3 उत्तरे
3 answers

TR व Heavy लायसन्स यांमध्ये फरक काय?

11

TR म्हणजेच Transport व Heavy म्हणजे जड व मालवाहतुकीची वाहने. TR लायसन्स हे आपल्याला सुरुवातीलाच काढावे लागते, म्हणजे आपण जेव्हा चारचाकीचे ड्रायव्हिंग लायसन्स काढतो तेव्हा.....चारचाकी लायसन्स नंतर हेवी लायसन्स आर.टी.ओ.च्या नियमानुसार 1 वर्षानंतर मिळते व त्यासाठी आपल्याला पुन्हा apply करावे लागते....तसेच कुठलेही Transport लायसन्स दर तीन वर्षांनी renew करावे लागते......

उत्तर लिहिले · 13/9/2018
कर्म · 9340
1
TR म्हणजे चार चाकी कोणती ही ( सफेद किंवा पिवळी) नंबर प्लेट असलेली गाडी चालवू शकता
आणि हेव्ही म्हणजे सहा किंवा आठ चाके असलेली गाडी परवाना असतो
उत्तर लिहिले · 13/9/2018
कर्म · 4685
0
TR (ट्रेलर) आणि Heavy लायसन्समध्ये (अवजड वाहन परवाना) मुख्य फरक खालीलप्रमाणे आहेत:
  • TR लायसन्स (ट्रेलर लायसन्स):

    हे लायसन्स फक्त ट्रेलर (ट्रेलर म्हणजे इतर वाहनांनी ओढले जाणारे वाहन) चालवण्यासाठी असते. ज्या गाड्या स्वतःहून चालत नाहीत, पण दुसऱ्या वाहनांना जोडून ओढल्या जातात, त्या चालवण्यासाठी हे लायसन्स आवश्यक आहे.

  • Heavy लायसन्स (अवजड वाहन परवाना):

    हे लायसन्स मोठ्या वजनाची वाहने चालवण्यासाठी लागते. जसे की ट्रक, बस, मोठे टेम्पो इत्यादी. अवजड वाहन परवाना तुम्हाला स्वतःहून चालणाऱ्या मोठ्या गाड्या चालवण्याची परवानगी देतो.

सारांश: TR लायसन्स हे फक्त ट्रेलर चालवण्यासाठी आहे, तर Heavy लायसन्स हे मोठ्या वजनाची स्वतःहून चालणारी वाहने चालवण्यासाठी असते.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5220

Related Questions

वाहन लायसन बंद आहे चालु करण्यासाठी काय करावे लागेल?
लायसन्स नंबर माहीत नसल्यास काय करावे?
ट्रायल झाल्यावर लायसन्स किती दिवसांनी येते?
दुचाकी आणि चारचाकी वाहन लायसन एकसाथ कसे काढता येईल?
टी आर लायसनची टेस्ट दिल्यानंतर लायसन्स पोस्टाने किती दिवसात घरपोच येते?
एन टी आर लायसनची ट्रायल दिल्यानंतर लायसन पोस्टाने घरी किती दिवसात येते?
हेवी लायसेन्सची ट्रायल टेस्ट दिल्यानंतर किती दिवसात लायसेन्स पोस्टाने घरपोच येते?