महाराष्ट्रातील सर्व नद्यांची माहिती?
इंद्रायणी नदी भारतातील महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ही नदी पुणे जिल्ह्यात लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते. पुढे टाटा धरणामुळे नदी लुप्त होते आणि धराणापासून परत सुरू होते.लोणावळा शहरातील इंद्रायणीचा प्रवाह साधारणपणे सुमारे ४ किलोमीटरचा आहे. शहरातले नदीपात्र अत्यंत अरुंद आहे. कामशेत रेल्वे स्टेशनजवळ ते पात्र बर्यापैकी रुंद आहे. आळंदी गावातून वहात वहात पुढे जाऊन इंद्रायणी नदी ही भामा नदीला घेऊन तुळापूर गावाजवळ भीमा नदीस मिळते.
कुंडलिका नदी (किंवा कुंडली) ही इंद्रायणीची उपनदी आहे. त्यांचा संगम वडिवळे या गावाजवळ होतो. त्या संगमापासूनच इंद्रायणी नदी वाहती होते, वडिवळे धरण कुंडलिकावर आहे.
कुंडलिका (कुंडली) व इंद्रायणी यांच्या संगमावर शंकराचे प्राचीन मंदिर आहे. शिवरात्रीला या मंदिरात भाविकांची खूप गर्दी होते.
इंद्रायणीच्या वरच्या बाजूला धरणाजवळ कुबेरगंगा नावाची एक लहान नदी इंद्रायणीला मिळते. तेथे एक बेट झाले आही, हेच सिद्धबेट म्हणून पुढे प्रसिद्ध झाले.
कृष्णा | |
---|---|
![]() श्री शैल्यम, आंध्र प्रदेश येथील कृष्णा नदीने तासलेल्या घळीतून नदीपात्राचे दृश्य | |
उगम | सह्याद्रीमध्येमहाबळेश्वरजवळ |
पाणलोट क्षेत्रामधील देश | महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश |
लांबी | १,२९० किमी (८०० मैल) |
उगम स्थान उंची | १,१३६ मी (३,७२७ फूट) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | २.९५ लाख |
उपनद्या | वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, तुंगभद्रा, घटप्रभा, |
धरणे | धोम, अल्लमट्टी, श्रीशैलम, नागर्जुनसागर |
कृष्णा नदी (मराठी: कृष्णा; कन्नड: ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ; तेलुगू: కృష్ణా నది ;) ही दक्षिणी भारतातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. ही नदी महाराष्ट्रातील महाबळेश्वरजवळ उगम पावून सुमारे १,३०० कि.मी. अंतर पार करत आंध्र प्रदेशातीलराजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते. वाटेमध्ये ती कर्हाड, औदुंबर, सांगली, नरसोबाच्या वाडीवरून कर्नाटक राज्यात प्रवेश करते. महाराष्ट्र राज्यातील कृष्णा नदीचा प्रवास २८१ कि.मी. आहे.
महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेली कृष्णा नदी पुढे पूर्वेकडे आंध्र प्रदेशात जाते. कर्नाटकात कृष्णेला दक्षिणेकडून येणारी घटप्रभा नदी मिळते. आंध्र प्रदेश व कर्नाटकच्या सीमेवर महाराष्ट्रातून येणारी भीमा नदी व कृष्णा यांचा संगम होतो. कृष्णा नदी आंध्र प्रदेशातल्या मच्छलीपट्टणमच्या दक्षिणेस बंगालच्या उपसागराला मिळते. मुखाजवळ तिचा प्रवाह ३ शाखांत विभागला जातो व त्रिभुजप्रदेश निर्माण होतात. कृष्णा नदीच्या खोर्याचा आंध्र प्रदेशांतील भाग अधिक विस्तृत व सुपीक आहे. तिच्या उगमाकडील भागात पावसाचा पाणीपुरवठा कमी असल्याने उगमाकडे उन्हाळ्यात पाणी खूप कमी असते.
आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर हे कृष्णा नदीवरील मोठे धरण आहे. तुंगभद्रा नदीवरील तुंगभद्रा धरण व कोयना धरणही तिच्या उपनद्यांवरील मुख्य धरणे आहेत. कृष्णा व गोदावरी यांचे त्रिभुजप्रदेश कालव्यांनी जोडले आहेत.
