नकाशा देव

पंढरपूर विषयी माहिती सांगा?

2 उत्तरे
2 answers

पंढरपूर विषयी माहिती सांगा?

11
                        ☙ पंढरपूर ☙

पंढरपूर हा महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. त्या तालुक्यातलेपंढरपूर हे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे.दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. पंढरपूरमध्ये वर्षातून चार एकादश्यांना चार यात्रा भरतात – चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी. मराठी संस्कृती घडविणाऱ्या थोर भागवतधर्मीय संतांनी नावारूपास आणलेले महाराष्ट्राचे आद्य व पवित्र तीर्थक्षेत्र. येथील विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. पंढरपुरासभीमा (भीवरा) नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे म्हणून तिला‘चंद्रभागा’ म्हणतात. तिच्या वाळवंटात पुंडलिकाचे देवालय (समाधी) आहे. येथून विठ्ठलमंदीर सु. २०० मी. आहे. मध्यवस्तीतील हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची पूर्व-पश्चिम लांबी सु. १०७ मी. व दक्षिणोत्तर रूंदी सु. ५२ मी. आहे. देवळास तटबंदी असून त्याला पूर्वेस तीन, दक्षिणेस एक, पश्चिमेस एक व उत्तरेस तीन असे एकूण आठ दरवाजे आहेत. पूर्वेकडीलमहाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरून पोहोचण्यास बारा पायऱ्या आहेत. त्यांतील पहिली पायरी ही नामदेव पायरी होय. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात. या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोपऱ्यात संत चोखामेळा याची समाधी आहे.पुंडलिक नावाचा विष्णुभक्त होऊनगेला. तो पत्नी व आई-वडिल मुक्ताबाई आणि जानुदेव यांच्या बरोबर दिंडीरवन नावाच्या जंगलातरहात होता. पुंडलिक हा सत्गुणी पुत्र होता, पण त्याच्या लग्नानंतर तो आपल्या आई-वडिलांना वाईट वागणूक देऊ लागला. या वागणुकीला कंटाळून ते काशीला जाण्यासाठी निघाले. हे जेव्हा त्याच्या पत्नीला समजले, तेव्हा तीही तिकडे जाण्यासाठी निघाली. ती पतीसमवेत, घोड्यावर ते आई-वडिल ज्या समूहाबरोबर जात होते, तेथे पोहोचले. वाटेत ते एका आश्रमाजवळ पोहोचले, जो ‘कुक्कुटस्वामीं’चा होता. तेथे त्या सर्वानी एक-दोन दिवस थांबण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री सारे झोपी गेले, पण पुंडलिकाला झोप लागेना. पहाटे त्याला अस्वच्छ वस्त्रातील काहीतरुण स्त्रीया आश्रमात येताना दिसल्या. त्यांनी आश्रम स्वच्छ केला, पाणी आणून, स्वामिंचे कपडे धुतले आणि त्या बाहेर आल्या व पुंडलिकाजवळून जाऊन त्या अदृश्यझाल्या. पुढील पहाटेही त्याला तेच दिसले. पुंडलिकाने त्यांच्या पायाशी जाऊन त्या कोण आहेत हे सांगण्याची विनंती केली.त्या म्हणाल्या, की त्या गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्या आहेतजिथे भाविक आपली पापे धुतात. त्यामुळेच होतात त्या अस्वच्छ. “आणि तू आई-वडिलांना वाईट वागणूकदिल्याने, महापापी आहेस.” असे त्या म्हणाल्या. यामुळे त्याच्यात पूर्ण बदल झाला आणि तोचांगला व आज्ञार्थी पुत्र झाला वतो त्यांचा आदर राखू लागला. तेव्हा त्याने आई-वडिलांना विनंती केली, की यात्रा सोडून त्यांनी पुन्हा दिंडीरवनात यावे. एके दिवशी, भगवान श्री विष्णु एकटे असताना, त्यांना मथुरेतील दिवसांची आठवण होते. त्यांना आठवतात त्या गोप-गोपिकाआणि राधा. जरी ती मृत होती तरी, त्यांनी स्वतःच्या दिव्य शक्तींनी तिला पुन्हा जिवंत करून स्वतःजवळ स्थानापन्न केले. तेव्हाच रूक्मिणी कक्षात आली, आणि राधाने उभे न राहून त्यांचा निरादर केल्याने रूक्मिणीने रागाने द्वारका सोडली व दिंडीरवनात अज्ञातवासात आली. नंतर भगवान श्री विष्णु तिच्या शोधार्थ प्रथम मथुरा नंतर गोकूळला गेले, गोपाळांना भेटले. मग त्यांनीही शोध सुरू केला ते शोधार्थ गोवर्धन पर्वतावर गेले. शेवटी ते भीमा (चंद्रभागा) नदीतिराजवळ आले. सोबत असलेल्या गोपाळांना ‘गोपाळपूर’ येथे सोडून स्वतः दिंडीरवन जंगलात तिच्या शोधार्थ निघाले. आणि तिथे रूक्मिणी सापडल्यावर, तिचा राग शांत केला नंतर रूक्मिणीसह तेथेच असलेल्या पुंडलिकाच्या आश्रमात आले. पण तेव्हा पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करीत होता. जरी त्याला माहित झाले, की भगवान श्री विष्णु स्वतः भेटायला आले आहेत, तरी आई-वडिलांच्या सेवेसमोर त्याने तात्काळ भेटण्याचे नाकारून एक वीट त्यांच्याजवळ फेकली, त्यावर उभे राहण्यासाठी. पुंडलिकाची आपल्या आई-वडिलांविषयीची श्रद्धा पाहून भगवान श्री विष्णुने विलंबाची पर्वा केली नाही. विटेवर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहिली. नंतर पुंडलिकाने देवाची क्षमा मागून अशी विनंती केली की, त्यांनी भक्तांसाठी तेथेच असावे आणि भगवान श्री विष्णुने तसे वरदान दिले. तेव्हापासून भगवान श्री विष्णु आहेत विठ्ठल या अवतारात !विठ्ठल म्हणजे असा जो विटेवर उभाआहे. (विठ्ठल – विट + ठल (उभा ठाकणे) )आषाढी एकादशीचे महत्व –आषाढ महिन्यातील (जून-जुलै) शुक्ल/शुद्ध पक्षातील आकरावी तिथी ही प्रथमाएकादशी / महा एकादशी / देव-शयनी एकादशी म्हणूनओळखली जाते. हा मोठा पवित्र दिवस आहे. या दिवशी उपवास केला जातो. यादिवसापासून चातुरमास (चारमहिन्यांचा काळ) सुरू होतो, तो कार्तिकी एकादशीला संपतो. अशीमान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णु हे, क्षीरसागरात शेषनागावर, योगनिद्नेस जातात आणि योगनिद्नेतून बाहेर येतात ते कार्तिकी एकादशीला (प्रबोधिनी एकादशी) या काळात मांसाहार वर्ज्य केला जातो. पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे. शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने यादेवळाचा इ.स. ८३ मध्ये जीर्णोद्धार केला. ताम्रपटांवरून इ.स. ५१६ मध्ये राष्ट्रकूटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. इ.स. १२३९ च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळासभेट दिल्याचा दावा आहे. पादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. १२९६ मध्ये चालू झाली; तर इ.स. १६५० मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणाऱ्या पालखीची प्रथा पाडली.चंद्रभागेच्या वाळवंटा (नदीकाठच्या छोट्याशा वाळूच्या मैदाना) पलीकडून उंच शिखरे, सपाट कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे व त्या सर्वावर उठून दिसणारी विठ्ठल, रखुमाई व पुंडलिक मंदिरांची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो.दगडी तटबंदीमागे हे देवालय एका टेकडावर आहे. सुमारे ५२ मीटर रुंद व १०६ मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत. पूर्वेकडे तीन, उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक द्वार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून, ज्या अकरा पायऱ्या चढून गेल्यावर ते लागते त्यांतील एका पायरीला `नामदेव पायरी’ म्हणतात. कोपऱ्यात देवळीमध्ये गणपती असूनवरती नगारखाना आहे. महाद्वारावर सिंह, कमानी, वेकपत्ती वगैरे चुनेगच्ची नक्षीकाम आहे.मंदिराचे स्वरूप –मंडप १८ मीटर रुंद व ३७ मीटर लांब असून बाजूस ओवऱ्या व सुंदर लाकडीकोरीवकाम दिसून येते. सुमारे १० मीटर उंचीच्या दोन दीपमाळा व जवळच विष्णुवाहन गरुड व हनुमान यांची मंदिरे आहेत. पुढील सोळा-खांबीत एका लहान सभामंडपातून जाता येते. येथील दाराचे बाजूस सुरेख जय-विजय व तीन पायऱ्या असून त्यापैकी एक पितळी पत्र्याने मढवली आहे. डाव्या बाजूस खजिन्याची खोली आहे. सोळा-खांबीचे दगडी खांब कोरीव असून भाविकांच्या आशयाचा गरुडस्तंभ चांदीच्या पत्र्याने मढविला आहे. आत प्रवेश करतना उजव्या हातास सन्त एकनाथ महाराजाचे पणजोबा सन्त भानुदास महाराजान्ची समाधी आहे. सभामंडपाच्या उत्तरेकडे एक ओवरीअसून त्यात काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, रामेश्वर, दत्तात्रेय आणि नरसोबा यांच्या देवळ्या आहेत. चांदीचे नक्षीदार पत्रे चौखांबीच्या दरवाजास लावले आहेत. पूर्वेकडे शेजघर असून एका लहान अंतराळानंतर दोन मीटर चौरस गाभारा लागतो. रुक्मिणी मंदिरासारखी इतर लहान मंदिरे परिसरात आहेत. विठ्ठलाचेच परमभक्त पुंडलीक याची समाधी महाद्वार घाटावर आहे.त्रैलोक्यनाम भवन, तनपुरे मंडप वगैरे इतर महत्त्वाच्या वास्तू पंढरपुरात आहेत.देवळास समांतर पूर्वेकडे जाणाऱ्या गल्ल्या घाटाकडे जातात. सर्व बाराही घाटांचा वापरवारकरी करतात. त्यातील उद्धव, चंद्रभागा, दत्ता व अमळनेरकर घाटांचा वापर प्रामुख्याने होतो. महाद्वार घाट हा उत्सवासाठी महत्त्वाचा आहे. नदीला पाणी कमी असताना नदीच्या पात्राजवळची जागा वारकरी उतरण्यास तसेच भजनकीर्तनास वापरतात. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फड वगैरेमधून अनेक भक्त व वारकऱ्यांची सोय होते व सर्व पंढरपुरात भाविकांची वर्दळअसते.विठोबावे व रुक्मिणीचे अनेक मौल्यवान अलंकार असून ते विशिष्ट वेळी देवास घालतात. देवाच्या काकडआरतीपासून शेजारतीपर्यंत नित्य व नैमित्तिक असे अनेक पूजोपचार असतात. यात्रेच्या वेळी गर्दीमुळे पांडुरंगाचे दर्शन झाले नाही, तर देवालयाच्या शिखराच्या दर्शनाने भाविक लोक समाधान मानतात. नदीकाठी अकरा घाटबांधलेले आहेत मात्र ते सलग नाहीत. पुंडलिकाच्या देवळाच्या दक्षिणेस सुमारे १.२ किमी. वर विष्णुपद-वेणुनाद हे स्थान आहे. गावाच्या दक्षिणेस सुमारे १.६ किमी. वर गोपाळपूर येथे गोपालकृष्णाचे देऊळ आहे. यांशिवाय पंचमुखी मारूती, भुलेश्वर, पद्मावती, व्यास, अंबाबाई, लखूबाई, यमाई, जोतिबा, नगरेश्वर, सरकारवाडा महादेव, त्र्यंबकेश्वर, ताकपिठ्या विठोबा, कोटेश्वर, गोंदवलेकर राम,खाजगीवाले वाड्यातील विठ्ठल, रुक्मिणी व राधा यांच्या सोन्याच्या मूर्ती, नामदेवमंदिर, शाकंभरी (बनशंकरी), मल्लिकार्जुन, तांबडा मारुती, मुरलीधर, गारेचा महादेव, चंद्रभागा, दत्त, वटेश्वर महादेव,बेरीचा महादेव, काळा मारूती, चोफाला (विष्णुपंचायतन), पारावरील दत्त, बाभळ्याचा महादेव, अमृतेश्वर ही व इतरही काही मंदिरे पंढरपुरात आहेत. अलीकडे काही नवीन मंदिरेही झाली असून येथील कैकाडी महाराजांचा मठ प्रेक्षणीय आहे. १९४६ मध्ये साने गुरुजींनी हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपवास केला तेव्हा हरिजनांना मंदिर खुले झाले. यात्रेच्या वेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्काम ठोकतात.विठोबाच्या मूर्तीचे अनेकवेळा स्थानांतर झाल्याचे उल्लेख सापडतात. कधी आक्रमकांपासून बचावण्यासाठी ती बडव्यांनी लपवून ठेवली होती, तर कधी कोणी ती पळवून नेऊन मग पैसे घेऊन परत केली होती. सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती पण ती एकनाथांचे पणजोबा भानुदास यांनीपरत आणली, अशी कथा आहे. विठोबाची मूर्ती भिलसाजवळील उदयगिरी लेण्यातील तिसऱ्या शतकातील मूर्तीसारखी दिसते असे म्हणतात. तथापि निरनिराळ्या काळी निरनिराळ्या लोकांनी केलेल्या विठ्ठलमूर्तीच्या वर्णनाशी सध्याच्या मूर्तीचे वर्णन जुळत नाही. विठोबाचे हल्लीचे देऊळ फारजुने नाही. महाद्वार व बाकीचे देऊळ यांच्या रचनेत विसंगती आहे.मराठेशाहीत विठ्ठलमंदिरासाठी अनेक दाने दिल्याचे उल्लेख आढळतात. तथापि हे मात्र खरे, की संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा इ. मराठी संतांनी पंढरपूरचा महिमा वाढविला व गाजविला. महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्याच भक्तिभावाने येतात. त्यामुळे प्रादेशिक संस्कृतींचा समन्वय आणि मराठी-कानडी सामांजस्याचा दुवा सांधलाजातो.वारकऱ्यांची टाळमृदंगाच्या गजरात व विठ्ठलाच्या नामघोषात वारकऱ्यांच्या दिंड्या एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात. झेंडे, तुताऱ्या. सजवलेला स्वारीचा घोडा, अब्दागीर, पालख्या, इतर घोडे, बैलगाड्या यांचे ताफे व डोक्यावर तुळशीवृंदावन किंवा सामानाची गाठोडी घेतलेल्या मराठमोळ्या स्त्रिया या सर्वांच्या गर्दीने पंढरपुरात उत्सवी वातावरण निर्माण होते. चैत्री वारीच्या वेळी पंढरपुरातम्हशी-गाईंचा मोठा बाजार भरतो. यात्रेच्या वेळी उदबत्ती, हळद, कुंकू, खेळणी, फुले, माळा, बांगड्या, देवाच्या मूर्ती, तांब्या-पितळेची भांडी वगैरे अनेक वस्तूंची दुकाने सर्व ठिकाणी मांडली जातात व मोठा व्यापार होतो. आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला दुपारी खाजगीवाले वाड्याजवळ ग्रामप्रदक्षिणेला सुरवात होते.समोर हत्ती व घोडे असलेला हा रथ भाविक ओढतात. आंत विठ्ठल, राही व रुक्मिणीच्या मूर्ती असतात. या ‘भक्तिसंप्रदायाच्या आद्यपीठा’तआणि ‘भीमातटीय महायोगपीठा’त महाराष्ट्राच्या सर्व भागांतून आणि कर्नाटकादी इतर राज्यांतूनही प्रतिवर्षी आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशांस हजारो वारकरी आणि यात्रेकरू लोटतात. चैत्रातील व माघातील यात्रा त्या मानाने लहान असतात.
उत्तर लिहिले · 14/8/2018
कर्म · 35170
0

