औषधे आणि आरोग्य आरोग्य व उपाय रोग आरोग्य

व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय?

16
व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास म्हणजे काय..? 
आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होण्याचे प्रमाण वाढले आहे. व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे अशुद्ध रक्तवाहिन्यामध्ये (शिरामध्ये) रक्त एका ठिक़ाणी जमा होते आणि यामुळे शिरा फुगतात. यामुळे शिरामध्ये प्रचंड वेदना होतात त्याठिकाणी सूज येते. खूप वेळ उभे राहणाऱ्या लोकांमध्ये हा त्रास होण्याचे प्रमाण जास्त आहे.

व्हेरिकोज व्हेन्सची लक्षणे : 
• पायांच्या शिरामध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे.
• ‎शिरा (व्हेन्स) सुजलेल्या असतात.
उत्तर लिहिले · 14/9/2018
कर्म · 569225
7
व्हेरिकोज व्हेन्स / Varicose Veins

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावरही दिसतो. आज वेरीकोज व्हेंन्स गंभीर आजार म्हणून समोर येत आहे. या आजारापासून आराम मिळण्यासाठी इंजेक्शन थेरिपी उपलब्ध आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, या आजाराला नैसर्गिक उपचार पद्धतीने बरे करता येऊ शकते. व्हेरिकोज व्हेन्सचं दुखणं फारच त्रासदायक असतं. म्हणूनच तुमच्या या नियमित सवयी नकळत व्हेरिकोज व्हेन्सचा धोका कसा वाढवतात. वेरीकोज व्हेंन्स या आजारामुळे मांसपेशिंमध्ये पायांमध्ये जडपणा आल्यासारखे वाटते यामुळे चालताना त्रास होतो. आज खासरे वर बघूया व्हेरिकोज व्हेन्स कशामुळे होतो व काही अश्या पद्धती सांगत आहोत ज्यामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल.

काय आहे वेरीकोज व्हेंन्स

या नसा लांब आणि सुजलेल्या असतात. या नसांचा रंग वांग्याप्रमाणे होत जातो. साधारण या व्हेन्स पाय आणि गुडघ्यादरम्यान असलेल्या आतील भागात असतात. या नसांची निर्मिती तेव्हा होते जेव्हा नसांमध्ये वॉल्व ( जे रक्त हृदयापर्यंत पोहोचवण्याचे काम करते) योग्य प्रकारे काम करणे बंद करते. यामुळे नसांमध्ये रक्त एका ठिक़ाणी जमा होते आणि यामुळे नसा फुगतात.

फार काळ उभं राहणं

काहींना नोकरीचा एक भाग म्हणून सतत उभं रहावं लागतं. एकाच जागेवर उभे राहिल्यामुळे व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास वाढतो. एकाच जागी उभं राहण्यापेक्षा थोडं चाला, फिरा यामुळे हा आजार टाळता येऊ शकतो. अन्यथा पायांवर ताण येतो. रक्त साखळण्याचा धोका वाढतो. हळूहळू रक्तवाहिन्यांमधील व्हॉल्वचेही नुकसान होते.

फार काळ बसणं

जसं एकाच ठिकाणी उभं राहणं त्रासदायक आहे तसेच बसून राहणंदेखील आरोग्याला नुकसानकारकच ठरते. डेस्क जॉब असणार्‍यांना हा त्रास अधिक जाणवतो. फार काळ बसून राहिल्याने लठ्ठपणा वाढण्यासोबतच व्हेरिकोज व्हेन्सचा त्रासही वाढतो. त्यामुळे ठराविक वेळाने उठून इतरत्र काही वेळ फिरा.

हाय हिल्स

आज काल हाय हिल्सची फैशन आली आहे पण त्यामुळे आरोग्यावर नकळत काही परिणाम होऊ शकतो. हिल्स घालून चालल्याने रक्तवाहिन्यांच्या कार्यात अडथळा येतो. परिणामी व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास बळावतो. त्यामुळे हाय हिल्स म्हणजेच उंच टाचेच्या सँडल वापरू टाळाव्या किंवा वापरूच नये.

पाय क्रॉस करून बसणं

पायांवर पाय ठेवून बसण्याच्या सवयीमुळे पायांवर आणि हिप्सवरही ताण येतो. यामुळे रक्तवाहिन्या फुगतात. हळूहळू जाळं वाढतं.

मीठ अति खाणं

अति मीठ सेवन शरीरास नेहमीच हानिकारक आहे. चीनमध्ये तर काही लोक मिठात योग्य प्रमाणात पाणी टाकून रोज पितात हे स्लो पॉयझनचे काम करत व आत्महत्या करतात. वेफर्स, लोणचं, पापड यामध्ये मीठ अधिक असते पण त्याचा आहारात अधिक प्रमाणात समावेश केल्यास व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास वाढू शकतो. मीठामुळे शरीरात पाणी साचून राहते आणि त्याचा ताण रक्तवाहिन्यांवर येतो.