कृष्णा नदी आता बंगालच्या उपसागराला मिळत नाही कारण ती आता सुकत चालली आहे.
स्कंदपुराणामध्ये कृष्णानदीचे माहात्म्य ६० अध्यायांत वर्णन केलेले आहे. त्यामध्ये वाई (वैराजक्षेत्र), लिंब-गोवे, माहुली, कराड, नरसोबाची वाडी (अमरेश्वर), औदुंबर (भुवनेश्वरी) इत्यादी तीर्थक्षेत्रांचे महत्त्व वर्णन केले आहे.[१]
इ.स. सन १२१५ मध्ये यादव राजांनी बांधलेल्या महाबळेश्वराच्या हेमांडपंथी शिवमंदिराजवळ चंद्रराव मोरे यांनी पंचगंगा मंदिर बांधले. त्या देवळाच्या जवळपास कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या पाच नद्यांचा उगम आहे, असा सर्वसामान्य भाविकांचा समज असतो.[२]
दक्षिणी भारतातील इतर काही ठिकाणांप्रमाणेच कृष्णेच्या खोर्यातही अश्मयुगीन अवशेष आढळून आले आहेत.[३]
अथणी, कुरुंदवाड, चिक्कोडी, धनगांव, धोम, नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी), पसरणी, बहे, माहुली, मेणवली, रायबाग.
कुरुवपुर भिलवडी .
- समर्थ रामदासांनी कृष्णा नदीची आरती लिहिली आहे.
- कृष्णा (लेखक - अरुण करमरकर) : कृष्णा नदीचा उगम, तिचा विकास, तिला मिळणार्या नद्या, तिचे विशाल रूप आणि या नदीने सुजलाम्, सुफलाम् बनवलेला भूप्रदेश, या नदीवर बांधलेली धरणे, अनेक प्रकल्प, वादग्रस्त ठरलेला कृष्णा खोरे प्रकल्प, नदीच्या पाणीवाटपाचा प्रश्न अशा अनके गोष्टींचा ऊहापोह श्री. करमरकर यांनी आपल्या या छोटेखानी पुस्तकामध्ये केला आहे.
कृष्णा खोर्याचे एकूण क्षेत्रफळ ३६८०४८ चौरस. कि.मी. आहे. या एकूण क्षेत्रफळापैकी ६९४२५ चौ. कि.मी. म्हणजे २७ टक्के क्षेत्र महाराष्ट्रात, ११३२७१ चौ. कि.मी. म्हणजे ४४ टक्के क्षेत्र कर्नाटकात तर ७६२५२ चौ. कि.मी. म्हणजे २९ टक्के क्षेत्र आंध्र प्रदेशात आहे.
- कृष्णेच्या वारणा, येरळा, माण, अग्रणी व बोर या सांगली जिल्ह्यातून वाहणार्या प्रमुख उपनद्या आहेत. त्यांपैकी कृष्णा, वारणा व येरळा नद्या निश्चितपणे पाऊस पडणार्या प्रदेशातून वाहतात. कृष्णा ही सातारा जिल्ह्यातून वाहत येणारी नदी असून सांगली जिल्ह्यातील तिचा प्रवाह १३० किमी.चा आहे. ती वाळवा, पलूस व मिरज तालुक्यांतून प्रथम पश्चिमेकडून पूर्वेकडे व त्यानंतर आग्नेय दिशेस वाहते. कृष्णा नदीचे खोरे हा सांगली जिल्ह्यातील सुपीक भाग आहे. या जिल्ह्यातून वाहणार्या वारणा, येरळा व अग्रणी या प्रमुख उपनद्यांबरोबरच कासेगाव व पेठ या नद्या आणि कटोरा ओढा, वाळू ओढा व खरा ओढा हे प्रमुख प्रवाह कृष्णेला मिळतात.
- अग्रणी नदी कृणा नदीस अथणी येथे मिळते
- उरमोडी नदी कृष्णा नदीस काशीळ येथे मिळते.
- कोयना नदी कृष्णा नदीस कर्हाड येथे मिळते.
- डिंडी नदी कृष्णा नदीस ..... येथे मिळते.
