मान्सून पाऊस रोगप्रतिकारशक्ती आरोग्य

पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

3 उत्तरे
3 answers

पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

11


मोठ्या प्रतिक्षेनंतर वरुणराजा महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मात्र पावसाचा आनंद घेताना आरोग्याची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. वातावरणातील दमटपणा, थोडाफार गारवा आणि अंगावर ओले कपडे जास्त वेळ राहून देणे यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं. पावसाळ्यात विविध डासांचा प्रसार होतो. त्यामुळे पावसाळ्यात दवाखाने नेहमी हाऊसफुल्ल झाल्याचं आपण पाहतो. पावसाळ्यातील आजार टाळण्यासाठी स्वच्छता आणि त्यासोबत विविध बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे.

🤒 पावसाळ्यातील आजार

◽ हिवताप, मलेरियाः  पावसाळ्यात प्रामुख्याने डास चावल्यामुळे हिवताप किंवा मलेरिया होतो. एनॉफिलीस जातीच्या मच्छराने दंश केल्यास हिवतापाची लागण लगेच होते.

◽ सर्दी, खोकलाः अंगावर ओले कपडे जास्त वेळ, पावसात भिजणे यांमुळे सर्दी खोकल्यासारखे किरकोळ आजार उद्भवतात.

◽ दमाः ढगाळ वातावरणामुळे पावसाळ्यात दमा असणाऱ्या रुग्णांना त्रास जास्त जाणवतो. दमट, गार हवा आणि मंद पचनशक्ती यामुळे दम्याचा त्रास वाढतो.

◽ जुलाबः पावसाळ्यात पाण्याचे प्रदुषण जास्त होते. त्यामुळे आजार उद्भवण्याची शक्यता असते.

◽ पायाला चिखल्या होणेः पावसात जास्त वेळ भिजल्यास किंवा ओली चप्पल पायात जास्त वेळ ठेवल्यास चिखल्या होतात.

👨‍⚕ उपाययोजना आणि प्रतिबंध

पावसात भिजल्यास तत्काळ कपडे बदलणं गरजेचं आहे.
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न करणे. घरात किंवा परिसरात स्वच्छता ठेवणे. तसेच डास प्रतिबंधक औषधे, जाळ्या यांचा वापर करणे.
स्वच्छ किंवा उष्ण पाणी पिणे.
पावसात भिजणे टाळावे.
आजाराची लक्षणं दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे

🍎 आहार विषयक काळजी

पावसाळ्यात पचन न होणारा आहार घेतल्यास शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. त्यासाठी थंड पदार्थ, तेलकट पदार्थ, फास्ट फुड, उपवासासाठी शेंगदाणे किंवा भगर हे पदार्थ खाणे टाळावे. पचायला हलके आणि उष्ण पदार्थ शक्यतो घ्यावे. यामध्ये बेसन लाडू, टोमॅटो सुप, वांगी, भेंडवळ, कैरी, लिंबु, चिंच, सुखे खोबरे या पदार्थांचा वापर करावा.
उत्तर लिहिले · 10/7/2018
कर्म · 5605
0
पावसाळ्यात कशी घ्यावी आरोग्याची काळजी, यासाठी हा व्हिडिओ बघा ↓
उत्तर लिहिले · 24/7/2023
कर्म · 5250
0
पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही महत्वाचे उपाय खालीलप्रमाणे आहेत:
  • स्वच्छता राखा: पावसाळ्यात जंतू आणि किटाणू लवकर पसरतात. त्यामुळेpersonal hygiene जसे वारंवार हात धुणे, स्वच्छ कपडे घालणे आणि आसपासची जागा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
  • पाणी उकळून प्या: पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता असते, त्यामुळे पाणी उकळून पिणे आरोग्यासाठी उत्तम आहे.
  • ताजा आणि पौष्टिक आहार घ्या: रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ताज्या भाज्या आणि फळे खा. शिळे अन्न खाणे टाळा.
  • मच्छरांपासून बचाव करा: पावसाळ्यात डासांची पैदास वाढते, त्यामुळे मच्छरदानीचा वापर करा आणि घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका.
  • सर्दी-खोकला झाल्यास: गरम पाणी प्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःहून औषधोपचार करू नका.
  • पावसात भिजणे टाळा: पावसात भिजल्यास लगेच घरी जाऊन गरम पाण्याने स्नान करा.
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवा: पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे लिंबू, आले, मध आणि तुळस यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा आहारात समावेश करा.
  • पुरेशी झोप घ्या: दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1760

Related Questions

कोरोना रूग्णांची काळजी कशी घ्यावी लागेल?
सारखे आजारी पडणे कशामुळे होते?
कोणत्याही आजाराला तोंड देण्यासाठी शरीरातील ---------------- शक्तीच मदत करते.?
माझे वडील कोविड व्हॅक्सिन घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह झाले आणि त्यांना खूप त्रास झाला आणि शेवटी ते एक्सपायर झाले, असे कसे काय?
कोणत्याही आजाराला तोंड देण्यासाठी शरीरातील कोणती शक्ती मदत करते?
कोविडची लस घेतल्यानंतर ताप यायलाच हवा का आणि थोडेफार दुखायलाच हवे का?
सध्याच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे, काय करावे?