सरकारी योजना सामाजिक गैर-सरकारी संस्था

एनजीओ हे काय आहे, डिटेलमध्ये सांगा?

2 उत्तरे
2 answers

एनजीओ हे काय आहे, डिटेलमध्ये सांगा?

13
एनजीओ चा अर्थ नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायजेशन, स्वयंसेवी संस्था होय. एनजीओ काही उद्देश डोळ्यासमोर ठेवून चालविण्यात येतात. सामाजिक समस्यांवर मात करणे आणि विविध क्षेत्रांमध्ये विकासाच्या गतीला बळ देणे यासाठी या संस्थांची निर्मित्ती केली जाते. या संस्थांचे कार्य हे शेती, पर्यावरण,शिक्षा, संस्कृती, मानवाधिकार, स्वास्थ, महिला समस्या, बाल–विकास इत्यादी असू शकते. ही अशी क्षेत्र आहेत जेथे आपण नाव आणि पैसा दोन्हीही कमावू शकतो. एनजीओ एक स्वयंसेवी संस्था आहे. एनजीओ संस्थेच्या नोंदणासाठी कोणत्याही एका विशेष क्षेत्राची निवड करावी लागते. ज्यामध्ये महिला सशक्तीकरण, ग्रामीण भागात शिक्षणाचा स्तर, आरोग्य सुविधा, बाल कामगार, अनाथ मुले, युवा किंवा वृध्दाश्रम यांच्या पुनर्वसनासाठी कार्य करावे लागते.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेपासूनच म्हणजेच १९४५ सालापासूनच एनजीओ ची सुरवात झाली. अमेरिकेत अंदाजे १.५ बिलीयन एवढ्या एनजीओ आहेत, रशिया मध्ये दोन लाख सत्त्याहत्तर हजार एनजीओ आहेत, तर भारतात २००९ च्या आकडेवारी नुसार जवळ–पास दोन बिलीयन एनजीओ आहेत. त्यानुसार सहाशे भारतीयांमागे एक एनजीओ आहे असे मानन्यात येते. या संस्था ह्या शासनाच्या मदतीशिवाय चालतात.म्हणजेच या संस्थां सदस्य नोंदणी करुन सदस्यत्वांकडून मदत मिळवतात. तर कार्पोरेट कंपनींद्वारे ही या संस्थांना मदत दिली जाते. कंपनींच्या सीएसआर (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलीटी) या नियमाद्वारे कंपनीच्या नफ्यातील दोन टक्के हे सार्वजनिक कामासाठी खर्च केले जातात. त्याचबरोबर उद्योजक, काही संघटना, समाजसेवक, सेलिब्रीटी यांद्वारेही यास अनुदान मिळते. सर्विस प्रोव्हायडर एनजीओ या उत्पादीत वस्तूंची विक्री तसेच पुरवत असलेल्या सेवांच्या बदल्यात

अनुदान प्राप्त करुन घेतात.

समाज सेवेची आवड असलेल्या तरुणांसाठी एनजीओ (Non government Organization) मध्ये प्रत्यक्ष सहभागी होवून करिअर करण्याची संधी उपलब्ध होत असल्याने तरुणांची या क्षेत्रात येण्याची क्रेझ वाढते आहे. देशात होऊ घातलेल्या समस्यांच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी तरुणाई रस्तावर येते आहे.नोकरी करुन पैसा कमावणे हा एकच हेतू न बाळगता सामाजिक बांधिलकी जपणे समाजाच्या विविध प्रश्नांवर गांभिर्याने विचार करणे व त्याविचारातून कृती करण्यासाठी एकत्र येणे हे या तरुणाईला कर्तव्याचाच भाग वाटू लागला आहे. त्यामुळे एनजीओं द्वारे समाजकार्य आणि त्यातच करीअर करण्यात तरुणांना आनंद वाटतो आहे. 
एक वेळ अशी होती या क्षेत्रामध्ये खास करुन स्वताची समाजसेवी संस्था असणारे किंवा समाजासाठी दान करु इच्छिणारेच लोक येत होते, परंतु आता एनजीओ रोजगाराचे महत्वाचे साधन बनले आहे. बहुतांश वेळेस दुसऱ्या इतर नोकऱ्यांपेक्षाही अधिक वेतन असणारे काम येथे मिळू शकते. आंतरराष्ट्रीय एनजीओ मध्ये काम मिळाल्यास करीअरच्या दृष्टीने दुग्धशर्करेचाच योग म्हणावा लागेल. सद्य स्थितीत कोणत्याही एनजीओ किंवा गैर सरकारी संस्थाचे व्यवस्थापन एक महत्वाचे काम बनले आहे. एनजीओ द्वारे दरवर्षी अरबों रुपयांच्या सेवा सुविधा लोकांपर्यंत पोहचविण्यात येतात. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये एनजीओ ह्या शेती आणि सर्विस सेक्टर यांच्यामधील दुवा म्हणून काम करतात.

एनजीओंचे कार्यक्षेत्र हे जागतिक पातळीवर विस्तारले आहे. यालाच लक्षात घेवून असे म्हटले जाते की एनजीओ व्यवस्थापन क्षेत्रामध्ये करीअरच्या अनेक संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

एनजीओंचे कार्य हे टीमवर्क प्रमाणे मानण्यात येते. एखाद्या एनजीओंद्वारे चांगले काम केल्यास त्या संस्थेस राष्ट्रीय–अंतरराष्ट्रीय पुरस्काराने तसेच सरकार आणि जागतिक बँक द्वारे अनुदान देण्यात येते. एनजीओ व्यवस्थापनाद्वारे जागतिक, सामाजिक तसेच आर्थिक व्यवस्था समजणे आणि व्यवस्थित करण्यात मोलाची मदत मिळते आहे. हेही मानण्यात येते की दिवसेंदिवस वाढणाऱ्या समस्यांमुळे येणाऱ्या काळात एनजीओं ना अधिक महत्व प्राप्त होईल. ज्यांना आवडीने या क्षेत्रात काम करायचे आहे, त्यांना येथे अधिकतम रोजगार मिळेल.

महिला सबलीकरण, ग्रामीण आरोग्य क्षेत्र, दुष्काळ किंवा पूर आपत्ती पुनर्वसन सेंटर, माध्यमिक शिक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये व्यवस्थापकीय करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात युवा ग्लोबल गव्हर्नमेंट मध्ये ही नोकरी मिळू शकते. एननेस्टी इंटरनेशनल, युनेस्को, वर्ल्ड बैंक, नाटो,युनिसेफ, रेडक्रॉस, ग्रीनपीस, कॉमनवेल्थ राइट्स इनेशिएटिव यांमध्ये एनजीओ व्यवस्थापकांची कम्युनिटी सर्विस प्रोव्हायडर, सोशल सर्विस प्रोवायडर, फाइनेंस एंड ह्युमन रिसोर्स कंट्रोल इ्त्यादी पदांवर नियुक्ती केली जाते. या पदांसाठी अनुभवास अधिक प्राधान्य देण्यात येते.
उत्तर लिहिले · 11/9/2018
कर्म · 458560
0

एनजीओ (NGO) म्हणजे काय?

एनजीओ म्हणजे अशासकीय संस्था (Non-Governmental Organization). ही एक ना नफा ना तोटा (non-profit) तत्वावर काम करणारी संस्था आहे, जी सरकारचा भाग नसते. एनजीओ स्थानिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करू शकतात.

एनजीओची उद्दिष्ट्ये काय असतात?

  • सामाजिक कार्य: गरीब, दुर्बळ आणि गरजू लोकांना मदत करणे.
  • पर्यावरण संरक्षण: नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करणे आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवणे.
  • शिक्षण: लोकांना शिक्षित करणे, शाळा आणि महाविद्यालये चालवणे.
  • आरोग्य: आरोग्य सेवा पुरवणे, आरोग्य शिबिरे आयोजित करणे.
  • मानবাধিকার: लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणे.
  • आपत्ती व्यवस्थापन: नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत करणे.

एनजीओ कसे काम करतात?

  • देणग्या: लोक आणि संस्थांकडून देणग्या स्वीकारणे.
  • अनुदान: सरकार आणि इतर संस्थांकडून अनुदान मिळवणे.
  • सदस्य शुल्क: सदस्यांकडून शुल्क घेणे.
  • कार्यक्रम आयोजित करणे: देणग्या मिळवण्यासाठी कार्यक्रम आयोजित करणे.

भारतातील काही प्रसिद्ध एनजीओ:

  • प्रथम (Pratham): शिक्षणासाठी काम करते. प्रथम
  • स्माइल फाउंडेशन (Smile Foundation): आरोग्य, शिक्षण आणि उपजीविका या क्षेत्रात काम करते. स्माइल फाउंडेशन
  • गूंज (Goonj): नैसर्गिक आपत्तीत मदत करते. गूंज

एनजीओची भूमिका काय आहे?

  • एनजीओ समाजातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारला मदत करतात.
  • हे दुर्लक्षित आणि वंचित लोकांचा आवाज बनतात.
  • एनजीओ लोकांना एकत्र आणून सामाजिक बदल घडवतात.

टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. अधिक माहितीसाठी आपण संबंधित संस्थळांना भेट देऊ शकता.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1040

Related Questions

आजच्या तरुणांची व्यसनाधीनता?
वृद्धांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय धोरण स्पष्ट करा?
स्वच्छ भारत अभिनायचा जनक कोनाला म्हणतात?
स्वच्छ भारत अभियानाचे काय?
'हंडाभर चांदण्या' या एकांकिकेतील पाणी प्रश्नाचे स्वरूप विशद करा?
गोरगरिबांना उद्धारण्यासाठी, बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणून समाजसुधारकांनी सहकारी संस्था हे संघटन तयार करून उभे केले, ते टिकले पाहिजे. यासाठी निस्वार्थ सेवा देणारे खरे सेवार्थी हवे आहेत, याबद्दल आपले मत काय आहे?
'स्त्री-पुरुष समानता' या विषयावर प्रबोधनपर कीर्तनाची संहिता लिहा. (२० ते ३० ओळी)?