- तुंगभद्रा नदी कृष्णा नदीस संगमेश्वर येथे मिळते.
- दूधगंगा नदी, ही कृष्णा नदीस ..... येथे मिळते.
- पंचगंगा नदी कृष्णा नदीस नरसोबाची वाडी (सांगली जिल्हा) येथे मिळते.
- पालेरू नदी कृष्णा नदीस मुक्तेश्वरपुरम येथे मिळते.
- भीमा नदी कृष्णा नदीस कर्नाटकात मिळते.
- मलप्रभा नदी कृष्णा नदीस कुडाळसंगम येथे मिळते.
- मुशी नदी कृष्णा नदीस वडपल्ली येथे मिळते.
- येरळा नदी कृष्णा नदीस ब्रम्हनाळ. येथे मिळते.
- वारणा नदी कृष्णा नदीस हरिपूर (सांगली जिल्हा) येथे पश्चिमेकडून वारणा नदी मिळते.
- वेण्णा नदी कृष्णा नदीस संगम माहुली येथे मिळते
गोदावरी (तेलुगू - గోదావరీ) नदीची गणना भारतातीलप्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिण गंगा असे सुद्धा म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वरया ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेयदिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात मिळते. भीमा, वैनगंगा, इ. उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून १० किमी अंतरावर व समुद्रापासून ८० किमी आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात.
गोदावरी(గోదావరీ) | |
---|---|
![]() | |
उगम | त्र्यंबकेश्वर |
मुख | काकिनाडा (बंगालचा उपसागर) |
पाणलोट क्षेत्रामधील देश | महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा |
लांबी | १,४६५ किमी (९१० मैल) |
उगम स्थान उंची | १,६२० मी (५,३१० फूट) |
सरासरी प्रवाह | ३,५०५ घन मी/से (१,२३,८०० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ३,१९,८१० |
उपनद्या | इंद्रावती, मंजिरा, बिंदुसरा |
धरणे | गंगापूर(नाशिक), नांदूर मधमेश्वर(नाशिक), डौलेश्वरम |
गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणार्या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यांतच वाहून जाते. नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी २०० मीटर (पूर्व घाट पार करताना) तर काही ठिकाणी ६.५ कि.मी. (समुद्रास मिळण्याआधी) इतकी होते. आपल्या पाण्यामुळे गोदावरीस महाराष्ट्र व आंध्र प्रदेशराज्यांची जीवनवाहिनी समजतात. ही नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. त्याच सोबत नांदेड शहराला गोदावरीचे नाभी-स्थान म्हणून ओळखले जाते. नाशिकच्या कुंभमेळाव्याला नांदेड च्या नंदीतट, उर्वशीतट इत्यादी स्नानाचे महत्व आहे.
भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरयेथे तिचा उल्लेख चंद्रभागा असा केला जातो. ती महाराष्ट्रात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ७२५ कि.मी. आग्नेयेस वाहून मिळते.
भीमा | |
---|---|
उगम | भीमाशंकर |
पाणलोट क्षेत्रामधील देश | महाराष्ट्र, कर्नाटक |
लांबी | ७२५ किमी (४५० मैल) |
उगम स्थान उंची | १,१०० मी (३,६०० फूट) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ४८,६३१ |
ह्या नदीस मिळते | कृष्णा |
उपनद्या | कुंडली |
धरणे | उजनी धरण |
नीरा नदी ही सोलापूर जिल्ह्यातील नरसिंगपूर-नीरा या गावाजवळ कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदी भीमेस मिळते. पाणलोट क्षेत्रफळ 46,184 चै. कि. मी.
महाराष्ट्रात पावसाळ्यात अनेकदा भीमेला पूर येतो.भीमा नदीवर एकूण बावीस धरणे आहेत. मुळा-मुठा आणि भीमा नदीचा संगम अहमदनगर जिल्हयात रांजणगाव सांडस येथे होतो.
