार व त्यांचे मूळ दृश्य रूप यांची तंतोतंत कल्पना या अश्मीभूत अवस्थेतही येत असते. यालाच आपण जीवाश्म (फॉसिल) म्हणतो. सजीवाचा अश्मीभूत सांगाडा म्हणजे जीवाश्म जेव्हा आपल्या हाती लागतो, तेव्हा त्याचे जिवंत पेशींनी बनलेले सर्व भाग नष्ट झालेले असतात, पण सांगाड्यावरून आकारमान, स्वरूप यांची पूर्ण कल्पना येऊ शकते. एखादी माणसाची कवटी समोर असली तरी त्यावरून त्या माणसाचा चेहरा, मुखवटा तयार करण्याचे शास्त्र आपण खूपसे अवगत केले आहे. तसाच थोडाफार प्रकार या अवशेषांतून केला जातो. अशा पद्धतीत सांगाड्यातील सांध्याचा प्रकार कळला की त्यांची हालचाल कशी होऊ शकेल, याचा प्रथम विचार, मग त्यासाठी आवश्यक स्नायूंच्या रचनेचा विचार, मग त्यावरील आवरणे म्हणजे कातडीचा विचार - या धर्तीने संपूर्ण प्राण्याचे चित्र आपल्यासमोर उभे राहू शकते. पुरातनकालीन महाकाय डायनासॉर व मानवाचे उत्क्रांतीतील टप्पे व विविध वनस्पतींचे प्रकार यांचे यथार्थ चित्र या पद्धतीनेच रेखाटले जाते. केवळ म्हणूनच कोट्यवधी वर्षांचा इतिहास आपल्याला आज उलगडू शकतो आहे.
जीवाश्म बनतात कसे ? वरवर पाहता ही अगदी सहज घडणारी गोष्ट आहे. ओसाड जंगलातील नदीकाठी एखादी महाकाय मगर मरून पडली, तर काही दिवसांतच तिच्या देहातील सर्व मांसल भागाचे कुजून, जीवाणूंकडून किंवा अन्य प्राण्यांनी खाऊन विघटन होते. राहिलेला सांगडा नदीतून येणाऱ्या पाण्यातील मातीखाली गाडला जाऊ शकतो. या काळात दरवर्षी भर पडत जाते. काही वर्षांनंतर या गाळाच्या दबणार्या वजनाखाली हा थर पक्का होत जातो. याच वेळी सांगाड्यातील हाडांभोवती जमिनीतील खनिजांचा पक्का थर जमा होत असतो. ही हाडे पोकळ असतील, तर त्यांच्या आतही हा थर जमा जातो. काही काळाने जमिनीखालील उष्णतेमुळे हा सर्वच गाळ कडक बनत जातो. त्याचे खडकात रूपांतर होते; पण या मगरीच्या सांगाड्याच्या स्वरूपामध्ये अगदी इंचभराचाही फरक होत नाही. हा सर्व काळ मात्र खूपच मोठा म्हणजे निदान पन्नास एक हजार वर्षांपेक्षा जास्त असतो. जमिनीचे थर बनवण्यासाठी जो कालावधी लागतो, त्यावरून त्याच्या खोलीवरून हा काळ निश्चित केला जातो. असाच प्रकार समुद्राच्या तळाशीही अधिक सहजपणे घडू शकतो. असे हे जीवाश्म आपल्यासमोर येण्याचे कारण म्हणजे विविध कारणांनी मानवाने केलेले खोदकाम. कोळसा मिळवणे, नदीच्या पात्रातील वाळू काढणे, बांधकामासाठी दगड काढणे, खाणीतून खनिजे काढणे या जोडीलाच अनेकदा समुद्रातील उलथापालथीत किनारे उघडे पडून तेथील खडकही उघडे पडतात व अनायासे हे जीवाश्म आपल्यासमोर येतात.
जीवाश्म जसेच्या तसे म्हणजे मांसल पेशींच्या स्वरूपासकट सापडण्याच्या काही शक्यता म्हणजे बर्फाळ दलदलीत रुतलेले प्राणी वर्षानुवर्षे जसेच्या तसे टिकण्याच्या, या प्रकारातून उद्भवतात. सैबेरियामध्ये हत्तीस्वरूप प्राणी संपूर्ण आकारात जसेच्या तसे सापडले आहेत. तेथे जेमतेम दोन ते चार फुटांखाली फक्त बर्फाचे थर आढळतात. हे थर अनेक हजार वर्षे तसेच राहिलेले आहेत. त्यांतच हे अवशेष आढळतात. काही झाडांतून चिकट रेझिनचा स्राव बाहेर येत असता त्यात अडकलेले जिवंत कीटक तसेच अश्मीभूत होतात. हा स्राव नंतर अंबर या रंगीत खड्यांच्या स्वरूपात आपण गोळा करतो. क्वचित आढळणारे अतिपुरातन कीटक संपूर्णपणे जसेच्या तसे या पद्धतीत आपल्यासमोर येतात.
जीवाश्म किंवा फाॅसिलचा काळ ठरवण्याच्या शास्त्रीय पद्धती आहेत. याखेरीज जगभरातील अवशेष एकमेकांशी ताडून पाहून त्यावरूनही अंदाज व्यक्त केले जातात व काळ नक्की होतो. सर्वात जुना जीवाश्म साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीचा स्ट्रोमॅटोलाइटचा अलगीचा आहे. हा ऑस्ट्रेलियात आढळतो. अलीकडचा जीवाश्म कदाचित तुम्हीसुद्धा सापडू शकाल.
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

0
Answer link
जीवाश्म (Fossil) म्हणजे काय:
जीवाश्म म्हणजे फार पूर्वी होऊन गेलेल्या सजीवांचे अवशेष. हे अवशेष खडक, माती, किंवा बर्फ यांमध्ये सुरक्षित राहतात.
- व्याख्या: मृत झालेल्या सजीवांचे (प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव) अवशेष जे भूगर्भामध्ये नैसर्गिकरित्या जतन केले जातात, त्यांना जीवाश्म म्हणतात.
- निर्मिती:
- जेव्हा एखादा सजीव मरतो, तेव्हा त्याचे शरीर कुजायला लागते. पण काहीवेळा, शरीर कुजण्याऐवजी माती, वाळू किंवा चिखलाने झाकले जाते.
- कालांतराने, या माती-चिखलाच्या थरांची जाडी वाढते आणि ते दाबले जातात. दाबामुळे हे थर दगडांमध्ये रूपांतरित होतात.
- सजीवांच्या शरीराचे रूपांतर खनिजांमध्ये होते आणि त्यांचे ठसे त्या खडकांमध्ये कायम राहतात. या ठशांनाच जीवाश्म म्हणतात.
- उपयोग:
- जीवाश्मांच्या अभ्यासाने पृथ्वीवर होऊन गेलेल्या जीवसृष्टीची माहिती मिळते.
- जीवाश्मांद्वारे वेगवेगळ्या कालखंडातील सजीवांची उत्क्रांती (evolution) कशी झाली, हे समजते.
- जीवाश्म हे भूगर्भशास्त्र (geology) आणि जीवाश्मविज्ञान (paleontology) यांसारख्या शास्त्रांसाठी महत्त्वाचे आहेत.
अधिक माहितीसाठी: