शिक्षण कागदपत्रे प्रक्रिया अर्ज

टी सी काढण्यासाठी अर्ज कसा लिहायचा?

3 उत्तरे
3 answers

टी सी काढण्यासाठी अर्ज कसा लिहायचा?

23
दिनांक -
प्रति,
मा.प्राचार्य,
..... महाविद्यालय,
.....
विषय - टि.सी. दाखला मिळणेबाबत...
अर्जदार - ......
मा.महोदय,
उपरोक्त विषयास अनुसरून मी सविनय सादर करतो की, मी आपले महाविद्यालयामध्ये .. शाखेतील या वर्गात शिक्षण घेत आहे. माझे वडील हे शासकीय नोकरीस असून त्यांची बदली ... या जिल्ह्यात झालेली आहे.त्यामुळे मी व माझे आईवडील असे आम्ही सर्वजण त्याठिकाणी राहणेस जाणार आहे. त्यामुळे मला माझे यापुढील शिक्षण आपले महाविद्यालयामध्ये घेणे गैरसोईचे होणार आहे.  त्याकरिता मला ... येथील महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे. तरी आपले विद्यालयातून टि.सी.दाखला मिळावा ही नम्र विनंती आहे.
आपला कृपाभिलाषी,
.....
उत्तर लिहिले · 28/7/2018
कर्म · 9175
0
टी सी साठी अर्ज | शाळा सोडल्याचा दाखला मिळणे बाबत अर्ज | TC Sathi Arj | Application For TC in Marathi


टी सी साठी अर्ज PDF| शाळा सोडल्याचा दाखला मिळणे बाबत अर्ज PDF डाउनलोड करा







उत्तर लिहिले · 12/6/2021
कर्म · 10
0
टीसी (Transfer Certificate) काढण्यासाठी अर्ज कसा लिहायचा यासाठी एक उदाहरण खालीलप्रमाणे:

उदाहरण १:

प्रति,
मुख्याध्यापक,
(शाळेचे नाव)
(शाळेचा पत्ता)


विषय: शाळा सोडल्याचा दाखला (Transfer Certificate) मिळणेबाबत.


महोदय,
मी आपल्या शाळेतील (इयत्ता/वर्ग) चा/ची विद्यार्थी/विद्यार्थिनी आहे. माझ्या वडिलांचे/आईचे बदली (शहराचे नाव) येथे झाल्यामुळे, मला आता (दिनांक) पासून आपल्या शाळेत येणे शक्य नाही.

तरी, कृपया मला माझा शाळा सोडल्याचा दाखला (Transfer Certificate) लवकरात लवकर देण्याची कृपा करावी, जेणेकरून मला पुढील शाळेत प्रवेश घेता येईल. मी आपल्या शाळेतील सर्व देयके (Dues) भरली आहेत.


आपला/आपली आज्ञाधारक विद्यार्थी/विद्यार्थिनी,
(तुमचे नाव)
(वर्ग/इयत्ता)
(रोल नंबर)
(पालकांची सही)


टीप:
  • आपण आपल्या गरजेनुसार आणि कारणानुसार बदल करू शकता.
  • अर्ज शाळेत जमा करण्यापूर्वी, शाळेच्या नियमांनुसार आवश्यक कागदपत्रे जोडा.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1040

Related Questions

निवेदनाचे प्रमुख दोन प्रकार स्पष्ट करा?
माझ्या शेतात तलावाच्या पाण्याचा मार्ग एका व्यक्तीने माती टाकून अडवला आहे, तर मी काय करू? कुठे अर्ज करू?
निवेदन म्हणजे काय?
अर्ज लेखन म्हणजे काय?
धर्मादाय आयुक्तांकडे संस्था रजिस्ट्रेशन साठी करावयाचा अर्ज?
अंशकालीन उमेदवार म्हणून नोंदणी करता येते काय?
5) मतदार यादीतील मतदाराच्या नावाबद्दल हरकत घ्यावयाची झाल्यास कोणता फॉर्म भरावा लागतो ?