पूर्णा नदी | |
---|---|
पूर्णा नदीचे मलकापूर येथील रमणीय दृश्य | |
पाणलोट क्षेत्रामधील देश | महाराष्ट्र |
उपनद्या | काटेपूर्णा वगैरे अनेक |
पूर्णा नदीचा उगम सातपुड्याच्या डोंगरांत मध्यप्रदेश राज्याच्या दक्षिण भागात भैसदेही येथून झाला आहे. हिचे प्राचीन नाव पयोष्णी असे आहे. ही नदी तापी नदीला संमातर अशी पश्चिमेकडे वाहत वाहत, शेवटी जळगाव जिल्ह्यातील चांगदेव येथे तापी नदीला मिळते. आरणा नदी, आस नदी, उतावळी नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी, गांधारी नदी, गोतमा नदी, चंद्रभागा नदी, नळगंगा नदी, निपाणी नदी, निर्गुणा नदी, पेंढी नदी, बोर्डी नदी, भावखुरी नदी, मन नदी, मास नदी, मोर्णा नदी, वाण नदी, विश्वगंगा नदी, शहानूर नदी, ज्ञानगंगा नदी या पूर्णेच्या उपनद्या आहेत. पूर्णा नदी ही तापी नदीचीउपनदी आहे. पूर्णा नदी अमरावती, अकोला, बुलढाणा व जळगाव या जिल्ह्यांमधून वाहते. पूर्णा नदीचे खोरे सुमारे ७५०० किलोहेक्टर इतके आहे. एकेकाळी बारमाही वाहणारी ही नदी आता अपुरा पाऊस व उगम स्थळावरील जंगलतोड यामुळे मृतावस्थेकडे झुकत आहे.
पूर्णा नदीला संपूर्णा नदी किंवा पयोष्णी नदी असेही म्हणतात,
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुका पूर्णपणे पूर्णा नदीवर अवलंबून आहे.मु
मुठा नदी
मुठा नदी पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. ह्या नदीचा उगम सह्याद्रीच्या पर्वतरांगेत होतो. पुणे शहरात मुळेला मिळते. ती पूर्व दिशेला वाहते. पुणे शहराच्या पूर्व बाजूस मुठेचा संगम मुळा नदीशी होतो. ही मुळा-मुठा नदी पुढे जाऊन तुळापूरयेथे भीमा नदीस मिळते.
मुठा | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | महाराष्ट्र |
ह्या नदीस मिळते | भीमा नदी |
धरणे | पानशेत धरण, खडकवासला धरण |
लवासा या गिरिस्थानाकडे जाताना टेमघर धरण लागते. हे मुठेवरचे पहिले धरण आहे. येथून लवासाला जाण्यासाठी डावीकडे वळले की उजवीकडचा अत्यंत दुर्गम कच्चा रस्ता जांभळी गावापासून पुढे निरगुडवाडीला जातो. त्यापुढचा रस्ता मात्र पायी ट्रेकिंग करत जावे असा आहे. साधारण दहा किमी अंतरावर मांडवखडक वस्तीजवळ आपली मुठा नदी सुरू होते. या उगमावरती एक गोमुख बसविलेले आहे.
उगमानंतर काही अंतरावर मुठेचे लहान मुलाप्रमाणे अवखळपणे दुडदुडणारे रुपडे दिसते. नंतर सांगरूणला आंबी नदी मुठेला येऊन मिळते. या जोडनदीला थोड्याच अंतरावर मोसे नदीसुद्धा येऊन मिळते. हा त्रिवेणी संगमच आहे.मुठा नदी हि प्राचीन नदी आहे.
पंचगंगा नदी ही पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा झाली आहे. पाच उपगंगांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार तिला पंचगंगा असे नाव पडले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे व औद्योगिकीकरणामुळे नदीमध्ये प्रदूषण होत आहे
पंचगंगा नदी | |
---|---|
![]() कोल्हापूरजवळ पंचगंगा नदी | |
उगम | प्रयाग संगम, चिखली, करवीर तालुका, कोल्हापूर |
मुख | नृसिंहवाडी (कृष्णा नदी) |
पाणलोट क्षेत्रामधील देश | महाराष्ट्र |
लांबी | ८०.७ किमी (५०.१ मैल) |
ह्या नदीस मिळते | कृष्णा नदी |
उपनद्या | कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती |
पंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते, ती प्रयाग संगमावरून (चिखली गाव, करवीर तालुका) ती सुरू होते. कुंभी, कासारी, तुळशी, आणि भोगावती नद्यांच्या प्रवाहातून ती तयार होते. स्थानिक दंतकथेनुसार गुप्त सरस्वती नदीही पंचगंगेला मिळते. या संगमानंतर नदी कोल्हापूरच्या उत्तरेवर एक गाळाचे पठार तयार करते आणि पूर्वेकडे वाहत जाते
पैनगंगा नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | भारत देश महाराष्ट्र राज्य |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | कोलवड परीसर |
धरणे | येळगाव धरन बुलडाणा |
पैनगंगा नदी ही महाराष्ट्रातील विदर्भातल्या बुलढाणाकोलवड, वाशीम व यवतमाळ या जिल्ह्यांतून, आणि मराठवाड्यातल्या नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांतून वाहणारी एक नदी आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील बुदनेशवर अजिंठा डोंगर येथे पैनगंगा नदीचा उगम आहे. ही नदी वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याच्या अगदी मध्यभागातून वाहते. यवतमाळ जिल्ह्याला अलौकिक वनसंपदा लाभली आहे. त्या जिल्ह्यातल्या, हिरवळीने नटलेल्या पैनगंगा अभयारण्यालातीन बाजूंनी स्पर्शून पैनगंगा वाहते. नदीच्या दुसऱ्या तीराला नांदेड जिल्हा आणि त्यातले किनवट अभयारण्य आहे.
किनवट तालुक्यात, पैनगंगा नदीवर सहस्रकुंड नावाचा धबधबा आहे. नदीचा प्रवाह खडकामधून विभागला आहे, त्यामुळे पाणी खाली कोसळताना दोन वेगवेगळ्या धारा पडतात. सोनधाबी आणि सहस्रकुंड धबधबा हे पैनगंगा अभयारण्याचे प्रमुख आकर्षण आहे.
पैनगंगा ही नदी बुलढाणा व यवतमाळ पठारावरून पूर्वेकडे वाहत जाते आणि यवतमाळच्या पूर्व सरहद्दीवर बल्लारपूर येथे वर्धा नदीला मिळते. ही नदी म्हणजे वाशीम व यवतमाळ जिल्हयांची दक्षिण सीमा आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात पेंदा नागढव येथे पैनगंगा नदीच्या काठी नागनाथाचे मंदिर आहे
पैनगंगा नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | भारत देश महाराष्ट्र राज्य |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | कोलवड परीसर |
धरणे | येळगाव धरन बुलडाणा |
पैनगंगा नदी ही महाराष्ट्रातील विदर्भातल्या बुलढाणाकोलवड, वाशीम व यवतमाळ या जिल्ह्यांतून, आणि मराठवाड्यातल्या नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांतून वाहणारी एक नदी आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील बुदनेशवर अजिंठा डोंगर येथे पैनगंगा नदीचा उगम आहे. ही नदी वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याच्या अगदी मध्यभागातून वाहते. यवतमाळ जिल्ह्याला अलौकिक वनसंपदा लाभली आहे. त्या जिल्ह्यातल्या, हिरवळीने नटलेल्या पैनगंगा अभयारण्यालातीन बाजूंनी स्पर्शून पैनगंगा वाहते. नदीच्या दुसऱ्या तीराला नांदेड जिल्हा आणि त्यातले किनवट अभयारण्य आहे.
किनवट तालुक्यात, पैनगंगा नदीवर सहस्रकुंड नावाचा धबधबा आहे. नदीचा प्रवाह खडकामधून विभागला आहे, त्यामुळे पाणी खाली कोसळताना दोन वेगवेगळ्या धारा पडतात. सोनधाबी आणि सहस्रकुंड धबधबा हे पैनगंगा अभयारण्याचे प्रमुख आकर्षण आहे.
पैनगंगा ही नदी बुलढाणा व यवतमाळ पठारावरून पूर्वेकडे वाहत जाते आणि यवतमाळच्या पूर्व सरहद्दीवर बल्लारपूर येथे वर्धा नदीला मिळते. ही नदी म्हणजे वाशीम व यवतमाळ जिल्हयांची दक्षिण सीमा आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात पेंदा नागढव येथे पैनगंगा नदीच्या काठी नागनाथाचे मंदिर आहे
पेंच नदी ही महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी मध्य प्रदेशातून उगम पावते. नागपूर जिल्ह्यात कन्हान नदीला मिळते. या नदीवर बांधलेल्या पेंच धरणातूननागपूर शहराला काही अंशी पाणीपुरवठा होतो.
