3 उत्तरे
3
answers
टिटवी ओरडणे शुभ की अशुभ?
18
Answer link
कुत्र्याच्या रडणे अशुभ, टिटवी ओरडणे अशुभ, काळी मांजर आडवी जाणे अशुभ, इ. हे सर्व अंधश्रद्धे च्या गोष्टी आहेत.
या 21 व्या शतकात ज्यात तुमच्या हातात अँड्रॉइड मोबाइल आहे त्यात तुम्ही ये विचार करता की टिटवी ओरडणे शुभ की अशुभ मग नवलच म्हणावं लागेल.
आपल्याला technology हे शिकवत नाही. आपण technology सोबत जुडले आहो. स्वतःच विचार करायला पाहिजे की अस होत का.
टिटवी ला पण हे सुद्धा माहीत नसेल तिच्या ओरडण्याने मनुष्य घाबरून जातो. ते तीच काम करते.
हे असू शकते की ज्या वेळी अघटित घटना जेव्हा घडली असेल त्यावेळीं टिटवी ने ओरडले असेल याचा अर्थ असा होत नाही की टिटवी ला हे सगडी घटना माहीत होती म्हणून यात फक्त योगा योग समजावा
या 21 व्या शतकात ज्यात तुमच्या हातात अँड्रॉइड मोबाइल आहे त्यात तुम्ही ये विचार करता की टिटवी ओरडणे शुभ की अशुभ मग नवलच म्हणावं लागेल.
आपल्याला technology हे शिकवत नाही. आपण technology सोबत जुडले आहो. स्वतःच विचार करायला पाहिजे की अस होत का.
टिटवी ला पण हे सुद्धा माहीत नसेल तिच्या ओरडण्याने मनुष्य घाबरून जातो. ते तीच काम करते.
हे असू शकते की ज्या वेळी अघटित घटना जेव्हा घडली असेल त्यावेळीं टिटवी ने ओरडले असेल याचा अर्थ असा होत नाही की टिटवी ला हे सगडी घटना माहीत होती म्हणून यात फक्त योगा योग समजावा
1
Answer link
टिटव्यांचे ओरडणे मात्र कोणत्याच अंगाने अशुभ नसते. ती केवळ एक अंधश्रद्धा आहे.टिटव्या फक्त रात्रीच ओरडत नाही; त्या दिवसाही ओरडतात! फरक फक्त एवढाच की, दिवसभर सुरू असलेल्या कोलाहलामुळे टिटव्यांचे ओरडणे आपल्या कानी पडत नाही. तरीही टिटव्या प्रामुख्याने रात्रीच्याच कालवा करतात आणि यामागे मोठे कारण आहे. अगदी मध्यरात्रीही टिटव्या टीव... टीव... टीटीव... टीव...! असा टाहो फोडतात. टिटव्यांचे ओरडणे मात्र कोणत्याच अंगाने अशुभ नसते. ती केवळ एक अंधश्रद्धा आहे. आमचे जुने घर अगदी शेताला लागून आहेत. शिवाय अनेकदा रात्री शेतावर राहिलो असल्याने मी टिटव्यांचे ओरडणे अगदी जवळून अनुभवले आहे. हा पक्षी निशाचर नसला तरी गडद काळोखातही अगदी स्पष्टपणे पाहू शकण्याची दृष्टी त्याला निसर्गाने प्रदान केलेली आहे. टिटव्या जमिनीवरच वावरतात. हा पक्षी उंच आकाशात विहार करीत नाही. परंतु, तरीही टिटवी बरेच अंतर उडू शकते. मोकळी मैदाने किंवा उघड्या माळरानावर टिटव्या राहतात. टिटव्या उघड्यावरच अंडी देतात. हा पक्षी प्रामुख्याने जोडप्याने राहतो. कोल्हे, खोकड, मांजरी, साप, मंगूस, घोरपडी आदी प्राणी टिटवीचे पारंपरिक शत्रू आहेत. रात्री जेव्हा एखादा प्राणी त्यांच्या अधिवास क्षेत्रात दाखल होतो तेव्हा टिटव्यांची अंडी किंवा पिल्लं धोक्यात असतात. प्रसंगी काही प्राणी टिटव्यांची शिकारही करतात. मात्र, शत्रू आपल्या परिसरात दाखल झाल्याचा सुगावा लागताच टिटव्या त्या प्राण्यावर एकाएकी हल्ला चढवतात. जोरजोराने ओरडून शत्रूवर झडप घालतात. आणि त्याला पिटाळून लावतात. जोपर्यंत शत्रू त्यांचा अधिवास असलेल्या परिसरातून दूर जात नाही, तोपर्यंत टिटव्यांचा गलका सुरूच असतो. काही वेळाने टिटव्यांचा कालवा थांबतो. परंतु, भूकेने व्याकूळ झालेला शत्रू प्राणी पुन्हा परत येतो आणि दहा-पंधरा मिनिटांतच पुन्हा टिटव्यांचा कोलाहल सुरू होतो. रात्री पायवाटेने शेतात जात असताना अनेकदा टिटव्यांनी माझा पाठलाग केलेला आहे.


0
Answer link
टिटवी पक्षी ओरडणे शुभ आहे की अशुभ, याबद्दल लोकांमध्ये वेगवेगळे मत आहेत. काही लोक याला अशुभ मानतात, तर काही लोक याला नैसर्गिक संकेत मानतात.
- अशुभ मानणारे: काही लोकांच्या मते, टिटवी पक्षी दुःख आणि अडचणींचे संकेत देतो. त्याचा आवाज नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, ज्यामुळे घरात भांडणे आणि अशांती वाढू शकते.
- शुभ मानणारे: काही लोक टिटवीच्या ओरडण्याला पावसाचे संकेत मानतात. टिटवी पावसाळ्याच्या आगमनाची सूचना देते, ज्यामुळे शेतकर्यांना फायदा होतो.
- वैज्ञानिक दृष्टिकोन: टिटवी पक्षी धोक्याची सूचना देण्यासाठी ओरडतो. जेव्हा त्याला आपल्या घरट्याजवळ किंवा स्वतःला काही धोका जाणवतो, तेव्हा तो आवाज काढून इतरांना सावध करतो.
त्यामुळे, टिटवी ओरडणे शुभ की अशुभ हे तुमच्या विश्वासावर अवलंबून असते.
Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ सामान्य माहितीवर आधारित आहे. अंधश्रद्धाळू समजुतींना प्रोत्साहन देणे हा माझा हेतू नाही.