नकाशा देव संत साहित्य इतिहास

शिवथरघळ कोणाशी संबंधित आहे?

2 उत्तरे
2 answers

शिवथरघळ कोणाशी संबंधित आहे?

5
रामदासस्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली शिवथरघळ ही रायगड जिल्ह्यात येणारी घळ आहे. ती महाडपासून तीस किमी अंतरावर आहे. याच्या सर्व बाजूंनी उंच पर्वत असून वाघजई दरीच्या कुशीत हे ठिकाण आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होत असून, पुढे ही नदी सावित्री नदीला जाऊन मिळते. काळच्याया काठावर कुंभे कसबे, व आंबे अशा तीन शिवथर वस्त्या आहेत. चहूबाजूंनी वेढलेल्या हिरव्यागार झाडाझाडोऱ्याने झाकून टाकलेल्या डोंगराच्या पोटात शिवथर घळ आहे. या घळीला समर्थ रामदास स्वामी ’सुंदर मठ’ म्हणत असत.

शिवथरघळ आणि आजुबाजूचा सर्व परिसर चंद्रराव मोऱ्यांच्या जावळीच्या वतनात मोडत असे. जावळीचे मोरे हे विजापूर दरबाराचे वतनदार देशमुख होते. घनदाट जावळीच्या भूप्रदेशामुळे मोरे वरचढ झाले होते. पुढे १६४८ मध्ये शिवरायांनी हा परिसर आपल्या ताब्यात घेतला आणि समर्थ रामदास सन १६४९ मध्ये या घळीत वास्तव्यासाठी आले. ते नंतर सन १६६० पर्यंत म्हणजे दहा-अकरा वर्षे या ठिकाणी राहत होते. दासबोधाचा जन्म याच घळीत झाला. दासबोधाची सात आठ दशके त्यांनी या घळीतच लिहून पूर्ण केली. सन १६७६ मध्ये दक्षिणदिग्विजयासाठी जातांना श्री समर्थांचा आशीर्वाद येथूनच घेऊनच छत्रपती शिवाजी महाराज पुढे गेले. आजच्या जगाला या घळीचा शोध धुळे येथील विख्यात समर्थभक्त श्री शंकर कृष्ण देव यांनी १९१६ साली लावून दिला.
उत्तर लिहिले · 4/10/2018
कर्म · 99520
0

शिवथरघळ ही समर्थ रामदास स्वामी यांच्याशी संबंधित आहे.

महत्व:

  • समर्थ रामदास स्वामींनी येथे काही काळ वास्तव्य केले.
  • त्यांनी येथे 'दासबोध' या ग्रंथाची रचना केली.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 980

Related Questions

मराठी किती जुनी भाषा आहे?
औद्योगिक क्रांती कुठे झाली?
पंडित जवाहरलाल नेहरू हे आशियानचे संस्थापक होते का?
पूर्व युरोपातील सोव्हिएट रशियाच्या दबावाखालील ५ देशांची नावे लिहा?
पूर्व युरोपातील अनेक देश सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली होते का?
ॲनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीचे भारतात झालेले परिणाम लिहा?
1975 चा पेठ मधील दुष्काळ?