कोयना नदी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी आहे. ही कृष्णेची उपनदी आहे. कर्हाड गावाजवळ या दोन्ही नद्यांचा संगम आहे. कोयना नदी व सोळशी नदीचा तापोळा येथे संगम होऊन ती पुढे कोयना धरणात सामावते. शिवसागर जलाशय या नावानेही ती ओळखली जाते.
कोयना नदी | |
---|---|
![]() कोयना नदी | |
इतर नावे | शिवसागर जलाशय |
उगम | महाबळेश्वर, महाराष्ट्र |
मुख | महाबळेश्वर मंदिर |
पाणलोट क्षेत्रामधील देश | महाराष्ट्र |
लांबी | १३० किमी (८१ मैल) |
उगम स्थान उंची | १,४३८ मी (४,७१८ फूट) |
ह्या नदीस मिळते | कृष्णा नदी |
उपनद्या | सोळशी |
धरणे | कोयना धरण |
महाराष्ट्रातील नद्या
महाराष्ट्रामध्ये अनेक नद्या आहेत, ज्या राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि पर्यावरणासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यांची माहिती खालीलप्रमाणे:
नद्यांची विभागणी
महाराष्ट्रातील नद्यांना त्यांच्या उगमस्थानानुसार आणि जल प्रणालीनुसार विभागले जाते:
- पश्चिम वाहिनी नद्या: ज्या नद्या सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावतात आणि पश्चिम दिशेला अरबी समुद्राला मिळतात.
- पूर्व वाहिनी नद्या: ज्या नद्या विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगेत उगम पावतात आणि पूर्वेकडे बंगालच्या उपसागराला मिळतात.
प्रमुख नद्या
पश्चिम वाहिनी नद्या
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्या: कर्ली, तेरेखोल
- रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या: शास्त्री, बावनदी, वाशिष्ठी
- रायगड जिल्ह्यातील नद्या: कुंडलिका, काळ, सावित्री
- ठाणे जिल्ह्यातील नद्या: वैतरणा, उल्हास
पूर्व वाहिनी नद्या
- गोदावरी नदी: महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी. त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते.
- उप नद्या: प्रवरा, मुळा, सिंदफणा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा.
- कृष्णा नदी: महाबळेश्वर येथे उगम पावते.
- उप नद्या: कोयना, पंचगंगा, वारणा, येरला, भीमा.
- तापी नदी: सातपुडा पर्वतरांगेत उगम पावते.
- उप नद्या: पूर्णा, गिरणा.
- नर्मदा नदी: ही नदी मध्य प्रदेशात उगम पावते आणि महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून वाहते.
नद्यांची माहिती
- गोदावरी नदी:
गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी असून ती दक्षिण भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. या नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो.
लांबी: सुमारे 1,465 किलोमीटर
- कृष्णा नदी:
कृष्णा नदी पश्चिम महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे उगम पावते. ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून वाहते.
लांबी: सुमारे 1,400 किलोमीटर
- तापी नदी:
तापी नदी मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगेत उगम पावते आणि पश्चिम दिशेला गुजरातमध्ये अरबी समुद्राला मिळते.
लांबी: सुमारे 724 किलोमीटर (महाराष्ट्रामध्ये)
- नर्मदा नदी:
नर्मदा नदी मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे उगम पावते आणि महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून वाहते. ही नदी पश्चिम वाहिनी असून अरबी समुद्राला मिळते.
लांबी: सुमारे 1,312 किलोमीटर
महत्व
महाराष्ट्रातील नद्या पिण्याच्या पाण्याची सोय, शेतीसाठी सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या नद्यांच्या किनारी अनेक तीर्थक्षेत्रे आणि शहरे वसलेली आहेत, ज्यामुळे त्यांचे सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व अधिक वाढते.
टीप: ही माहिती संकलित असून अचूकता सुनिश्चित करण्यासाठी, संबंधित शासकीय संकेतस्थळांना भेट द्या.