अजून काही कारणे

प्रेग्नेंसीच्या काळात होणारे हारमोनल बदल, बर्थ कंट्रोल पिल्सचे अतिसेवन , टाइट अंडरगारमेंट्स अथवा नसांना मार लागल्याने हा आजार होतो. हा आजार जेनेटिक सुध्दा आहे.

काही घरगुती उपाय ज्यामुळे आराम मिळेल.

रोज फिरायला जा, मॉर्निंग वॉक करा. यामुळे पायांच्या नसा मजबूत होतील. फाइबरयुक्त आहाराचा सामावेश करा. पण मैदा, पास्ता हे पदार्थ खाणे टाळा. झोपताना पाय उंचावर ठेवा. जर तुम्ही रोज योगा करत असाल तर यामध्ये सर्वागासन शामिल करा. यामुळे व्हेरीकोज व्हेंन्स विकसित होणार नाही.

झेंडूच्या फुलचा रस नसांवर लावल्याने फायदा होईल. व्हेरीकोज व्हेंन्सचा त्रास कमी करणारे फ्लैवोनॉइड या फुलामध्ये असल्याने याचा फायदा होतो. या फुलाची पेस्टकरुन नसांवर लावल्याने आराम मिळतोद्राक्षाच्या बीपासून तयार करण्यात आलेल्या तेलाने मालिश करा. यामध्ये ऍन्टी इंफ्लेमेटरी तत्व असल्याने सूज कमी होण्यास मदत होते. स्मोकिंग करणे टाळा.कारण स्मोक केल्याने नसा फुगण्यास सुरुवात होते. व्हेरीकोज व्हेंन्सचा त्रास असणा-यांसाठी सिगरेट पिणे धोकादायक ठरू शकते.

प्राकृतिक  उपचारांनी व्हेरिकोज व्हेन्स हा आजार पूर्णपणे बरा होतो.
आम्ही दिलेल्या उपचारामुळे फक्त ६ महिन्यात व्हेरिकोज व्हेन्स संपूर्ण नष्ट होतात.



आमच्या कडील उपचार करून घेण्यासाठी  आम्हाला 8378863861 या क्रमांकावर कॉल किंवा व्हॉटसअप करू शकता.

धन्यवाद.

श्री वियोगी वेलनेस सेंटर
उत्तर लिहिले · 16/9/2020
कर्म · 6850
0
व्हेरिकोज व्हेन्स (Varicose veins) म्हणजे पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये होणारी एक समस्या आहे. या समस्येमध्ये, पायांच्या रक्तवाहिन्या मोठ्या आणि फुगलेल्या दिसतात.

कारणे:

  • जास्त वेळ उभे राहणे
  • वयानुसार रक्तवाहिन्या कमजोर होणे
  • अनुवंशिकता
  • लठ्ठपणा
  • गर्भावस्था

लक्षणे:

  • पायांमध्ये दुखणे
  • पायांना सूज येणे
  • रक्तवाहिन्या जांभळ्या किंवा निळ्या दिसणे
  • पायांमध्ये जडत्व जाणवणे
  • त्वचेवर खाज येणे

उपचार:

  • जीवनशैलीत बदल (वजन कमी करणे, नियमित व्यायाम करणे)
  • कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज (Compression stockings) वापरणे
  • औषधोपचार
  • शस्त्रक्रिया (Surgery)
व्हेरिकोज व्हेन्स गंभीर नसले तरी, काहीवेळा ते वेदनादायक असू शकतात आणि त्यामुळे जीवनाची गुणवत्ता खालावू शकते.
अधिक माहितीसाठी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे आणि वैद्यकीय सल्ला नाही.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980

Related Questions

'Soar Throat' आणि 'Strep Throat' यात नेमका काय फरक आहे?
कोरोना केव्हापासून सुरू झाला होता?
कोरोनामुळे ज्या लोकांचा मृत्यू झाला अशा लोकांचे पोस्टमार्टम का करण्यात आले नाही?
कोरोनामुळे ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांचे पोस्टमार्टम का करण्यात आले नाही?
कोरोनामुळे ज्या लोकांचे जीव घेणे अशा लोकांच्या पोस्टमार्टम का केला गेला नाही?
कोरोनामुळे ज्या लोकांचे जीव केले गेले तर अशा लोकांचे लोकांचे पोस्टमार्टम का केले गेले नाहीत त्याबद्दल आपले मत लिहा?
कोरोनामुळे ज्या लोकांची जीव गेलेत अशा लोकांचे पोस्टमार्टम का केल्या गेले नाही त्याबद्दल आपले मत लिहा?