आरोग्य धनसंपदा यावर 200 शब्दांत कल्पनाविस्तार करा?
Marathi Unlimited
आरोग्यंम् धन संपदा
”आरोग्यंम् धन संपदा” निरोगी शरीर.
निरोगी शरीर मानव जिवनाच सार्थक ठरू शकतं ! आपल्या भारतीय संस्कृतीत संतांनी, जेष्ठ आणि श्रेष्ठ महात्म्यांनी म्हटले आहे कि सर्व प्रथम सुख म्हणजे आरोग्य. शरीर, मन, निरोगी राहणे हेच सर्वोत्तम सुख होय. निरोगी मनुष्य सर्व कार्य उत्तम रीतीने करू शकतो. रोगी मनुष्य हा परिवाराला, समाजाला भार स्वरूप असतो. दुसऱ्यान कडून सेवा करून घेणे म्हणजे, तो एक प्रकारे सेवारुपी कर्ज होय. निरोगी राहण्या साठी आपल्या ऋषी-मुनींनी चार आश्रमात आयुष्याचा बटवारा केलेला आहे.त्यात एक म्हणजे ‘ब्रम्हचर्यआश्रम’ होय.हे २५ वर्षाच्या कालावधीत मांडलेले आहे. हा एक शक्तिवर्धक आणि ज्ञांन, विद्यार्जन संपादन करण्याचा काळ आहे. या वयात मनुष्य भोगी किंवा विलासी कार्य करीत राहिला तर त्याचे आरोग्य बिघडल्या शिवाय राहणार नाही, तो बिमारीने ग्रस्त होऊ शकतो आणि व्याधीग्रस्त मनुष्य काहीच चांगले कार्य करू शकत नाही, दु:खांचा, बिमारीचा अंत करून आरोग्य प्राप्त करणे म्हणजेच मनुष्याचा मानव जीवनाचा पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ म्हणजे चार भागात विभागले आहेत, ते म्हणजे, अर्थ, धर्म, काम, मोक्ष या प्राप्ती साठी मनुष्याचे स्वास्थ्य अति उत्तम असायला हवे, आपण कुणाच्याही भरवश्यावर न राहता आपले जीवन आपल्या बळावरच जगले पाहिजे.व्याधीग्रस्तता हा मनुष्याचा सर्व प्रथम शत्रू होय, आणि निरोगी स्वास्थ्य शरीर म्हणजे आपला सर्वात जवळचा मित्र होय. या मित्राच्या आधारानेच परमपदाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहणे मनुष्याचे एकमात्र कर्तव्य आहे, कारण मानव शरीराची प्राप्ती फार दुर्लभ आहे. चौर्यांशी लक्ष योनी भटकंती [फेरा] केल्या नंतर मानव शरीर मिळतो, अश्या या दुर्लभ मानव देहाचा [ म्हणजेच प्रत्येक अवयवांना] रोगी बनवून जगणे म्हणजे बुद्धीमानी नव्हे. तेव्हा सदाचारी वृत्ती ठेवून जगण्याने त्या देहाला लंबे आयुष्य मिळेल व ते आयुष्य सार्थकी लावण्यात समजदारीहि होईल. सत्य बोलणे, अति विषय भोगाच्या दूर राहणे, क्रोध न करणे, सुभाष्य बोलणे, शांत व पवित्र राहणे, हिंसा न करणे, पूज्य, श्रेष्ठ व जेष्ट यांचा मान राखणे. ईश्वरा प्रती भक्तीभाव ठेवून जीवन व्यतीत करणे हे सर्व गुण परिपूर्ण असेल तर दीर्घ असे आयुष्य चांगल्या रीतीने व्यतीत होवू शकते. तसेच गरीब दीनांची मदत करणे, संतुलीत आहार ठेवणे, व्यायाम, प्राणायाम,तणाव मुक्त राहणे, अहंकारच्या दूर राहणे, कुणाचेहि मनभावना दुखवू नये, दयाभाव ठेवणे, प्रसंन्न व हसमुख राहणे, अति निद्रा नसणे हे सर्वतोपरी गुण निरोगी जीवनास आवश्यक आहे. आणि यातुनच परम प्राप्ती मिळू शकते, त्यासाठी वेगळे असे काहीच करावे लागत नाही. हेच अर्थ, धर्म, काम, मोक्ष याचे द्वार होय.
धन्यवाद
आरोग्य धनसंपदा
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, असे म्हटले जाते. निरोगी जीवन जगणे म्हणजे सर्वात मोठी धनसंपदा मिळवणे. आरोग्य चांगले असेल, तरच आपण आनंदी आणि समाधानी राहू शकतो.
आजच्या धावपळीच्या जीवनात, अनेक लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.Fast food आणि जंक फूडच्या आहारी जातात, ज्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्या वाढू लागल्या आहेत.
चांगले आरोग्य मिळवण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम करणे, संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे, पुरेशी झोप घेणे आणि तणावमुक्त राहणे महत्त्वाचे आहे.
योगा आणि Meditation केल्याने मानसिक शांती मिळते. त्याचप्रमाणे, नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून रोगांचे लवकर निदान होऊ शकेल.
निरोगी जीवनशैली आपल्याला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य प्रदान करते. त्यामुळे, आरोग्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे.
- नियमित व्यायाम: दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा.
- पौष्टिक आहार: फळे, भाज्या आणि धान्य आपल्या आहारात असावे.
- पुरेशी झोप: दररोज रात्री 7-8 तास झोप घ्या.
- तणावमुक्त जीवन: तणाव कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान करा.
या सोप्या गोष्टींचे पालन करून आपण आपले आरोग्य सुधारू शकतो आणि एक आनंदी जीवन जगू शकतो.