पंढरपूर हे महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये असलेले एक प्रसिद्ध शहर आहे. हे शहर चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेले आहे. पंढरपूर हे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.

इतिहास:

  • पंढरपूरचा इतिहास खूप प्राचीन आहे.
  • या शहराचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो.
  • विठ्ठल-रुक्मिणी मंदिर अनेक शतकांपासून भक्तांचे श्रद्धास्थान आहे.

मंदिरे:

  • विठ्ठल-रुक्मिणी मंदिर: हे पंढरपूरमधील सर्वात महत्त्वाचे मंदिर आहे. येथे विठ्ठल आणि रुक्मिणीची सुंदर मूर्ती आहे.
  • इतर मंदिरे: पंढरपूरमध्ये अनेक लहान-मोठी मंदिरे आहेत, जसे की पुंडलिक मंदिर, नामदेव मंदिर, आणि ज्ञानेश्वर मंदिर.

यात्रा:

  • पंढरपूरची वारी खूप प्रसिद्ध आहे.
  • आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते, ज्यामध्ये लाखो भाविक सहभागी होतात.
  • भाविक चंद्रभागा नदीत स्नान करतात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात.

संस्कृती:

  • पंढरपूरची संस्कृती धार्मिक आणि आध्यात्मिक आहे.
  • येथे अनेक संत आणि महात्म्यांनी वास्तव्य केले आहे, ज्यामुळे या शहराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
  • पंढरपूरमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव साजरे केले जातात.

**अधिक माहितीसाठी:**

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 860

Related Questions

Dev देव कुठे आहे?
मुंबईतील कामगार मैदानावर झालेल्या सभेत शंकरराव देव यांनी जनतेला कोणते आव्हान केले?
पशुधनाचे रक्षण करणारा देव होता का?
माझा एक नास्तिक मित्र आहे. आमचं देव आहे की नाही यावर चर्चा चालू आहे. त्याचा असा प्रश्न होता की जगात ५ वर्षाच्या मुलीसोबत पण बलात्कार होतात, तर ती घटना होत असताना देव का त्या मुलीला वाचवू शकत नाही? जर देवाचे अस्तित्व आहे आणि देव सगळं बघतोय, तर गुन्हेगाराला शिक्षा नक्कीच भेटेल, पण देव वाचवू का नाही शकत?
पशु पालनाचे रक्षण करणारा देव होता का?
देव नसून घंटी वाजवतो?
महाराष्ट्र दर्शन मध्ये कोणकोणते देवस्थान पाहण्यासारखे आहेत?